टीम मंगळवेढा टाईम्स । महाराष्ट्रात (maharashtra corona) कोरोना व्हायरसने हाहाकार माजवला असुन सोलापूर शहरात थैमान घातलेल्या कोरोना आता विविध मार्गाने सोलापूर (solapur district)जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पोहोचू लागला आहे. सोलापूर शहर पोलिसमध्ये कार्यरत असलेले पोलिस शिपाई आजारी असल्याने पाच दिवसांपर्यंत पूर्वी बोरामणीला (ता. दक्षिण सोलापूर) गेले आई- वडिलांसोबत राहिले. मंगळवारी त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.वैराग येथील होलसेल किराणा दुकानदाराची अकलूज येथील बहीण व भाचा हे देखील मंगळवारच्या अहवालात कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.
सोलापुरातील कोरोना आता हळूहळू जिल्ह्याच्या ग्रामीण भागापर्यंत जाऊ लागल्याने चिंता व्यक्त होत आहेत. दक्षिण सोलापूरच्या प्रांताधिकारी ज्योती पाटील म्हणाल्या, 26 मंगळवारी आलेल्या कोरोना चाचणी अहवालात बोरामणी येथील पोलिस कॉन्स्टेबल यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
ते पाच दिवसांपासून आई-वडिलांसोबत राहत असल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्व व्यक्तींना तपासणीसाठी ताब्यात घेण्याचे काम सुरू आहे. आज सायंकाळपर्यंत हा परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केला जाईल. वैराग येथील किराणा मालाचे होलसेल व्यापारी पुण्यातील खासगी रुग्णालयात कोरोनाबाधित असल्याचे समोर आले.
या व्यापाऱ्याच्या आईवर सोलापुरातील नामांकित रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली. तत्पूर्वी त्यांनी उपचारासाठी अकलूज व बार्शी येथील रुग्णालयात प्रयत्न केल्याचे समजते. या व्यापाऱ्यांची अकलूज मधील बहीण व भाचा हे कोरोना बाधित आढळले आहेत.
अकलूज महिला आपल्या आईला भेटण्यासाठी सोलापुरातील खासगी रुग्णालयात आल्याचे समजते. वैरागमधील कोरोना बाधित व्यापारी आपल्या बहिणीला सोडविण्यासाठी अकलूजलाही जाऊन आल्याचे समजते. वैरागमधील व्यापारी कोरोनाबाधित आढळल्यानंतर अकलूजमढी पाच ते सहा जणांना कोरोना चाचणीसाठी ताब्यात घेण्यात आले होते.
आज कोरोनाबाधित आढळलेल्या अकलुजमधील त्या कुटूंबाचा देखील किराणा मालाचा होलसेल व्यवसाय असल्याने माळशिरस तालुक्याच्या ग्रामीण भागात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
—————————
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज