मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्किंग।
दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंग येथून सुमारे २ किमी अंतरावर असलेल्या तीर्थ गावालगतच्या शेतात नेऊन पोटच्या तीन मुलांना विष पाजले. त्यानंतर स्वतःही विष प्राशन करून पित्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बुधवारी दुपारी सुमारे दीडच्या सुमारास उघडकीस आली.
भीम अणप्पा वाघमारे (वय ३४, रा. तीर्थ, ता. दक्षिण सोलापूर) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. तर प्रगती भीम वाघमारे (वय ८), प्रतीक भीम वाघमारे (वय ६) व प्रतीक्षा भीम वाघमारे (वय ४) या तिन्ही मुलांवर उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, भीम वाघमारे व त्यांच्या पत्नीमध्ये काही दिवसांपासून घरगुती वाद सुरू होता.
वाद वाढल्याने पत्नी देगाव येथील माहेरी गेली होती. नातेवाइकांनी समजूत काढून परत आणण्याचा प्रयत्न केला,

मात्र तिने सासरी येण्यास नकार दिला. भीम यांनी फोनवरूनही पत्नीला घरी येण्याची विनंती केली, पण ती परतली नाही.

त्यामुळे भीम वाघमारे नैराश्यात गेले. त्यांनी बुधवारी आपल्या तीन मुलांना वळसंग गावालगतच्या शेतात नेले. तेथे तिघांनाही विष पाजून स्वतःही विष प्राशन केले.

हा प्रकार समजल्यानंतर शेजारी राहणारे शिवराज कुंभारी यांनी तिघा मुलांना सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले.
खासगी कंपनीत भीम सिक्युरिटी गार्ड
भीम वाघमारे हा खासगी कंपनीत सिक्युरिटी गार्ड म्हणून कामास होता. तो स्वभावाने मनमिळावू होता, मात्र त्याने अचानक असा निर्णय घेतल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे.

मुलांना शेतात घेऊन गेल्यानंतर आत्महत्या करण्यापूर्वी पत्नीला फोन करून भीम याने ‘मी आता निघालो, तू मुलांना घेऊन जा,’ असा निरोप दिल्याची चर्चा तीर्थ गावात सुरू होती. त्यानंतर त्यांनी मुलांना विष पाजून स्वतःही विष प्राशन केल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, प्रतीक व प्रतीक्षा या दोन मुलांवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असून चार वर्षीय प्रतीक्षा हिच्यावर कुंभारी येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तिची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज
















