मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील विकासकामांना गती देतानाच, पालकमंत्र्यांनी मूलभूत सोयी-सुविधांकडे लक्ष वेधले आहे. अनेक गावांमध्ये स्मशानभूमी नसल्याने अंत्यविधीसाठी नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. हा प्रश्न सोडवण्यासाठी पालकमंत्र्यांनी आता थेट विकासनिधीचीच अट घातली आहे.
१२० गावांचा प्रश्न सुटणार
जिल्ह्यातील १२० गावांमध्ये जागा उपलब्ध असूनही सुविधांचा अभाव होता. यावर भाष्य करताना पालकमंत्री म्हणाले की, “आम्ही स्मशानभूमीसाठी स्वतंत्र धोरण राबवत आहोत. ज्या गावांत ही सुविधा नसेल, तिथे प्राधान्याने कामे पूर्ण केली जातील.”

मोठा ‘बूस्टर’ मिळणार
विकासकामांसाठी निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही देतानाच पालकमंत्र्यांनी आपल्या खास शैलीत “मैं जो बोलता हूँ, वो मैं करता हूँ” म्हणत सोलापूरच्या विकासाला मोठा बूस्टर देणार असल्याचे जाहीर केले. यावेळी सीईओ कुलदीप जंगम, आ. देवेंद्र कोठे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

जमीन आहे पण सेवासुविधा नाहीत….
जिल्ह्यातील १२० गावात स्मशानभूमीसाठी जिल्हा परिषदेने जागा उपलब्ध करून दिली आहे, मात्र त्या स्मशानभूमीतील सेवासुविधा निर्माण करण्यासाठी निधीची गरज आहे.

याबाबत पालकमंत्री म्हणाले की, त्या स्मशानभूमीसाठी निधी दिला जाईल, कोणतेही अडचण नसल्याचे ते म्हणाले.
मैं जो बोलता हूँ… वो मैं करता हूँ…
विकासकामांसाठी निधी कमी पडणार नसल्याचे बोलत असतानाच मैं जो बोलता हूँ.. वो मैं करता हूँ… असे म्हणत पालकमंत्र्यांनी सोलापूरच्या विकासाला मोठे बुस्टर देण्यात येणार असल्याचे सांगितले.

ग्रामीण भागातील प्रत्येक गावांचा चेहरामोहरा बदलण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार असल्याचेही पालकमंत्र्यांनी सांगितले.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज











