टीम मंगळवेढा टाईम्स । पंढरपूर तालुक्यामध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मजुरांना हक्काचा रोजगार मिळावा यासाठी महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून तालुक्यात ६१ कामे सुरु आहेत. या कामांवर ३०९ मजूर काम करीत असल्याची माहिती तहसीलदार वैशाली वाघमारे यांनी दिली. (Pandharpur 309 laborers working on 61 works)
लॉकडाऊनच्या काळात परराज्य व परजिल्ह्यातून स्वगृही परतलेल्या मजुरांनाही महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गत रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे . जास्तीतजास्त मजुरांच्या हाताला काम देण्यासाठी राज्य शासनाने रोहयोची कामे सुरु करावीत, असे निर्देश प्रशासनाला दिले आहेत.
त्या अनुषंगाने तालुक्यात २८ गावांमध्ये महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतून सिंचन विहिरीची २२ कामे , घरकुलांची १५ कामे तर रेशीमची २४ अशी ६१ कामे सुरु असल्याची माहिती तहसीलदार वाघमारे यांनी दिली.
कामावरील मजुरांची नोंदणी करुन खात्यातच मजुरीची रक्कम जमा होत असल्याने त्यांना आर्थिक हातभार लागत आहे. मजुरांच्या मागणीप्रमाणे मजुरांना तत्काळ कामे उपलब्ध करुन देण्याची दक्षता घेण्यात येत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कामावर सूचनांचे पालन करण्यात येत असल्याचेही वाघमारे यांनी सांगितले.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज