टीम मंगळवेढा टाईम्स । दवाखाना बंदबाबत नोटीसीला खुलासा न दिल्याने महापालिकेने शहरातील २८ दवाखाने बंद असल्याने त्या दवाखान्यांच्या डॉक्टरांना महापालिकेने नोटीस देवून दोन दिवसात खुलासा मागविला होता. खुलासा न दिल्याने महापालिका आरोग्य विभागाच्या वतीने बंद असलेल्या दवाखान्यावर फौजदारी कारवाई करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे.
रविवारी वीरकर मॅटर्निटी व नर्सिंग होमच्या डॉ.मधुरा व्ही.वीरकर यांच्याविरोधात फौजदार चावडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्याने आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ , कलम ५१ बी आणि भा.दं.सं .१८६० , कलम १८८ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महापालिका वैद्यकीय अधिकारी ज्ञानेश्वर सोडल यांनी फिर्याद दिली आहे. शहरात दवाखाने बंद असल्याने रुग्णांची गैरसोय होत असल्याने याबाबत तक्रारी होत्या . त्यानुसार महापालिकेने पथके नेमून बंद असलेल्या दवाखान्यांची पाहणी करून २८ दवाखान्यांच्या डॉक्टरांना नोटीस दिली.
त्याचा खुलासा केला जात नाही म्हणून सोन्या मारुतीजवळ असलेले वीरकर मॅटर्निटी व नर्सिंग होम विरोधात महापालिका वैद्यकीय अधिकारी सोडल यांनी रविवारी रात्री फौजदार चावडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली . व महापालिका परवाना विभागाचे निरिक्षक केदारनाथ आवटे , दत्तात्रय गायकवाड , मतीन पटेल यांनी २२ मे रोजी भेट दिली असता दवाखाना बंद होता . डॉ.मधुरा वीरकर यांना नोटीस दिली . त्याचा खुलासा केला नाही.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज