मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्किंग।
शेतकऱ्यांची दिवाळी गोड व्हावी आणि शासनाकडून जाहीर करण्यात आलेली पाच हजार रुपयांची अग्रीम मदत वेळेत त्यांच्या खात्यावर जमा व्हावी, यासाठी मंगळवेढ्यातील महसूल यंत्रणा सुट्टीच्या दिवशीही कामाला लागली आहे.
शनिवारी शासकीय सुट्टी असतानाही तहसील कार्यालयात तहसीलदार मदन जाधव यांच्यासह महसूल विभागातील अधिकारी आणि कर्मचारी दिवसभर याद्या तपासणे, माहितीची पडताळणी करणे आणि ऑनलाइन अपलोड करण्याच्या कामात व्यस्त असल्याचे चित्र पाहायला मिळाले.

यंदाच्या पावसाळ्यात अपेक्षित पाऊस न झाल्याने खरीप आणि रब्बी हंगामाला मोठा फटका बसला आहे. पावसाअभावी शेती उत्पादनावर परिणाम झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.

या पार्श्वभूमीवर शासनाने सोलापूर जिल्ह्यात दुष्काळ जाहीर केला असून, दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर अग्रीम आर्थिक मदत म्हणून पाच हजार रुपये जमा करण्याचा निर्णय घेतला आहे.

तहसीलदारांसह ४० तलाठी कामावर
दिवाळी ६ नोव्हेंबरपासून सुरू होत असल्याने मदत वितरणाच्या प्रक्रियेला वेग देण्यात आला आहे. तहसीलदार मदन जाधव यांनी सुट्टीच्या दिवशीही मंडलाधिकारी आणि तलाठी यांना कार्यालयात उपस्थित राहण्याच्या सूचना दिल्या.

त्यानुसार दोन नायब तहसीलदार, सहा मंडलाधिकारी आणि ४० तलाठी या कामात सहभागी झाले आहेत. पात्र शेतकऱ्यांची माहिती तपासणे, त्रुटी दूर करणे आणि याद्या ऑनलाइन अपलोड करण्याची कार्यवाही युद्धपातळीवर सुरू आहे.

दोन नायब तहसीलदारांसह सहा मंडल अधिकारी आणि ४० तलाठी या कामात सहभागी झाले आहेत. पात्र शेतकऱ्यांची माहिती तपासणे, त्रुटी दूर करणे आणि याद्या ऑनलाईन अपलोड करण्याची कार्यवाही सुरू आहे.

दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आहेत. दिवाळीपूर्वी शासनाची आर्थिक मदत पात्र शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावी, हा आमचा प्राधान्यक्रम आहे. त्यासाठी सुट्टीचा विचार न करता महसूल विभागाचे सर्व अधिकारी व कर्मचारी समन्वयाने काम करीत आहेत. याद्यांची अचूक पडताळणी करून प्रक्रिया शक्य तितक्या लवकर पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न आहे.-मदन जाधव, तहसीलदार, मंगळवेढा.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज











