टीम मंगळवेढा टाईम्स (प्रतिनिधी):
मंगळवेढा तालुक्यातील शेतकरी बांधवांसाठी जिल्हा परिषद सोलापूर कृषी विभागामार्फत अत्यंत महत्त्वाची व फायदेशीर योजना जाहीर करण्यात आली आहे. पंचायत समिती मंगळवेढा कृषी विभागाच्या वतीने जिल्हा परिषद सेस योजनेअंतर्गत सन २०२६–२७ या वर्षासाठी विविध कृषी साहित्य खरेदीवर ५० टक्के किंवा नियमानुसार मर्यादित अनुदान दिले जाणार आहे.

या योजनेसाठी पात्र शेतकऱ्यांकडून प्रस्ताव स्वीकारण्यास सुरुवात झाली असून, तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी २५ नोव्हेंबर २०२६ पर्यंत आपले परिपूर्ण प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन मंगळवेढा पंचायत समितीच्या सभापती सौ. दिपाली आनंद ताड यांनी केले आहे.

कोणत्या कृषी साहित्यांवर मिळणार ५०% अनुदान?
या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना खालील आधुनिक कृषी अवजारे व साहित्यांसाठी अर्ज करता येणार आहे:
कडबाकुट्टी यंत्र, थ्री पिस्टन स्प्रे पंप, बॅटरी ऑपरेटेड स्प्रे पंप, ताडपत्री, रोटाव्हेटर, पलटी नांगर, ट्रॅक्टरचलित पेरणी यंत्र, ५ एच.पी. / ७.५ एच.पी. विद्युत ओपनवेल पंप, सबमर्सिबल पंप संच (पाणबुडी मोटार), ४/५ एच.पी. डिझेल इंजिन, स्लरी फिल्टर (५०० लिटर किंवा त्यापेक्षा जास्त क्षमतेचा)

अर्जासोबत आवश्यक असणारी कागदपत्रे
सर्वसाधारण कागदपत्रे:
विहित नमुन्यातील मागणी अर्ज
७/१२ उतारा व ८-अ, आधार कार्ड, आधार कार्ड लिंक असलेले बँक पासबुक, रेशन कार्ड, पॅन कार्ड

साहित्यनिहाय अतिरिक्त कागदपत्रे:
कडबाकुट्टी यंत्र: फळझाडांची नोंद असलेला ७/१२ उतारा किंवा तलाठ्यांचा दाखला.
रोटाव्हेटर, पलटी नांगर व पेरणी यंत्र: ट्रॅक्टरचे आर.सी. बुक (RC Book).
विद्युत पंप व डिझेल इंजिन: ७/१२ उताऱ्यावर विहिरीची नोंद, सिंचन सुविधेचा पुरावा व शेतीपंपाचे चालू वीज देयक.
स्लरी फिल्टर: पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचा जनावरे असल्याबाबतचा दाखला व वीज देयकाचा पुरावा.

दिव्यांग शेतकरी बांधवांसाठी: अर्जासोबत दिव्यांगत्वाचा अधिकृत पुरावा म्हणजेच ‘स्वावलंबन’ (UDID) दिव्यांग प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे.
महत्त्वाची नोंद:
योजनेचा विहित नमुन्यातील अर्ज पंचायत समिती मंगळवेढा समोरील झेरॉक्स सेंटरमध्ये उपलब्ध आहे. इच्छुकांनी परिपूर्ण भरलेला अर्ज व आवश्यक कागदपत्रे दिनांक २५ नोव्हेंबर २०२६ पर्यंत पंचायत समिती मंगळवेढा येथील ‘आवक-जावक’ विभागात जमा करायचे आहेत. अपूर्ण प्रस्ताव स्वीकारले जाणार नाहीत. अंतिम मुदतीची वाट न पाहता वेळेत अर्ज सादर करून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज








