mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

मंगळवेढ्यात मासे धरण्यासाठी गेलेला कॉलेजकुमार पाण्यात गेला वाहून, रेस्क्यू टीमला पाचारण; शोधकार्य सुरु

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2020
in Uncategorized
मंगळवेढ्यात मासे धरण्यासाठी गेलेला कॉलेजकुमार पाण्यात गेला वाहून, रेस्क्यू टीमला पाचारण; शोधकार्य सुरु

 

टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा तालुक्‍यातील ममदाबाद हु.वरून शिरनांदगी तलावाकडे जाणाऱ्या ओढ्यात मासे धरण्यासाठी गेल्या तिघापैकी प्रवाहाचा अंदाज न आल्यामुळे 20 वर्षीय उच्चशिक्षित अभियंता तरुण अनिल जगन्नाथ इंगोले वाहून गेल्याची घटना मंगळवेढा तालुक्‍यातील महमदाबाद हु येथे घडली आहे. पाण्यात वाहून जाण्याची या पंधरवड्यातील तालुक्‍यातील तिसरी घटना आहे.


याबाबत सविस्तर माहिती अशी की, महमदाबाद परिसरात असणारे सिमेंट बंधारे गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या म्हैसाळच्या पाण्याने तुडुंब भरले आहेत.

अशा परिस्थितीत काल गेल्या दोन दिवसांत जोरदार पर्जन्यवृष्टी झाल्यामुळे हे ओढे भरून वाहू भरून वाहू लागले आहेत. अशा वाहत्या पाण्यात मासे पकडण्यासाठी तिघे जण गेले होते.

पण वेगात वाहणाऱ्या पाण्याचा अंदाज न आल्यामुळे अनिल इंगोले हा युवक वाहून गेला. शंकर शिरसागर याने इतर दोघांना वाचवले. दरम्यान घटनास्थळी बघ्यांची गर्दी मोठ्या प्रमाणात झाली असून उपस्थित नातेवाईकांनी त्याचा आरडाओरड करून शोधाशोध करण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान या घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक ज्योतिराम गुंजवटे यांना मिळाली. त्यांनी सायंकाळच्या वेळी अंधारात शोध कार्य करण्यास अडथळा येत असल्यामुळे रेस्क्‍यू पथकाला पाचारण केले.

हुन्नुर ते ममदाबाद हु रस्त्यावर असणाऱ्या या पुलावरील संरक्षक कठड्याच्या वरून पाणी जात असल्यामुळे या पुलावरून सध्या वाहतूक करणे धोकादायक आहे.

अशा परिस्थितीत या भागातील नागरिक धोकादायक वाहतूक करीत आहेत. सध्या या पुलावर संरक्षक कठडे बसण्याची आवश्‍यकता असल्याची मागणी या भागातील नागरिकांतून होत आहे.

पंधरा दिवसात तीन घटना; चार जण मृत्युमुखी..


सध्या बेसुमार पावसामुळे भीमा, माण नद्यासह गावोगावच्या ओढे नाल्याने आक्राळ विक्राळ रूप धारण केले आहे. नद्या पात्राबाहेर येऊन वाहत आहेत गत महिन्यात तळसंगी येथे शेततळ्यात पाणी वाढल्याने त्याचा अंदाज न आल्याने तीन बालकाचा मृत्यू झाल्याची घटना दि १७ सप्टेंबर रोजी घडली त्यानंतर माण नदी ला पूर आल्याने मारापूर येथील सेवानिवृत्त लाईनमन बंधाऱ्यात वाहून गेल्याने दि १९ सप्टेंबर रोजी ते मृत्युमुखी पडले.


त्यानंतर गेल्या दोन दिवसांपासून बेसुमार झालेल्या पावसाने महदाबाद ( हु) वरून शिरनांदगी तलावाकडे जाणाऱ्या ओढ्यातील पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज न आल्यामुळे २५ वर्षीय उच्चशिक्षित तरुण अनिल जगन्नाथ इंगोले वाहून गेल्याची घटना गुरुवारी घडली या घटना पाहता नागरिकांनी या पूर परिस्थितीत मोठी काळजी घेण्याची गरज आहे.

Mangalwedha The college boy who went fishing went into the water carrying, calling the rescue team;  Search begins

राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9561617373 हा आमचा नंबर.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: MangalWedhaSolapur

संबंधित बातम्या

सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

खळबळ! मुलीच्या लग्नासाठी बुक केलेले सोन्याचे दागिने न देता चार लाखांची फसवणूक; विधवा महिलेची पोलीस ठाण्यात धाव; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

January 1, 2026

1 april to 9 april birthday

March 31, 2023

आठ मार्च वाढदिवस

March 8, 2023

प्रा.शिवाजीराव काळुंगे सर वाढदिवस

March 6, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

पालकांनो! दहावी निकालाच्या तारखेची अद्याप घोषणा नाही; विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला

June 15, 2022
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

July 21, 2021
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही! खत विकेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू; शेतकरी संघटना गप्प का?

July 12, 2021
रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे : मुजम्मील काझी

केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढ न थांबवलेस राष्ट्रवादी पद्धतीत अंदोलन करू; मुजम्मील काझी यांचा इशारा

May 17, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

मंगळवेढेकरांनो नीट समजून घ्या! शहरात दुकानासाठी पुर्वीचेच नियम लागू असतील; विनाकारण बाहेर पडाल तर…

May 17, 2021
Next Post
सोलापूर! चोरीच्या संशयावरून झाडाला उलटं लटकवून जमावानं केला तरूणाचा खून

सोलापूर! चोरीच्या संशयावरून झाडाला उलटं लटकवून जमावानं केला तरूणाचा खून

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मोठी बातमी! उपसा सिंचन योजनेच्या कामाचे निघाले टेंडर; आ.आवताडे यांच्या प्रयत्नामुळे प्रत्यक्षात कामाला लवकरच होणार सुरुवात

शेतकऱ्यांना अधिक स्थिर वीजपुरवठा मिळणार, सर्व शेतीपंप फिडरवरील कृषी ग्राहकांना थेट लाभ होणार; ‘या’ योजनेचा आमदार आवताडे यांनी घेतला आढावा

March 3, 2026
मोठी बातमी! मंगळवेढ्यात नगरसेवक पदासाठी आज भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्षाकडून अर्ज दाखल; नगराध्यक्षपदासाठी ‘इतके’ अर्ज; मतदारांमध्ये उत्सुकता वाढली

सोलापूर झेडपीत ट्विस्ट! अध्यक्षपदाची माळ गळ्यात पडण्यापूर्वीच दावेदाराने झटकले हात; सोलापूरच्या राजकारणात खळबळ

March 3, 2026
सोलापुरात चोरट्यांची नवी शक्कल!  खिडकीतून बांबूच्या साह्याने केली चोरी

खळबळ! घराचा दरवाजा पुढे करुन कुटूंबिय झोपले, चोरट्याने घरात प्रवेश करुन 62 हजारांचा मुद्देमाल नेला चोरुन; ‘या’ गावात चोरट्याने हातोहात शेळी पळविली; मंगळवेढा तालुक्यातील प्रकार

March 3, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

​धक्कादायक! ऐन उमेदीच्या काळात तरुणीने संपवले जीवन; मंगळवेढा हादरले

March 2, 2026
चल ग सखे पंढरीला…! आषाढी यात्रेसाठी आज मंगळवेढ्यातून एसटीच्या मोफत पाच फेऱ्या; दोन विठ्ठल भक्तांची भाविकांसाठी केले आयोजन

एसटीच्या तिकीटाबाबत शासनाचा युटर्न! ज्येष्ठ नागरिक, महिला, दिव्यांग प्रवाशांना मोठा दिलासा; NCMC कार्डबाबत दिलं स्पष्टीकरण

March 3, 2026
मंगळवेढेकरांसाठी गुढीपाडवा धमाका! सम्राट मोटर्सची मोठी ऑफर; चक्क ९९,९९९ रुपयांत ३ ई-बाईक्स

मंगळवेढेकरांसाठी गुढीपाडवा धमाका! सम्राट मोटर्सची मोठी ऑफर; चक्क ९९,९९९ रुपयांत ३ ई-बाईक्स

March 1, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा