mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

कामाची बातमी! मोदी सरकारचा 10 हजार रुपये पेन्शन देण्याचा विचार; ‘या’ लोकांना होणार मोठा फायदा

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
April 24, 2026
in राष्ट्रीय
मोठी बातमी! केंद्र सरकारचा ऊस उप्तादक शेतकऱ्यांना दिलासा, महिला सुरक्षेवर भर, मोदी कॅबिनेटमधील पाच मोठे निर्णय

मंगळवेढा टाईम्स न्युज। 

केंद्र सरकार असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी सामाजिक सुरक्षा अधिक बळकट करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे. वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर निवृत्तीनंतरचा खर्च भागवणे कठीण होत असल्याने अटल पेन्शन योजनेत दिल्या जाणाऱ्या मासिक पेन्शनची कमाल मर्यादा वाढवण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे.

सध्या 5,000 पर्यंत मर्यादित असलेली ही रक्कम भविष्यात 8,000 ते 10,000 प्रति महिना इतकी वाढवण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

भारतातील सुमारे 90 टक्के कामगार असंघटित क्षेत्रात कार्यरत आहेत. यात फेरीवाले, घरगुती कामगार, मजूर, तसेच लहान व्यावसायिक आणि स्वयंरोजगार करणाऱ्यांचा मोठा समावेश होतो.

या वर्गाला निश्चित वेतन, नोकरीची हमी किंवा भविष्य निर्वाह निधी, पेन्शन, सवेतन रजा यांसारख्या सुविधा उपलब्ध नसतात.

त्यामुळे वृद्धापकाळात आर्थिक आधार देण्यासाठी अशा योजनांचे महत्त्व अधिक वाढते.

रक्कम अपुरी पडत असल्याचे सरकारच्या निदर्शनास

अटल पेन्शन योजना 2015 मध्ये सुरू करण्यात आली होती. या योजनेचा उद्देश असंघटित क्षेत्रातील नागरिकांना 60 वर्षांनंतर निश्चित मासिक उत्पन्न उपलब्ध करून देणे हा आहे.

सध्या या योजनेत 1,000 ते 5,000 दरम्यान मासिक पेन्शन दिली जाते. मात्र, वाढत्या जीवनमान खर्चामुळे ही रक्कम अपुरी पडत असल्याचे सरकारच्या निदर्शनास आले आहे.

सध्याच्या घडीला या योजनेत 9 कोटींपेक्षा अधिक सदस्य नोंदणीकृत आहेत. मात्र, त्यातील जवळपास निम्मे सदस्य नियमितपणे हप्ते भरत नसल्याचे दिसून आले आहे.

आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये आतापर्यंत सुमारे 1.35 कोटी नवीन सदस्यांनी योजनेत प्रवेश केला आहे. पेन्शनची मर्यादा वाढविल्यास नवीन सदस्यांना आकर्षित करता येईल आणि जुने सदस्य पुन्हा सक्रिय होतील, असा सरकारचा अंदाज आहे.

या संदर्भात वित्त मंत्रालय आणि पेन्शन नियामक प्राधिकरण (PFRDA) संयुक्तपणे प्रस्तावावर काम करत आहेत. या योजनेला अधिक व्यवहार्य आणि आकर्षक बनवण्यासाठी बदल करण्यावर भर दिला जात आहे. एका अधिकाऱ्याने सांगितले की, “वाढत्या खर्चाचा विचार करून योजनेत आवश्यक ते बदल करणे गरजेचे आहे.”

योजनेच्या सुरुवातीच्या काळात, म्हणजे 31 मार्च 2016 पूर्वी नोंदणी केलेल्या पात्र सदस्यांना सरकारकडून पाच वर्षांसाठी सह-योगदान देण्यात येत होते. हे योगदान सदस्याच्या भरलेल्या रकमेच्या 50 टक्क्यांपर्यंत (कमाल 1,000 प्रतिवर्ष) मर्यादित होते.

मात्र, ही सुविधा फक्त आयकर न भरणाऱ्या आणि इतर कोणत्याही सामाजिक सुरक्षा योजनेचा लाभ न घेणाऱ्या नागरिकांसाठी होती.

योजनेचा विस्तार ग्रामीण भागात अधिक प्रभावीपणे करण्याचा विचार

सरकार या योजनेचा विस्तार ग्रामीण भागात अधिक प्रभावीपणे करण्याचा विचार करत आहे. ‘पेन्शन सखी’ आणि बिझनेस कॉरेस्पॉन्डंट (BC) यांच्या माध्यमातून ही योजना खेड्यापाड्यांपर्यंत पोहोचवण्याचे नियोजन आहे.

26 जानेवारी 2026 रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीतही ही योजना पुढे चालू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असून, प्रचार, जागरूकता आणि निधी व्यवस्थापनासाठी विविध उपाययोजना राबवण्यात येणार आहेत.

महत्त्वाचे म्हणजे, या बदलांमुळे सरकारी तिजोरीवर मोठा अतिरिक्त भार पडणार नसल्याचे प्रशासनाचे मत आहे. कारण अटल पेन्शन योजना ही प्रामुख्याने सदस्यांच्या योगदानावर आधारित आहे. या योजनेचा मुख्य उद्देश नागरिकांना सुरक्षित आणि स्थिर आर्थिक आधार उपलब्ध करून देणे हा असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: मोदी सरकार पेन्शन

संबंधित बातम्या

सोलापूर ग्रामीणमध्ये आज 244 जण कोरोनामुक्त, 223 नवे रुग्ण; वीस वर्षीय तरुणीचा मृत्यू

मोठी बातमी! कोरोनानंतर आता पुन्हा एका आजाराने डोके काढले वर; रुग्णांची संख्या वाढतेय झपाट्याने, गेल्या 24 तासांत…

August 26, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

धक्कादायक! शिक्षिकेने ६ वर्षांच्या विद्यार्थ्याच्या कानशिलात लगावली; पुढच्याच क्षणी चिमुकल्याचा जागीच तडफडून मृत्यू

August 22, 2026
मंगळवेढ्याचा शूर सुपुत्र अमर झाला! श्रीनगरमध्ये कर्तव्य बजावताना जवान वैभव आवताडे यांना वीरमरण; आज रात्री पार्थिव पुण्यात येणार

मंगळवेढ्याचा शूर सुपुत्र अमर झाला! श्रीनगरमध्ये कर्तव्य बजावताना जवान वैभव आवताडे यांना वीरमरण; आज रात्री पार्थिव पुण्यात येणार

August 15, 2026
दारुडा भाऊसाहेब! गटविकास अधिकारी कार्यालयामध्ये ग्रामसेवकाचा दारू पिऊन धिंगाणा; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

मद्यप्रेमींसाठी मोठी बातमी! ओल्ड मॉन्क, आरसीसह ‘या’ दारू ब्रँड्सच्या विक्रीवर बंदी; FSSAI ने का उचललं हे पाऊल?

August 4, 2026
नागरिकांनो! धैर्यशील मोहिते पाटलांना विजयी करा, माढा, सोलापूर जिल्हा चमकेल; शरद पवारांनी पंढरपुरातील सभा गाजवली

आधी जंतरमंतरवर विद्यार्थ्यांशी संवाद, नंतर पंतप्रधानांची भेट; शरद पवारांच्या दुहेरी चालीने विरोधकही धास्तावले? दिल्लीच्या राजकारणात शरद पवारांची मोठी खेळी

July 23, 2026
सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

विद्यार्थ्यांसाठी केंद्र सरकारचा सर्वात मोठा निर्णय; ‘या’ एका कागदपत्राची सक्ती कायमची रद्द; लाखो विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी

June 27, 2026
मंगळवेढा तालुक्यात एकाच दिवशी कोरोनाने घेतला दोघांचा बळी; आज 10 जणांना लागण

भयंकर निष्काळजीपणा! डॉक्टरांच्या अनुपस्थितीत नर्सने केली प्रसूती; निष्पाप माता-बाळाचा बळी, चितेच्या राखेत पुरावा

June 22, 2026
Gas booking Number : आता गॅस बुकिंगसाठी संपूर्ण देशात एकच नंबर; जूना नंबर करा डिलिट

मोठी बातमी! घरगुती गॅस सिलेंडर आणखी महाग होणार; केंद्र सरकारनं सांगितलं त्यामागचं मोठं कारण..

June 9, 2026
मोठी बातमी! केंद्र सरकारचा ऊस उप्तादक शेतकऱ्यांना दिलासा, महिला सुरक्षेवर भर, मोदी कॅबिनेटमधील पाच मोठे निर्णय

मोदीजी! सामान्यांनी जगायचं कसं? ​‘अच्छे दिन’ कुठे गेले? महागाईने गाठला उच्चांक; काँग्रेसची महागाई हटवण्यासाठी भाजपला आणले, पण आता जनतेवरच ‘महागाईचा सर्जिकल स्ट्राईक’

June 8, 2026
Next Post
पदवीधरसाठी रणधुमाळी शिगेला; देशमुख, ढमाले, पाटील व लाड यांच्यात काटे की टक्कर

विधान परिषद निवडणुकीसाठी कुणाला तिकीट? भाजपने 'या' नावांची यादी दिल्लीला पाठवली; कुणाकुणाची नावे?

ताज्या बातम्या

शेतरस्ते बंद करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा; पोलीस संरक्षणासह ‘ही’ फी बंद करणार; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश

​जमीन खरेदी-विक्रीत मोठा बदल! महाराष्ट्रात लवकरच ‘लँड टायटलिंग कायदा’; जमिनीच्या वादांवर सरकारचा कायमचा तोडगा

September 19, 2026

​पावसाचा खंड पडल्याने सरकार अलर्ट! विहिरी खोदण्यावर बंधने, पाणी चोरी रोखण्यासाठी संयुक्त पथके सज्ज; शासनाने घेतला महत्त्वपूर्ण निर्णय

September 19, 2026
मोठी बातमी! ‘त्या ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा, कारवाई सुरू; ‘या’ जिल्ह्यात जे झालं…

एसटीचा प्रवास अधिक सोपा! आता धावत्या बसमध्येच होणार NCMC कार्ड रिचार्ज; महिला अन् ज्येष्ठ नागरिकांची पायपीट थांबली

September 19, 2026
सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

मोठी बातमी! राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावी व बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर

September 18, 2026
पोलिसांनी रोखला अल्पवयीन नवरदेवाचा विवाह; सोलापूर जिल्ह्यातील खळबळजनक घटना

मांडव उधळला! साखरपुडा झाला, मांडवही सजला… पण ऐनवेळी पोलिस पोहोचले; मंगळवेढ्यात बालविवाह रोखत पालकांना दणका; लिहून घेतले ‘हे’ हमीपत्र

September 17, 2026
मंगळवेढ्यातील दोन महिलांनी अनेकांना घातला लाखोंचा गंडा; मोठे रॅकेट उघडकीस येणार

मोठी बातमी! मंगळवेढ्यातील सराईत गुन्हेगार महादेव इरकरवर MPDA; पोलिसांकडून मुसक्या आवळत येरवड्यात रवानगी

September 18, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा