टीम मंगळवेढा टाईम्स (प्रतिनिधी):
मंगळवेढा शहरातून एक अत्यंत सुन्न करणारी घटना समोर आली आहे. एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलाने राहत्या घरातील पत्र्याच्या लाकडी वाशाला दोरीने गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवली.

अज्ञात कारणावरून घडलेल्या या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून मंगळवेढा पोलीस ठाण्यात याची नोंद करण्यात आली आहे.

घरातील दरवाजा आतून बंद करून टोकाचे पाऊल
मिळालेल्या पोलीस माहितीनुसार, फिर्यादी सचिन साळुंखे (रा. बुरुड गल्ली, मंगळवेढा) यांच्या मामांचा लहान मुलगा मयत सुमित सुरेश पवार (वय १६ वर्षे) याने इयत्ता ५ वी नंतर शाळा सोडली होती. तो सध्या घरीच राहत होता.

मंगळवार, २० ऑक्टोबर रोजी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास सुमित याने राहत्या घराचा दरवाजा आतून कडी लावून बंद केला आणि पत्र्याच्या लाकडी वाशाला दोरीच्या साहाय्याने गळफास घेतला.

उपचारापूर्वीच मृत्यू
काही वेळातच हा प्रकार कुटुंबियांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी आरडाओरड करत घराचा कडी-कोयंडा उचकटून आत प्रवेश केला. डब्यावर चढून तात्काळ चाकूच्या साहाय्याने गळफास घेतलेली दोरी कापून त्याला खाली उतरवण्यात आले.

मात्र तो बेशुद्ध अवस्थेत असल्याने कुटुंबियांनी तातडीने त्याला मंगळवेढा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी हलवले. तेथील डॉक्टरांनी तपासणी करून त्याला उपचारापूर्वीच मयत घोषित केले.
या दुर्दैवी घटनेने बुरुड गल्ली परिसरासह संपूर्ण शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे. अल्पवयीन मुलाने हे टोकाचे पाऊल नेमके का उचलले, याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. मंगळवेढा पोलीस ठाण्यात या प्रकरणाची नोंद झाली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज












