टीम मंगळवेढा टाईम्स । सलग तिसऱ्या दिवशी पेट्रोलियम कंपन्यांनी इंधन दरवाढीची हॅटट्रीक करून ग्राहकांना मोठा झटका दिला. आज मंगळवारी देशभरात पेट्रोल आणि डिझेल प्रती लीटर सरासरी 40 ते 60 पैशांनी वाढले. मुंबईत रविवारपासून पेट्रोल 1 रुपया 17 पैशांनी महागले आहे, तर डिझेलच्या दरामध्ये 1 रुपया 16 पैशांनी वाढ झाली आहे.
मुंबईत मंगळवारी पेट्रोलचा भाव 79.49 रुपये झाला, आज त्यात 58 पैशांची वाढ झाली. सोमवारी 78.91 रुपये आणि रविवारी तो 78.32 रुपये होता. डिझेलचा भाव 69.37 रुपयांपर्यंत वाढला. सोमवारी डिझेल 68.79 रुपये होते. आज मुंबईत डिझेल 58 पैशांनी महागले.
राज्य सरकारने नुकताच इंधनावरील व्हॅटच्या अधिभारात वाढ केली होती. त्यामुळे राज्यात पेट्रोल आणि डिझेल 2 रुपयांनी महागले होते. दिल्लीत आज पेट्रोलचा दर 72.46 रुपये प्रती लीटर झाला आहे. तर डिझेलचा दर 70.59 रुपये झाला आहे.
कोलकात्यात पेट्रोल 74.46 रुपये लीटर झाले असून त्यात सोमवारच्या तुलनेत 57 पैशांची वाढ झाली आहे. कोलकात्यात डिझेल दर 66.71 रुपये आहे.चेन्नईत पेट्रोल 40 पैशांनी महागले असून ग्राहकांना पेट्रोलसाठी 76.60 रुपये मोजावे लागतील. डिझेल भाव प्रती लीटर 69.25 रुपये आहे.
Petrol-diesel prices rose for third day in a row
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज