mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

राज्यात दोन टप्प्यात दुष्काळ जाहीर होणार? पहिल्या 139 तालुक्यांची यादी आली समोर; सोलापूर जिल्ह्यातील ‘या’ तालुक्यांचा समावेश

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
September 26, 2026
in मंगळवेढा, राज्य, सोलापूर

मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्किंग ।

राज्यातल्या दुष्काळावरून जोरदार राजकारण पेटलंय. मुख्यमंत्र्यांनी आता दुष्काळ जाहीर करण्याबाबतचा जीआर काढण्याची तारीख बदलली असल्यानं विरोधकांकडून टीका केली जातेय. त्याचदरम्यान दुष्काळाबाबत नवी अपडेट आलीय.

राज्यातील दुष्काळ दोन टप्प्यात जाहीर केला जाणार आहे. कृषी विभागाने हा अहवाल सरकारला सादर केलाय. दुसरीकडे, दुसरा ट्रिगर लागू करण्यासाठी या तालुक्यांची यादी ‘एमएनसीएफसी’ला (महालनोबिस राष्ट्रीय पीक अंदाज केंद्र) दिली आहे.

राज्यातील १३७ लाख हेक्टरपैकी सुमारे ९० लाख हेक्टरवरील खरीप पिके वाया गेली. पावसाने २१ दिवसांपेक्षा जास्त खंड पडलाय. सरासरीच्या ५० टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाल्याने १३९ तालुक्यांमध्ये दुष्काळाचा पहिला ट्रिगर लागू करण्यासारखी स्थिती आहे.

दुष्काळाचा पहिला ट्रिगर म्हणजे काय?

पहिला ट्रिगर निश्चित करण्यासाठी जून ते सप्टेंबरमधील सरासरी पाऊस विचारात घेतला जातो. पर्जन्यमानाचे विचलन, पावसातील खंड व जून-जुलैमधील सरासरी पर्जन्यमानाची टक्केवारी लक्षात घेतलं जाते.

यानुसार २७ जिल्ह्यांमधील १३९ तालुक्यांमध्ये पावसाचा खंड २१ दिवसांपेक्षा जास्त आहे. हलक्या जमिनीसाठी किमान २१ दिवसांचा आणि भारी जमिनीसाठी २८ दिवसांचा खंड विचारात घेतला जात असतो.

जिल्हानिहाय जमिनीचे वर्गीकरण करून त्यानुसार हलकी व भारी जमिनीतील खंड विचारात घेत तालुक्यांची संख्या निश्चित करावे लागेल असं ‘कृषी’च्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

सात जिल्ह्यांत ५० टक्क्यांपेक्षा कमी आणि १७५ तालुक्यांमध्ये सरासरीच्या ७५ टक्केसुद्धा पाऊस झाला नसल्याचे अहवालात म्हटलंय. या अहवालानुसार राज्यातील १७५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर होऊ शकतो.

‘पहिल्या ट्रिगर’चे विभागीयनिहाय तालुके, येथे जाहीर होणार दुष्काळ

पुणे विभाग :

पुणे जिल्ह्यातील हवेली, भोर, वेल्हे, खेड, राजगुरूनगर, शिरूर घोडनदी, बारामती, इंदापूर, दौंड, पुरंदर सासवड. सोलापुरातील बार्शी, मोहोळ, करमाळा, सांगोला, माळशिस, मंगळवेढा.

ठाणे विभाग :

ठाण्यातील कल्याण, मुरबाड, भिवंडी, शहापूर, उल्हासनगर, अंबरनाथ. रायगडमधील पनवेल, कर्जत, पेण. पालघर जिल्ह्यातील वडाळा डहाणू, तलासरी, विक्रमगड.

अहिल्यानगरमधील पारनेर, श्रीगोंदा, कर्जत, जामखेड, शेगाव, पाथर्डी, नेवासा, राहुरी, संगमनेर, अकोला, कोपरगाव, श्रीरामपूर, राहाता.

नाशिक विभाग :

नाशिकमधील इगतपुरी, मालेगाव, बागलाण, कळवण, नांदगाव, सुरगणा, सिन्नर, येवला, देवळी. धुळ्यातील धुळे शिक्री, शिरपूर, शिंदखेडा. नंदुरबारमधील नंदुरबार, नवापूर, शहादा, तळोदा, अकराणी. जळगावमधील जळगाव, भुसावळ, यावल, रावेर, इदलाबाद, मुक्ताईनगर, अमळनेर, चोपडा, एरंडोल, पारोळा, जामनेर, पाचोरा, भांडगाव, धरणगाव, बोधवाडा.

कोल्हापूर विभाग :

साताऱ्यातील पाटण, खटाव-वडूज, माण-दहिवडी, फलटण, खंडाळा. सांगलीतील मिरज, आटपाडी, कवठेमहांकाळ. कोल्हापूरमधील चंदगड, राधानगरी.

छत्रपती संभाजीनगर विभाग :

छत्रपती संभाजीनगर, पैठण, गंगापूर, कन्नड, शिल्लोड, सोयगाव. जालन्यातील अंबड, परतूर, बदनापूर, घनसांगवी, मंठा. बीडमधील अष्टी, गेवराई, माजलगाव, परळी, धारूर, शिरूर कासार.

लातूर विभाग :

लातूरमधील रेनापूर, धाराशिवमधील धाराशिव, तुळजापूर, परांडा, भूम. परभणीतील पाथरी, मानवत.

अमरावती विभाग :

बुलढाण्यातील जळगाव जामोद, बुलढाणा, मेहकर, लोणार, खामगाव, शेगाव, मलकापूर, मोताळा, नांदुरा. अकोल्यातील बाळापूर, पातूर, अकोला, बार्शीटाकळी. वाशिममधील मंगरूळपीर, मानोरा, कारंजा. अमरावतीतील भातकुली, दर्यापूर. यवतमाळमधील दारवा.

नागपूर विभाग :

वर्धा जिल्ह्यातील वर्धा, देवळी. गोंदियातील तिरोडा, सेकसी. गडचिरोलीतील कुरखेडा, धानोरा व इटापल्ली.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

संबंधित बातम्या

मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

मोठी बातमी! दुष्काळाच्या झळा; दोन शेतकऱ्यांनी गमावला जीव, लातूर आणि सोलापूर जिल्ह्यातील धक्कादायक घटना

September 26, 2026
कै.आण्णासाहेब पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त मंगळवेढयात विविध कार्यक्रम; सामाजिक कार्याबद्दल ‘यांना’ पुरस्कार जाहीर

कै.आण्णासाहेब पाटील यांच्या जयंतीनिमित्त मंगळवेढ्यात आज पुरस्कार सोहळा; आमदार आवताडेंच्या हस्ते होणार सन्मान; पाहा कोणा-कोणाला मिळणार मानाचा ‘समाजभूषण पुरस्कार’?

September 25, 2026
पावसाचा कहर! उजनीतून दीड लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग, भीमाकाठी सावधानतेचा इशारा 

घरात तहान, पाणी कर्नाटकच्या दारात! उजनी कालवाच्या गळतीमुळे मंगळवेढ्यातील शेतकरी संकटात; पाटबंधारे विभागाविरोधात संताप

September 24, 2026
अनाथ, वंचितांच्या आयुष्याला मायेची सावली: निंबोणीचे ‘सहारा बाल सेवा आश्रम’ ठरतेय निराधार चिमुकल्यांचे हक्काचे घर; ​शासकीय अनुदानाविना केवळ लोकवर्गणीतून उभा राहतोय मानवतेचा वसा

अनाथ, वंचितांच्या आयुष्याला मायेची सावली: निंबोणीचे ‘सहारा बाल सेवा आश्रम’ ठरतेय निराधार चिमुकल्यांचे हक्काचे घर; ​शासकीय अनुदानाविना केवळ लोकवर्गणीतून उभा राहतोय मानवतेचा वसा

September 24, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

आमदार समाधान आवताडेंचा मास्टरस्ट्रोक! प्रशासकीय कामांसाठी सोलापूरला जाण्याची कटकट संपली; पंढरपूरला अपर जिल्हाधिकारी कार्यालय मंजूर; ‘या’ सात तालुक्यांना मोठा दिलासा

September 23, 2026
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

माझ्या मुलीला का नांदवत नाही?’ जावयाला रस्त्यावर पाडून दगडाने ठेचले; सासऱ्याचा मंगळवेढ्यात थरारक राडा; सासू, सासरे आणि पत्नीवर पोलीस कारवाई

September 25, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

धक्कादायक! काळ्या आईची सेवा करतानाच काळाची झडप; मंगळवेढ्यात सर्पदंशाने शेतकऱ्याचा मृत्यू

September 24, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी मोठा निर्णय! सोलापूर जिल्हा परिषदेच्या शाळांचा होणार कायापालट; वाचा सविस्तर योजना

September 22, 2026
शेतकऱ्यांना पीक कर्ज नाकारणाऱ्या बँकांची आता गय नाही; जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन स्वतः करणार अर्जांची तपासणी; ‘या’ ४ बँकांना नोटिसा

समाज माध्यमावरील व्हायरल दुष्काळग्रस्त तालुक्यांची यादी खोटी; अफवांवर विश्वास ठेवू नका; जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

September 22, 2026
Next Post
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

मोठी बातमी! दुष्काळाच्या झळा; दोन शेतकऱ्यांनी गमावला जीव, लातूर आणि सोलापूर जिल्ह्यातील धक्कादायक घटना

ताज्या बातम्या

मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

मोठी बातमी! दुष्काळाच्या झळा; दोन शेतकऱ्यांनी गमावला जीव, लातूर आणि सोलापूर जिल्ह्यातील धक्कादायक घटना

September 26, 2026

राज्यात दोन टप्प्यात दुष्काळ जाहीर होणार? पहिल्या 139 तालुक्यांची यादी आली समोर; सोलापूर जिल्ह्यातील ‘या’ तालुक्यांचा समावेश

September 26, 2026
कै.आण्णासाहेब पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त मंगळवेढयात विविध कार्यक्रम; सामाजिक कार्याबद्दल ‘यांना’ पुरस्कार जाहीर

कै.आण्णासाहेब पाटील यांच्या जयंतीनिमित्त मंगळवेढ्यात आज पुरस्कार सोहळा; आमदार आवताडेंच्या हस्ते होणार सन्मान; पाहा कोणा-कोणाला मिळणार मानाचा ‘समाजभूषण पुरस्कार’?

September 25, 2026
पावसाचा कहर! उजनीतून दीड लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग, भीमाकाठी सावधानतेचा इशारा 

घरात तहान, पाणी कर्नाटकच्या दारात! उजनी कालवाच्या गळतीमुळे मंगळवेढ्यातील शेतकरी संकटात; पाटबंधारे विभागाविरोधात संताप

September 24, 2026
अनाथ, वंचितांच्या आयुष्याला मायेची सावली: निंबोणीचे ‘सहारा बाल सेवा आश्रम’ ठरतेय निराधार चिमुकल्यांचे हक्काचे घर; ​शासकीय अनुदानाविना केवळ लोकवर्गणीतून उभा राहतोय मानवतेचा वसा

अनाथ, वंचितांच्या आयुष्याला मायेची सावली: निंबोणीचे ‘सहारा बाल सेवा आश्रम’ ठरतेय निराधार चिमुकल्यांचे हक्काचे घर; ​शासकीय अनुदानाविना केवळ लोकवर्गणीतून उभा राहतोय मानवतेचा वसा

September 24, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

आमदार समाधान आवताडेंचा मास्टरस्ट्रोक! प्रशासकीय कामांसाठी सोलापूरला जाण्याची कटकट संपली; पंढरपूरला अपर जिल्हाधिकारी कार्यालय मंजूर; ‘या’ सात तालुक्यांना मोठा दिलासा

September 23, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..