टीम मंगळवेढा टाईम्स ।
जिल्ह्यातील गुन्हेगारी आणि मारहाणीच्या घटनांमुळे बीड जिल्हा गेल्या काही वर्षांत सातत्याने चर्चेत आहे. त्यामध्ये, ऊसटोळीतील कामगार, मुकादम असेल किंवा दिवंगत सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरण असेल.

या घटनांमुळे बीडमधील गुन्हेगारी सातत्याने माध्यमांत येत आहे. त्यातच, आता गेवराई तालुक्यातील आहेर चिंचोली येथे कार्यरत असलेले तलाठी विलास तपसे यांच्यावर कार्यालयात घुसून वाळूमाफियाने हल्ला केल्याची घटना घडली आहे. तपासे यांच्यावर सध्या बीडच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

आहेर चिंचोली परिसरात सिंधफना नदीचे पात्र असून या नदीपात्रातून अवैधरीत्या वाळू उपसा करणाऱ्या वाळूमाफीयाचे काही साहित्य विलास तपसे यांनी जप्त केले होते.

तलाठ्याने बजावलेल्या कर्तव्य कामाचा राग आल्याने या वाळूमाफियाने विलास तपसे यांच्या कार्यालयात दाखल होत माझे जप्त केलेले साहित्य परत द्या अशी मागणी केली.

त्यावर तपसे यांनी साहित्य परत करता येणार नाही, असे सांगताच वाळूमाफियाने हातातील रॉडने त्यांना मारहाण केली. जखमी अवस्थेतील तपसे यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून याप्रकरणी बीड ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल केला जाणार आहे.
तर दुसरीकडे महसूल कर्मचारी संघटनेने आरोपी विरोधात कठोर कारवाईची मागणी करत आंदोलनाचा इशारा दिला आहे. मात्र, या घटनेमुळे जिल्हा प्रशासनात खळबळ उडाली आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज











