टीम मंगळवेढा टाईम्स।
शिक्षण प्रसारक मंडळ, मंगळवेढा संचलित इंग्लिश स्कूल मंगळवेढा या प्रशालेची विद्यार्थिनी स्वर्णश्री धनंजय पाटील हिने इयत्ता दहावीच्या बोर्ड परीक्षेत पुनर्मूल्यांकनानंतर १०० टक्के म्हणजेच ५०० पैकी ५०० गुण मिळवून महाराष्ट्रात प्रथम क्रमांक पटकावण्याचा पराक्रम केला.
या अभूतपूर्व यशामुळे स्वर्णश्रीने मंगळवेढा तालुक्याच्या आणि संस्थेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

मार्च २०२६ मध्ये झालेल्या दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल ८ मे रोजी जाहीर झाला होता. या निकालात स्वर्णश्रीला २९.८० टक्के (४९९ गुण) मिळाले होते. परंतु, आपल्याला १०० टक्के गुण मिळतील, असा दृढ आत्मविश्वास स्वर्णश्रीला होता.
केवळ समाजशास्त्र विषयात तिचा एक गुण कमी झाला होता. प्रशालेचे प्राचार्य रवींद्र काशिद व विषय शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली तिने समाजशास्त्र या विषयाच्या पुनर्मूल्यांकनासाठी दहावी बोर्डाकडे रीतसर अर्ज केला होता. नुकत्याच जाहीर झालेल्या पुनर्मूल्यांकनाच्या निकालात स्वर्णश्रीच्या आत्मविश्वासाला यश आले.

तिच्या समाजशास्त्र विषयात एक गुण वाढून तिला १०० पैकी १०० गुण प्राप्त झाले आहेत. यामुळे तिचा एकूण निकाल १०० टक्के झाला असून, ती बोर्डात राज्यात पहिली आली असल्याचे बोर्डाने अधिकृत पत्राद्वारे कळविले आहे.

स्वर्णश्रीने गणित व समाजशास्त्र विषयात १०० पैकी १०० आणि संस्कृत विषयात ५० पैकी ५० गुण मिळवले आहेत. स्वर्णश्री सोबतीलाच श्रेयस भास्कर चव्हाण याला विज्ञान विषयात तीन गुण वाढल्याने २७.४० टक्के गुणांसह त्याने प्रशालेत द्वितीय क्रमांक पटकावला.

ओम उमेश माळी याचेही सायन्स विषयात तीन गुण वाढून ९६.२० टक्के गुण झाले आहेत. या दोन्ही विद्यार्थ्यांना विज्ञान भाग-२ मध्ये ५० पैकी ५० गुण मिळाले. तसेच दीप्ती दत्ता मासाळ हिने गणित विषयात १०० पैकी १०० गुण प्राप्त केले. यावर्षी प्रशालेतील तब्बल ३६ विद्यार्थ्यांनी २० टक्केपेक्षा जास्त गुण मिळवले असून विशेष प्राविण्यासह १४७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

या अद्वितीय यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष अॅड. सुजित कदम, उपाध्यक्ष डॉ. सुभाष कदम, डॉ. मिनाक्षी कदम, सचिव डॉ. प्रियदर्शिनी महाडिक, संचालिका प्रा. तेजस्विनी कदम, सहसचिव श्रीधर भोसले, प्राचार्य रवींद्र काशिद, उपमुख्याध्यापक सुनील नागणे, पर्यवेक्षक सुहास माने व सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज









