mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

बापरे…अख्खा महाराष्ट्र रेड झोनमध्ये ; ‘हे’ दोन जिल्हे फक्त ऑरेंज झोनमध्ये

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2020
in Uncategorized
बापरे…अख्खा महाराष्ट्र रेड झोनमध्ये ; ‘हे’ दोन जिल्हे फक्त ऑरेंज झोनमध्ये

टीम मंगळवेढा टाईम्स । लॉकडाउन चारवेळा वाढवूनही रुग्ण संख्या कमी होत नसल्याने आता योग्य ती खबरदारी घेऊन राज्य सरकार शिथिल करण्याच्या तयारीत आहे. या पार्श्वभूमीवर आता सरकारी व खासगी कार्यालये व शाळा सुरु करण्यापूर्वी 55 वर्षांवरील विशेषतः ज्यांना मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना आराम देण्याचा निर्णय विचाराधीन आहे. तर शाळा सुरु करण्याचा मुहूर्त 15 जूनऐवजी आणखी काही दिवस पुढे ढकलला जाणार असल्याचे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.

राज्यातील ऑरेंज झोनमधील वाशीम व वर्धा जिल्हा वगळता उर्वरित महाराष्ट्र सद्यस्थितीत रेड झोनमध्ये पोहोचला आहे. राज्यातील रुग्णसंख्येने आता 60 हजाराचा टप्पा ओलांडला असून सुमारे दोन हजार रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

मृत्यू होणाऱ्यामध्ये उच्च रक्तदाब, मधुमेह व हृदयरोग असे विकार असलेल्या व्यक्तींचा सर्वाधिक समावेश आहे. राज्यातीलच नव्हे तर देशातील कोरोनाचे वैश्विक संकट हद्दपार करण्याच्या हेतूने मागील 67 दिवसांपासून (22 मार्च) लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. लॉकडाऊनमुळे राज्यातील कोरोनाचा संसर्ग कमी होऊन सर्व व्यवहार पुन्हा सुरळीत होतील, असा विश्वास होता. मात्र, परस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असल्याचे चित्र आहे. 

तत्पूर्वी, राज्यातील पोलीस दलातील सुमारे बाराशे कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली आणि त्यात काहींचा मृत्यूही झाला. त्यानंतर खबरदारी म्हणून गृहमंत्रालयाने 55 वर्षांवरील अधिकारी व कर्मचाऱ्यांना घरीच थांबण्यास सांगितले. तर 30 टक्के कर्मचाऱ्यांना आलटून-पालटून आराम दिला जात आहे. या पार्श्वभूमीवर कोरोनाचा संसर्ग कमी होईपर्यंत सरकारी कार्यालयातील 55 वर्षांवरील अधिकारी व कर्मचाऱ्यांना आराम देण्याचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता वरिष्ठ सूत्रांनी व्यक्त केली. मात्र, ज्यांना उच्च रक्तदाब, मधुमेह व हृदयरोग असे विकार आहेत, त्यांना वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करावे लागेल, असेही सांगण्यात आले.

14 शहर-जिल्ह्यांमध्ये रुग्णांचा वाढतोय वेग

22 मार्चपासून आतापर्यंत चारवेळा लॉकडाऊन करूनही कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 74 वरून 60 हजारांवर पोहचली आहे. त्यामध्ये एकट्या मुंबई महानगरपालिका परिसरामध्ये 35 हजार 485 रुग्ण सापडले असून सद्यस्थितीत 25 हजार 694 रुग्ण उपचार घेत आहेत. त्या पाठोपाठ ठाणे महापालिका परिसरात आठ हजार 220 रुग्ण सापडले असून सध्या पाच हजार 765 रुग्ण उपचार घेत आहेत तर पुण्यामध्ये सहा हजार 896 रुग्ण सापडले असून तीन हजार 353 रुग्ण सध्या उपचार घेत आहेत.

तसेच औरंगाबाद जिल्ह्यात एक हजार 370 रुग्ण सापडले असून 431 रुग्ण उपचार घेत आहेत. सोलापुरातील 822 रुग्णांपैकी 501 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. रायगड जिल्ह्यातील 944 पैकी 428 रुग्णांवर उपचार सुरू असून पालघर जिल्ह्यातील 825 पैकी 529 रुग्णांवर उपचार सुरू आहेत तर नाशिक जिल्ह्यातील 1043 रुग्णांपैकी 236 रुग्णांवर उपचार सुरू असून जळगाव जिल्ह्यातील 526 पैकी 235 रुग्ण उपचार घेत आहेत. साताऱ्यातील 429 पैकी 285 रुग्णांवर उपचार सुरू असून उर्वरित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर कोल्हापुरातील 351 रुग्णांपैकी 314 रुग्ण दवाखान्यांमध्ये उपचार घेत असून रत्नागिरीतील 204 पैकी 123 रुग्णांवर उपचार सुरू आहेत तसेच अकोल्यातील 529 पैकी 250 रुग्णांवर उपचार सुरू असून नागपुरातील 495 पैकी 150 रुग्ण दवाखान्यांमध्ये दाखल आहेत.

In the entire Maharashtra Red Zone;  ‘These’ two districts only in the Orange Zone

—————————–

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: Maharashtra Maza

संबंधित बातम्या

सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

खळबळ! मुलीच्या लग्नासाठी बुक केलेले सोन्याचे दागिने न देता चार लाखांची फसवणूक; विधवा महिलेची पोलीस ठाण्यात धाव; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

January 1, 2026

1 april to 9 april birthday

March 31, 2023

आठ मार्च वाढदिवस

March 8, 2023

प्रा.शिवाजीराव काळुंगे सर वाढदिवस

March 6, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

पालकांनो! दहावी निकालाच्या तारखेची अद्याप घोषणा नाही; विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला

June 15, 2022
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

July 21, 2021
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही! खत विकेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू; शेतकरी संघटना गप्प का?

July 12, 2021
रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे : मुजम्मील काझी

केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढ न थांबवलेस राष्ट्रवादी पद्धतीत अंदोलन करू; मुजम्मील काझी यांचा इशारा

May 17, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

मंगळवेढेकरांनो नीट समजून घ्या! शहरात दुकानासाठी पुर्वीचेच नियम लागू असतील; विनाकारण बाहेर पडाल तर…

May 17, 2021
Next Post
कर्नाटकमध्ये 20 आमदार बंडाच्या पवित्र्यात ; पुन्हा राजकीय संकट ?

कर्नाटकमध्ये 20 आमदार बंडाच्या पवित्र्यात ; पुन्हा राजकीय संकट ?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जिल्हा बँकेवर मंगळवेढ्यातून ‘नवी उमेद’! लिंगाणा पाटील पतसंस्था मतदारसंघातून रिंगणात उतरणार; तालुक्यातील दिग्गजांची साथ; मंगळवेढ्यात राजकीय घडामोडींना वेग

जिल्हा बँकेवर मंगळवेढ्यातून ‘नवी उमेद’! लिंगाणा पाटील पतसंस्था मतदारसंघातून रिंगणात उतरणार; तालुक्यातील दिग्गजांची साथ; मंगळवेढ्यात राजकीय घडामोडींना वेग

August 20, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

आनंदवार्ता! ‘या’ वर्गातील विद्यार्थ्यांना मोफत दप्तर मिळणार; राज्य सरकारची मोठी घोषणा

August 20, 2026
धक्कादायक! मंगळवेढा तालुक्यात एकाच दिवशी कोरोनाने घेतला दोघांचा बळी; आज 20 जण कोरोनामुक्त

धक्कादायक! सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज

August 19, 2026
हक्काच्या पैशांसाठी वृद्धांची फरफट! ३ दिवस उलटले तरी चेअरमन-संचालक गायब; दामाजी कारखान्याला ‘गेट बंद’चा थेट इशारा; मंगळवेढ्यात संतापाचा भडका

​वर्षानुवर्षांचा वनवास संपणार कधी? थकीत रकमांचा निर्णय होईना; दामाजी कारखान्याचे निवृत्त कर्मचारी आक्रमक; आज कारखान्याला ठोकणार कुलूप?

August 19, 2026
धनश्री मल्टीस्टेटची ऐतिहासिक गरुडभरारी; १५ वर्षांत गाठला १,५०१ कोटींच्या ठेवींचा टप्पा; पारदर्शक कारभार अन् ग्राहकांचा विश्वास

धनश्री मल्टीस्टेटची ऐतिहासिक गरुडभरारी; १५ वर्षांत गाठला १,५०१ कोटींच्या ठेवींचा टप्पा; पारदर्शक कारभार अन् ग्राहकांचा विश्वास

August 19, 2026
मंगळवेढा ब्रेकिंग! पोलीस पाटलाचा अपघाती मृत्यू

वडिलांवर रुग्णालयात उपचार, डबा घेऊन जाताना मुलावर काळाचा घाला; मंगळवेढा-सोलापूर महामार्गावर अपघात

August 18, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा