मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्किंग ।
नागरिकांच्या आरोग्याशी आणि विशेषतः लहान मुलांच्या जीवाशी खेळणाऱ्या दूध, दुग्धजन्य पदार्थ भेसळखोरांवर संघटित गुन्हेगारी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावेत, अशा सूचना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासनाला दिल्या.
सह्याद्री अतिथीगृह येथे काल बैठक झाली. बैठकीला आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर, विधी व न्याय राज्यमंत्री आशिष जयस्वाल, अन्न व औषध प्रशासन राज्यमंत्री योगेश कदम, उपमुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव असीम गुप्ता, प्रधान सचिव नविन सोना, विधी व न्याय विभागाचे सचिव उदय शुक्ला, अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यासह संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

भेसळखोर थेट लहान मुलांच्या आयुष्याशी खेळतायेत, मकोका लावा, गय करू नका
अन्नात भेसळ करणे हा केवळ साधा गुन्हा नसून तो थेट नागरिकांच्या जीवाशी खेळ आहे. लहान मुले मोठ्या प्रमाणावर दूध पितात, बनावट पनीर आणि भेसळयुक्त अन्नपदार्थांमुळे कर्करोग सारख्या दुर्धर आजाराला तोंड द्यावे लागू शकते.

भेसळखोर थेट या लहान मुलांच्या आयुष्याशी खेळत आहेत. अशा प्रकारचे कृत्य करणाऱ्या समाजकंटकांवर कोणत्याही प्रकारची नरमाई न दाखवता अशा गुन्हेगारांवर ‘मकोका’ अंतर्गत कारवाई करून त्यांच्यावर जरब बसवावा, असे त्यांनी सांगितले.

अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्यात यावा, म्हणजे कायदेशीर पळवाटा मिळणार नाही
या भेसळखोरांवर कारवाई करताना त्यांचेवर अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्यात यावा, जेणेकरून त्यांना कायदेशीर पळवाटा मिळणार नाहीत, अशा सूचनाही एकनाथ शिंदे यांनी दिल्या. तसेच, या प्रकरणांमधील कायदेशीर प्रक्रिया अधिक बळकट करण्यासाठी विशेष पावले उचलण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

ज्यांच्यावर कारवाई होते, त्यांच्या खटल्यांचे कामकाज न्यायालयात सुरू असताना कोणतीही कायदेशीर त्रुटी उरता कामा नये. यासाठी नामवंत व ज्येष्ठ विधीतज्ज्ञांची मदत घेण्यात यावी आणि यासाठी तातडीने एक विशेष लीगल टीम तयार करण्यात यावी, असेही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज














