टीम मंगळवेढा टाईम्स (प्रतिनिधी):
पत्नी हयात असताना तिच्याच सख्ख्या बहिणीशी (मेहुणीशी) पळवून नेऊन दुसरे लग्न केल्याच्या रागातून सासऱ्याने साथीदारांसह जावयावर तलवार आणि दगडाने सपासप वार करून त्याचा जागीच निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

ही थरारक घटना खडकी (ता. मंगळवेढा) येथे घडली असून या प्रकरणी तिघांविरुद्ध मंगळवेढा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमकी घटना काय?
फिर्यादी मशीखान भारत गडहिरे (वय ३५, रा. सांगोला) यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांचे बंधू मयत किसन भारत गडहिरे (वय ३५, रा. आलेगाव, ता. सांगोला) यांनी पहिली पत्नी हयात असताना तिच्याच बहिणीला पळवून नेऊन तिच्याशी दुसरे लग्न केले होते. या प्रकरणावरून सासरच्या मंडळींच्या मनात किसन यांच्याबद्दल तीव्र राग आणि धुसफूस सुरू होती.

याच वादातून संशयित आरोपी अतुल धोंडीबा कसबे (वय ४८), सुशील कसबे (वय ३५) आणि एका अल्पवयीन मुलाने संगनमत करून किसन गडहिरे यांना खडकी येथे गाठले. तेथे तलवारीचे सपासप वार आणि दगडाने मारहाण करत त्यांच्या डोक्यात व तोंडावर गंभीर इजा पोहोचवून जागीच संपवले.

उपचारापूर्वीच मृत्यू
घटनेनंतर गंभीर जखमी झालेल्या किसन गडहिरे यांना तात्काळ मंगळवेढा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना उपचारापूर्वीच मयत घोषित केले. या घटनेमुळे खडकी परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

या प्रकरणी मंगळवेढा पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक विनोद लातुरकर या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज












