सुरज फुगारे । मंगळवेढा टाईम्स कोरोना विषाणु साथिच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र काळजीचे वातावरण असल्याने सामाजिक संवेदना आणि कर्तव्याचा भाग म्हणुन रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे,असे आवाहन मुजम्मील काझी सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष मंगळवेढा यानी केले आहे.
चंद्र दर्शनानुसार मंगळवेढयासह सर्वत्र ईद साजरी करण्यात येणार आहे.रोज्यांमध्ये सुर्योदयापुर्वि खाणे(सहेरी)अपेक्षित आहे,तर सुर्योदयानंतर जेवन(इफ्तार) करण्याची परवानगी आहे. रमजानच्या पवित्र महिन्यात केलेले सर्व रोजे ईदच्या दिवशी सोडले जातात. दर वर्षी सगे सोयरे, मित्र परिवार, शेजार्यांसमवेत मोठ्या उत्साहात साजरी केली जाणारी ईद यावर्षी साधेपणाने साजरी करावी.
कारण सध्याच्या परिस्थितीमध्ये संपूर्ण जगभरामध्ये तसेच आपल्या भारत देशात महाराष्ट्रात कोरोना संसर्गाने हैदोस घातलेला आहे हा कोरोना रोग संसर्गाने वाढत असल्यामुळे शासनाने दिलेले नियमांचे व सुचनांचे पालन करत तसेच आपल्या तोंडाला मास्क किंवा रुमाल लावून जेणेकरून या कोरोनासंसर्गाचा फैलाव होणार नाही याची काळजी आपण सर्व मुस्लिम बांधवांनी घेणे अत्यंत गरजेचे आहे. सामाजिक भान राखत साधेपणाने ईद साजरी करावी. सर्वांच्या दिर्घायुष्यासाठी दुआ प्रार्थना करावी, असे आवाहन मुजम्मील काझी यानी केले आहे.
रमजान महिन्याच्या काळात मशिदींमध्ये सामूहिक नमाज पठण न करता घरीच नमाज पठण करुन देशातील मुस्लिम बांधवांनी जे जबाबदारीचे पालन केले आहे तसेच शिस्तिचे पालन ईदच्या दिवशी करावे,असे आवाहन मुजम्मील काझी यांनी मुस्लिम बांधवांना केले आहे.तसेच तमाम हिंदु मुस्लिम बांधवांना रमजान ईद सणाच्या शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या.
——————
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज