टीम मंगळवेढा टाईम्स । परगावाहून तालुक्यात आलेल्या ५ जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले असून त्यांचे अहवाल आज पाँझिटिव्ह आले आहेत. यात पंढरपूर शहरात २, गोपाळपूर ,उपरी, करकंब येथे प्रत्येकी एकाचा समावेश आहे. अशी माहिती प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी दिली.
हे सर्व परजिल्ह्यातून गावी परत आले आहेत. त्यांना संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात आले होते. त्यांचे स्वँब नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. याचा अहवाल सायंकाळी प्राप्त झाला आहे. आता तालुक्यात एकूण 6 रूग्ण झाले आहेत. यापूर्वी उपरीत संस्थात्मक विलगीकरणातील 1 जणाचा अहवाल पाँझिटिव्ह आला होता.
आरोग्य विभागाने एकूण ५१ जणांचे स्वँब नमुने घेतले होते, यापैकी ४५ निगेटिव्ह तर ५ सकारात्मक व १ चा अहवाल प्रतीक्षेत आहे.
—————————
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज