मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्किंग ।
राज्यात जबरदस्तीने आणि आमिष दाखवून होणारे धर्मातर रोखण्यासाठी राज्य विधिमंडळाने मंजूर केलेला ‘महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा, २०२६’ अखेर राज्यात लागू झाला आहे.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या मंजुरीनंतर ३० जुलै रोजी अधिकृत राजपत्रात (गॅझेट) हा कायदा प्रकाशित झाला आणि त्याच तारखेपासून तो अमलात आला, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

हा कायदा लागू झाल्यामुळे आता राज्यातील बेकायदेशीर धर्मातराच्या प्रकरणांमध्ये नवीन कायद्यातील तरतुदींनुसार कठोर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. राज्य विधिमंडळाच्या मार्च २०२६ मधील अर्थसंकल्पीय अधिवेशनात दोन्ही सभागृहात या कायद्याचे विधेयक मंजूर झाले होते.

कायद्याची वैशिष्ट्ये
दोषी आढळलेल्या संस्थांवर बंदी व दंडाची तरतूद.
कायद्याचे उल्लंघन केल्यास सात वर्षापर्यंतचा कारावास, पाच लाख रुपयांचा दंड आणि पुन्हा गुन्हा करणाऱ्यांसाठी १० वर्षापर्यंत शिक्षा वाढू शकते.

धर्मातरापूर्वी दंडाधिकाऱ्यांना ६० दिवस आधी सूचना देणे अनिवार्य.
धर्मांतरित व्यक्तीचे पालक, भावंडे आणि इतर नातेवाईक यांना तक्रार करण्याचा अधिकार.

कायद्याला आव्हान देणार : प्रकाश आंबेडकर
या कायद्याला उच्च न्यायालयात आव्हान देण्याचा इशारा वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे. कुणी कोणता धर्म मानायचा हा सरकारच्या परवानगीचा विषय नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज















