टीम मंगळवेढा टाईम्स।
मुस्लिम समाजाचा पवित्र सण रमजान ईदच्या पूर्वसंध्येला सामाजिक ऐक्य आणि बंधुभावाचा संदेश देत अनिल (दादा) सावंत फाउंडेशन, पंढरपूर–मंगळवेढा यांच्या वतीने मंगळवेढा शहरात भव्य मोफत दूध वाटपाचा उपक्रम उत्साहात पार पडला. या उपक्रमांतर्गत सुमारे ३ हजार लिटर दूध मुस्लिम बांधवांना वितरित करण्यात आले.
मुस्लिम बांधवांसाठी ईदच्या पार्श्वभूमीवर हा उपक्रम राबविण्यात आला होता. या माध्यमातून समाजात परस्पर सहकार्य, बंधुभाव आणि एकात्मतेचा संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला.

मंगळवेढा शहरातील विविध भागांत दूध वाटप करण्यात आले असून नागरिकांनी या उपक्रमाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देत आयोजकांचे कौतुक केले.

सामाजिक सलोखा आणि एकजूट वाढविण्याच्या उद्देशाने मा.अनिल (दादा) सावंत फाउंडेशन सातत्याने विविध उपक्रम राबवत असून, हा उपक्रम त्याच परंपरेचा एक भाग असल्याचे आयोजकांनी सांगितले.

“समाजातील सर्व घटकांनी एकत्र येऊन सण-उत्सव साजरे करणे हीच खरी एकात्मतेची ओळख आहे,” अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

या प्रसंगी भैरवनाथ शुगर उद्योग समूहाचे चेअरमन अनिल सावंत, माजी उपनगराध्यक्ष मुझफ्फर काझी, माजी उपनगराध्यक्ष चंद्रशेखर कोंडूभैरी, अंबादास बेंद्रे,
किसन गवळी, संतोष रदवे, सुलेमान तांबोळी, जमीर इनामदार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. तसेच फाउंडेशनचे कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

प्रेमाचा आणि सलोख्याचा संदेश
”समाजातील सर्व घटकांनी एकत्र येऊन सण साजरे करणे, हीच खरी एकात्मता आहे. या उपक्रमातून केवळ दूध वाटप झाले नाही, तर प्रेमाचा आणि सलोख्याचा संदेश घराघरात पोहोचला आहे.” — अनिल (दादा) सावंत, चेअरमन, भैरवनाथ शुगर
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज












