टीम मंगळवेढा टाईम्स । कोरोनामुळे सर्व उद्योग बंद असल्यामुळे सर्वसामान्य नागरिक मोठ्या आर्थिक अडचणीत सापडला आहे. यामुळे शासनाने व रिझर्व्ह बँकेने फायनान्स कंपन्यांना हप्ते वसूल करण्याचे निर्देश दिले आहेत परंतु सोलापूर शहर तसेच जिल्ह्यात काही फायनान्स कंपन्यांकडून हप्ते वसूल करण्यासाठी तगादा लावला आहे. (Bajaj Finances office in Solapur was blackmailed)
याच्या निषेधार्थ प्रहार संघटनेच्या वतीने बजाज फायनान्सच्या कार्यालयाला काळे फासून आंदोलन करण्यात आले. अगोदरच आर्थिक अडचणीत सापडलेल्या सर्वसामान्यांना फायनान्स कंपन्यांकडून जणू लुटण्याचा प्रयत्न होत आहे.
असा आरोप करत गुरुवारी प्रहार संघटनेच्या वतीने बजाज फायनान्स कंपनीच्या कार्यालयाला काळे फासून त्यांच्याकडून निषेध केला. याप्रसंगी दत्त मस्के ,महेश शिंगाडे , जमीर शेख मुस्ताक शेतसंधी,मुदस्सर हुंडेकरी आदी प्रहारचे कार्यकर्ते उपस्थित होते.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज