टीम मंगळवेढा टाईम्स (प्रतिनिधी) :
मंगळवेढा तालुक्यात दुष्काळाच्या झळा तीव्र झाल्या असून शेतकरी, शेतमजूर आणि पशुपालक मोठ्या आर्थिक व जीवनमरणाच्या संकटात सापडले आहेत. शासनाने केवळ कागदोपत्री आढावे न घेता प्रत्यक्ष जमिनीवर उतरून तातडीने मदत करावी, अशी आग्रही मागणी अनिल सावंत यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

तालुक्यातील ग्रामीण भागात सध्या अस्मानी संकटाचे गडद सावट आहे. या पार्श्वभूमीवर सावंत यांनी चारा, पाणी आणि रोजगार या तीन मूलभूत प्रश्नांकडे उपमुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले आहे.

निवेदनातील प्रमुख मागण्या:
पशुधनासाठी चारा छावण्या व डेपो: तालुक्यात हिरव्या व सुक्या चाऱ्याची तीव्र टंचाई निर्माण झाली असून, जनावरे जगवणे पशुपालकांसमोर मोठे आव्हान बनले आहे. त्यामुळे गरजू गावांमध्ये तातडीने चारा छावण्या सुरू कराव्यात आणि चारा डेपोच्या माध्यमातून पुरेसा चारा उपलब्ध करून द्यावा.
वाड्या-वस्त्यांवर नियमित टँकर: अनेक गावे आणि वाड्या-वस्त्यांवर पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना वणवण करावी लागत आहे. सुरू असलेले टँकर अपुरे पडत असल्याने सर्व टंचाईग्रस्त भागांत नियमित टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा, तसेच मुक्या जनावरांसाठी स्वतंत्र पाण्याची व्यवस्था करावी.

मजुरांच्या हाताला ‘रोहयो’चे काम: शेतीची कामे पूर्णपणे ठप्प झाल्याने शेतकरी व शेतमजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे. ग्रामीण भागातील स्थलांतर रोखण्यासाठी रोजगार हमी योजनेंतर्गत (MGNREGA) शेतरस्ते, पाणंद रस्ते, जलसंधारण, नाला खोलीकरण आणि तलावातील गाळ काढण्याची कामे तातडीने सुरू करून स्थानिक मजुरांना रोजगार द्यावा.

“मंगळवेढा तालुक्यातील बळीराजा आणि कष्टकरी वर्ग आज मोठ्या संकटात आहे. प्रशासनाने वेळकाढूपणा न करता चारा, पाणी आणि रोजगाराचा प्रश्न युद्धपातळीवर सोडवून सर्वसामान्यांना तात्काळ दिलासा द्यावा.”— अनिल सावंत
अशाचमहत्वपूर्णबातम्याआणिमाहीतीमनोरंजनमिळवातुमच्याव्हॉट्सअँपग्रूपमध्ये, त्यासाठीपुढीलनंबरतुमच्याग्रुपमध्येसमाविष्टकरा – 9970766262
“मंगळवेढाटाईम्स“च्याबातम्यामिळविण्यासाठी 9970766262 हानंबरतुमच्याव्हॉट्सऍपवरग्रुपवरऍडकरूनफक्तएकमेसेजकरा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज












