टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा तालुक्यातील हुलजंतीचे मंडळ अधिकारी सत्यवान घुगे यांना मारहाण करून वाळूचा ट्रॅक्टर अंगावर घालण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पौटचे सरपंच राजाराम जगन्नाथ निमंगरे व प्रवीण राजाराम निमंगरे , राहुल राजाराम निमंगरे यांच्या वर गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की,सोमवारी रात्री ८ च्या सुमारास सरपंच यांच्या वस्तीवर घडली आहे. सरपंच निमंगरे यांनी पौटच्या ओढ्यातुन वाळू अवैध वाळू उपसा करून घराजवळ बिगर नंबरचा ट्रॅक्टर उभा केल्याची माहिती मिळाली होती.
त्यानुसार कारवाई करण्यासाठी हुलजंतीचे मंडळ अधिकारी घुगे व सलगर खुर्दचे तलाठी आर.ए.खोमणे गेले होते.
सरपंच राजाराम निमंगरे यांचे वस्तीजवळ आलो असता एक लाल रंगाचे स्वराज कंपणीचे 855 मॉडेलचे बिगर नंबरचा ट्रॅक्टर त्यास लाल रंगाची बिगर नंबरची डंपींग ट्रॉली थांबविला सदरचा ट्रॅक्टर सरपंच राजाराम निमंगरे चालवित होते. त्यांची दोन मुले 1 ) प्रविण राजाराम निमंगरे 2 ) राहुल राजाराम निमंगरे असे ट्रॉलीवर बसले होते.
फीर्यादीने ट्रॅक्टर कारवाई साठी तहसिल कार्यालय मंगळवेढा येथे घेवुन येणेस सांगितले असता त्यांनी आम्ही ट्रॅक्टर घेवुन येणार नाही असे म्हणुन आम्हास शिविगाळी दमदाटी करु लागले. त्यानंतर तिघे मिळुन आम्हाला हाताने व लाथाबुक्याने मारहाण करु लागले असल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हंटले आहे.
—————————
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज