मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क।
आगामी आषाढी वारी शांततापूर्ण, सुरक्षित व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडावी तसेच कोणताही अनुचित प्रकार घडल्यास त्यास तातडीने व प्रभावीपणे प्रतिसाद देता यावा, यासाठी मंगळवेढा बसस्थानक परिसरात सोमवारी दहशतवादविरोधी मॉक ड्रिल (रंगीत तालीम) घेण्यात आली.
पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी व अपर पोलिस अधीक्षक कबाडे यांच्या सूचनेनुसार ही रंगीत तालीम आयोजित करण्यात आली.

उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. बसवराज शिवपुजे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मॉकड्रिल पार पडली. संभाव्य दहशतवादी हल्ला किंवा इतर आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास नागरिकांचे संरक्षण, परिसर सुरक्षित करणे, संशयितांवर नियंत्रण मिळविणे तसेच विविध यंत्रणांमध्ये समन्वय साधण्याचा प्रत्यक्ष सराव करण्यात आला.

या रंगीत तालीममध्ये मंगळवेढा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दत्तात्रय बोरिगिड्डे, दोन पोलिस अधिकारी, दहा पोलिस अंमलदार, आरसीपी पथक, क्यूआरटी पथक, बीडीएस पथक, एटीबी शाखा व सुरक्षा शाखेच्या अंमलदारांनी सहभाग घेतला.

आपत्कालीन परिस्थितीला तातडीने व प्रभावीपणे प्रतिसाद देता यावा, यासाठी विविध पथकांच्या समन्वयातून मॉक ड्रिल घेण्यात आले.

वारकऱ्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य असून, नागरिकांनीही अफवांवर विश्वास न ठेवता संशयास्पद हालचाली आढळल्यास त्वरित पोलिसांना माहिती द्यावी.-डॉ. बसवराज शिवपुजे,उपविभागीय पोलिस अधिकारी, मंगळवेढा.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज














