मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क।
मूळ उत्पन्नापेक्षा तब्बल ४ कोटी ३७ लाख ८४ हजार ९३० रुपयांची अवैध संपत्ती भ्रष्ट मार्गाने बाळगल्याप्रकरणी तत्कालीन कृषी उपसंचालकासह त्याच्या पत्नीवर बंडगार्डन पोलिस स्टेशन, पुणे शहर येथे २ नोव्हेंबर रोजी ५ वाजता गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुण्याचे सहाय्यक पोलिस अधीक्षक सतीश वाळके यांनी माध्यमांना दिली.

तत्कालीन कृषी उपसंचालक, दक्षता पथक व तत्कालीन तंत्र अधिकारी, गुणनियंत्रण, खते संचालक, सध्या उपसंचालक, प्रकल्प संचालक कार्यालय, आत्मा, सोलापूरचे किरण श्यामराव जाधव यांच्याविरुद्ध महासंचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या आदेशानुसार उघड चौकशीचे आदेश प्राप्त झाले होते.

या उघड चौकशीदरम्यान ४ जून १९९४ ते २ डिसेंबर २०२५ या कालावधीत किरण जाधव यांनी त्यांच्या कायदेशीर उत्पन्नापेक्षा तब्बल ४ कोटी ३७ लाख ८४ हजार ९३० रुपयांची अतिरिक्त संपत्ती भ्रष्ट मार्गाने गोळा केल्याचे निष्पन्न झाले.

ही अपसंपदा धारण करण्यासाठी त्यांची पत्नी संगीता किरण जाधव यांनी त्यांना अपप्रेरणा दिल्याचे चौकशीत समोर आले आहे. याप्रकरणी बंडगार्डन पोलिस स्टेशन, पुणे शहर येथे २ नोव्हेंबर २०२६ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास अपर पोलिस अधीक्षक अर्जुन भोसले हे करीत आहेत. चौकशी अधिकारी म्हणून अपर पोलिस अधीक्षक अजित पाटील यांनी काम केले.

सोलापुरात सहा महिने सेवा
आत्माचे प्रकल्प उपसंचालक म्हणून किरण जाधव याची मागील वर्षी सोलापूर येथे बदली झाली होती. ते सुरुवातीला रुजू झाले नाहीत. डिसेंबर २५ मध्ये ते रुजू झाले व जून महिन्यांत सेवानिवृत्त झाले.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज













