mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

भारतीय क्रिकेट टीम मधील ‘या’खेळाडूंनी आत्तापर्यंत एकही चेंडू खेळला नाही!

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2020
in Uncategorized
भारतीय क्रिकेट टीम मधील ‘या’खेळाडूंनी आत्तापर्यंत एकही चेंडू खेळला नाही!

टीम मंगळवेढा टाईम्स । कसोटी सामन्यांनंतर क्रिकेटमध्ये एकदिवसीय सामन्यांना सुरुवात करण्यात आली. या नव्या प्रकाराने क्रिकेटचे सगळे स्वरुपच बदलून टाकले. ज्यात फलंदाजांप्रमाणेच गोलंदाजांनी देखील आपल्या बॅटचा जलवा दाखवायला सुरुवात केली.एकदिवसीय सामन्यांचे नियोजन होण्याअगोदर क्रिकेट जगतात फक्त गोलंदाजांचाच बोलबाला होता. 

अनेक दिग्गज गोलंदाज आपल्या बोटांच्या जादूवर संपुर्ण क्रिकेट सामन्यावर वर्चस्व गाजवत असत. मात्र, एकदिवसीय सामन्यांना सुरुवात झाली आणि क्रिकेटचे रुपडे पालटले. ज्यात फलंदाजांनी आपल्या बॅटने प्रेक्षकांच्या मनावर आणि क्रिकेटच्या मैदानावर अधिराज्य गाजवायला सुरुवात केली.

तरिही या प्रकाराला खरी लोकप्रियता तेव्हाच लाभली, जेव्हा प्रमुख फलंदाजांप्रमाणेच अष्टपैलु खेळाडू आणि गोलंदाजांनी देखील चेंडू टोलवायला सुरुवात केली.फलंदाजांनी धावा करणे, हे सर्वांनाच अपेक्षित असते. मात्र, गोलंदाजांना धावा करताना पाहणे प्रेक्षकांना सुखावणारे असते.एकदिवसीय सामन्यात संघातील प्रत्येक खेळाडू एकदा तरी प्रत्यक्ष मैदानावर बॅट फिरवण्यासाठी अतुर असतो. मात्र, तळातील फलंदाजांना ही संधी मिळतेच असे नाही.

“खरेतर भारताने क्रिकेट जगताला आजपर्यंत असे काही महान खेळाडू दिले आहेत. जे उत्तम गोलंदाज तर आहेतच, मात्र त्यांनी त्यांच्या फलंदाजीने सर्वांना चकीत केले. परंतु, भारताच्या क्रिकेट इतिहासात असेही काही खेळाडू आहेत. ज्यांनी एकदिवसीय सामन्यात देशाचे प्रतिनिधित्व केले असूनही त्यांना कधीही फलंदाजी करण्याची संधी मिळाली नाही.


या लेखात आपण भारतीय संघातील असे तीन खेळाडू पाहणार आहोत. ज्यांनी आजपर्यंत एकाही वनडे सामन्यात फलंदाजी केली नाही.

क्रमांक – 3

  • आरपी सिंह (सिनिअर)

रुद्रप्रताप सिंह या खेळाडूने 90 च्या दशकात भारतीय संघासाठी दोन एकदिवसीय सामने खेळले होते. आरपी सिंह (सिनिअर) यांचा जन्म लखनऊ येथे झाला होता. आरपी सिंह हे डाव्या हाताने फलंदाजी तर उजव्या हाताने गोलंदाजी करत असत.

रुद्रप्रताप सिंह यांच्या खात्यावर एक बळी टिपल्याची नोंद आहे. परंतु या खेळाडूला वनडेत फलंदाजी करण्याची संधी काही मिळाली नाही.

आरपी सिंह यांनी 1986 मध्ये ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध खेळताना संघात पदार्पण केले होते. त्यानंतर फक्त दोन सामने खेळलेल्या आरपी सिंह यांना संघात स्थान मिळाले नाही.

क्रमांक – 2

  • मनप्रीत गोनी

भारताच्या या खेळाडूकडे फलंदाजी करण्यासाठी आवश्यक ते कौशल्य पुरेपुर होते. 2008 मध्ये कराची येथे हाँगकाँग संघाविरुद्ध मनप्रीत गोनी याने एकदिवसीय संघात पदार्पण केले होते. गोनी याने भारतीय संघासाठी दोन एकदिवसीय सामने खेळले आहेत.

गोनी याने आजपर्यंतच्या कारकिर्दीत दोन विकेट खात्यात जमा केल्या आहेत. आयपीएल मध्ये जबरदस्त कामगिरी केल्यानंतर गोनीला भारतीय संघात स्थान देण्यात आले होते. परंतु, भारतीय संघाकडून वनडे सामन्यात फलंदाजी करण्याची संधी काही गोनी याला मिळाली नाही.

क्रमांक – 1

  • जयदेव उनाडकट

आयपीएलमध्ये केलेल्या जबरदस्त कामगिरीनंतर जयदेव उनाडकट याला भारतीय संघात स्थान देण्यात आले होते. जयदेवने 2013 मध्ये भारतीय संघात पदार्पण केले होते.

उनाडकट याने हरारे येथे झिम्बाम्ब्वे संघाविरुद्ध आपला पहिला एकदिवसीय सामना खेळला होता. तसेच त्यानंतर उनाडकटने आजपर्यंत 7 वनडे सामने खेळले आहेत. ज्यात त्याने 8 बळी टिपले आहेत.

सर्वाधिक वनडे सामने खेळून एकही चेंडू न खेळण्याचा विक्रम हा सध्या उनाडकतच्या नावावर आहे. तो सोडून जगात कोणत्याही खेळाडूने असा विचित्र विक्रम केला नाही.

आयपीएलमध्ये प्रसंगी फलंदाज म्हणूनही चांगली कामगिरी केलेल्या या खेळाडूला राष्ट्रीय संघाकडून मात्र, एकदिवसीय सामन्यात एकदाही फलंदाजी करता आलेली नाही. बाकी जयदेवचे वय पाहता तो आपल्या नावावरचा हा विक्रम नक्कीच बदलू शकतो.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: Krida

संबंधित बातम्या

सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

खळबळ! मुलीच्या लग्नासाठी बुक केलेले सोन्याचे दागिने न देता चार लाखांची फसवणूक; विधवा महिलेची पोलीस ठाण्यात धाव; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

January 1, 2026

1 april to 9 april birthday

March 31, 2023

आठ मार्च वाढदिवस

March 8, 2023

प्रा.शिवाजीराव काळुंगे सर वाढदिवस

March 6, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

पालकांनो! दहावी निकालाच्या तारखेची अद्याप घोषणा नाही; विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला

June 15, 2022
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

July 21, 2021
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही! खत विकेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू; शेतकरी संघटना गप्प का?

July 12, 2021
रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे : मुजम्मील काझी

केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढ न थांबवलेस राष्ट्रवादी पद्धतीत अंदोलन करू; मुजम्मील काझी यांचा इशारा

May 17, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

मंगळवेढेकरांनो नीट समजून घ्या! शहरात दुकानासाठी पुर्वीचेच नियम लागू असतील; विनाकारण बाहेर पडाल तर…

May 17, 2021
Next Post
Big Breaking : शाळा-कॉलेज सुरू होणार का नाही ? गृह मंत्रालयाचं स्पष्टीकरण

Big Breaking : शाळा-कॉलेज सुरू होणार का नाही ? गृह मंत्रालयाचं स्पष्टीकरण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बळीराजाला मोठा दिलासा! शेतकरी कर्जमाफीची घोषणा; देवेंद्र फडणवीसांची घोषणा; कोणाचे कर्ज होणार माफ?

बळीराजाला मोठा दिलासा! शेतकरी कर्जमाफीची घोषणा; देवेंद्र फडणवीसांची घोषणा; कोणाचे कर्ज होणार माफ?

June 2, 2026
चमकदार कामगिरी! सोलापूर पोलिसांनी उध्वस्त केला बनावट नोटांची छपाई करणारा अड्डा

खळबळ! कर्नाटक हादरवणारे गोविंदपूर हत्याकांड; सिद्धापूर कनेक्शन’ उघड, पोलिसांकडून एका संशयिताला अटक

June 2, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

मदरशात धार्मिक शिक्षणाच्या नावाखाली अश्लील चाळे; सोलापूरच्या नराधम मौलानाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या; पीडितांचा आकडा वाढण्याची भीती

June 2, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

धक्कादायक! पंढरपूरनजीकच्या ‘त्या’ विचित्र अपघाताने हिरावला उमदा तरुण; मंगळवेढ्यातील भावी वकिलाची मृत्यूशी झुंज अपयशी

June 2, 2026
बडा मासा! मंगळवेढा प्रांत कार्यालयातील तलाठी निघाला लाचखोर; लाचेची रक्कम घेऊन केला पोबारा; लाच कुणाच्या सांगण्यावरून?

मोठी बातमी! जन्म दाखल्याच्या ऑर्डरसाठी २ हजारांची लाच घेताना महसूल सहाय्यकाला रंगेहाथ पकडले

June 2, 2026
विद्यापीठाची पोलिसात धाव, अंतिम परीक्षेवर सायबर अटॅक

कामाची बातमी! व्हॉट्सअपवर लग्नाची पत्रिका अन् धोका, तुमचं बँक अकाऊंट होऊ शकतं रिकामं; सायबर पोलिसांकडून महत्त्वाचं आवाहन

June 1, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा