mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

​मंगळवेढ्यात अवैध क्लासेसचा सुळसुळाट; पदवी नसलेलेही ‘मुन्नाभाई’ शिकवतायत धडे; शिक्षणाच्या नावाखाली पालकांची लूट, अवैध क्लासेसवर कारवाई कधी? प्रशासन झोपलेय का?

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
March 22, 2026
in मंगळवेढा, शैक्षणिक
कोरोनाचे संकटामुळे राज्यसेवा पुर्व परिक्षा पुन्हा पुढे ढकलली

टीम ​मंगळवेढा टाईम्स।

एकीकडे शिक्षण विभाग शाळेतील गुणवत्तेसाठी प्रयत्न करत असल्याचा दावा करत असतानाच, दुसरीकडे मंगळवेढा शहरात राजरोसपणे सुरू असलेल्या अवैध खाजगी क्लासेसने शिक्षकी पेशाला गालबोट लावले आहे.

कोणतीही अधिकृत परवानगी नसताना आणि ज्या विषयाचे ज्ञान नाही, अशा विषयांचेही क्लासेस चालवून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान केले जात असल्याचा गंभीर आरोप पालकांकडून होत आहे.

​शिक्षण विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह

मंगळवेढा शहरात अनेक ठिकाणी खाजगी शिकवणी वर्ग सुरू आहेत.

मात्र, यातील बहुतांश क्लासेसकडे आवश्यक असणारे परवाने आणि नोंदणी प्रमाणपत्र उपलब्ध नसल्याचे समोर आले आहे.

या क्लासेसचे संचालन करणारे अनेक जण संबंधित विषयातील पदवीधरही नाहीत. केवळ नफेखोरीच्या उद्देशाने चालवल्या जाणाऱ्या या क्लासेसवर शिक्षण विभागाची कोणतीही जरब नसल्याने शिक्षण विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

​भरमसाठ फी आणि विद्यार्थ्यांचे नुकसान

हे क्लासेस चालवणारे कथित ‘शिक्षक’ पालकांकडून भरमसाठ फी उकळत आहेत.

परंतु, त्या बदल्यात विद्यार्थ्यांना मिळत असलेले शिक्षण अत्यंत निकृष्ट दर्जाचे आहे.

यामुळे विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न निर्माण झाला असून, पालकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. “ज्यांना स्वतःला विषयाचे गांभीर्य नाही, ते आमच्या मुलांना काय शिकवणार?” असा सवाल पालक उपस्थित करत आहेत.

​नेमके अभय कुणाचे?

अवैधपणे सुरू असलेल्या या क्लासवर आजवर कोणतीही ठोस कारवाई झाली नाही. त्यामुळे या क्लासेसला नेमके राजकीय किंवा प्रशासकीय पाठबळ कोणाचे आहे, अशी चर्चा आता शहरात सुरू आहे. जर वेळीच या क्लासेसवर अंकुश लावला नाही, तर विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता पालकांनी वर्तवली आहे.

​पालकांची मागणी:

​शिक्षण विभागाने तत्काळ अवैध क्लासेसची यादी करून तपासणी करावी. ​परवाना नसलेल्या आणि अपात्र शिक्षकांवर कायदेशीर कारवाई करावी.
​क्लासेसकडून आकारल्या जाणाऱ्या फीवर नियंत्रण असावे. ​आता शिक्षण विभाग या प्रकरणी कधी जागे होणार आणि कारवाईचा बडगा उचलणार, याकडे सर्व पालकांचे लक्ष लागले आहे.

​अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: अवैध क्लासेस

संबंधित बातम्या

तगडा उमेदवार! पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघावर शिंदे गटाचा दावा; भैरवनाथ शुगरचे व्हा.चेअरमन अनिल सावंत निवडणूक लढवणार?

साखरेच्या गोडव्यानंतर आता दुग्धक्रांती! ‘भैरवनाथ समूहा’ची दुग्ध व्यवसायात भव्य एन्ट्री; ​अनिल सावंत यांच्या नेतृत्वात उद्योगविस्ताराची नवी झेप; ‘भैरवनाथ डेअरी फार्म व चिलिंग सेंटर’चे आज लोकार्पण

September 12, 2026
शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत! मंगळवेढा भूमी अभिलेख कार्यालयासमोर ‘या’ तारखेला भव्य ठिय्या; एकजुटीने उपस्थित राहण्याचे आवाहन

शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत! मंगळवेढा भूमी अभिलेख कार्यालयासमोर ‘या’ तारखेला भव्य ठिय्या; एकजुटीने उपस्थित राहण्याचे आवाहन

September 12, 2026
न्यूरोसर्जन डॉ.शिरीष वळसंगकर प्रकरणाला वेगळं वळण; आरोपी महिलेच्या वकिलाचा मोठा खुलासा

आंदोलक बांधवांच्या पाठीशी मंगळवेढ्याचे वकील खंबीर; कोणतीही कायदेशीर कारवाई झाल्यास लढणार विनामूल्य लढा; मोफत कायदेशीर मदतीची घोषणा

September 12, 2026
मोठी बातमी! राज्यातील प्राथमिक शाळांच्या वेळेत होणार बदल, आता ‘या’ वेळेत भरणार चौथीपर्यंतचे वर्ग; सर्व शाळांना नियम लागू

धक्कादायक! निंबोणीतील ‘सहारा बाल आश्रमा’चा बोगस कारभार; जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल; तक्रारदाराचे गंभीर आरोप

September 11, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

सावधान! मंगळवेढ्याच्या महिलेचा सांगोला बसस्थानकावर हातसफाईचा डाव; पोलिसांनी २४ तासांत ठोकल्या बेड्या

September 11, 2026
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज मुढवी येथे भव्य रक्तदान शिबिर; मंगळवेढा येथील शिवालयापासून मुढवी पर्यंत भव्य सायकल रॅलीचे आयोजन

​हक्काच्या आरक्षणासाठी मंगळवेढा पेटून उठला; आज शिवतीर्थावर तरुणांचे भव्य ठिय्या आंदोलन; शिक्षण-नोकरीत हक्काचे आरक्षण द्या

September 11, 2026
रतनचंद शहा बँकेच्या सर्व खातेदारांच्या ठेवी सुरक्षित : चेअरमन राहुल शहा

रतनचंद शहा बँकेचे खातेदार व सभासदांसाठी महत्त्वाची बातमी! ​अपप्रचारावर विश्वास ठेवू नका, बँक सभासदांच्या विश्वासावर भक्कम; चेअरमन राहुल शहा यांनी मांडली वस्तुस्थिती

September 10, 2026
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

चौकात मित्रांसोबत गप्पा मारत बसले होते, अचानक समोरून आले आणि दोन तरुणांवर चाकूने केला हल्ला; मंगळवेढ्यात खळबळजनक घटना

September 11, 2026
येरे येरे पावसा! मंगळवेढा तालुक्यात दुष्काळी परिस्थिती, गावगाडा ठप्प झाल्याने नागरिकांचे गावागावात ग्रामदैवतांना जलाभिषेक

मोठी बातमी! मंगळवेढा तालुक्यात दुष्काळसदृश स्थिती, पिकांच्या नुकसानीचा वस्तुनिष्ठ अहवाल तयार करण्यासाठी विशेष समिती गठीत; तज्ज्ञांचे पथक थेट बांधावर उतरणार

September 10, 2026
Next Post
ईदचा गोडवा वाढला! अनिल (दादा) सावंत फाउंडेशनकडून ३ हजार लिटर दुधाचे मोफत वाटप; मंगळवेढ्यात सामाजिक सलोख्याची नवी मिसाल; उपक्रमाचे सर्वत्र कौतुक

ईदचा गोडवा वाढला! अनिल (दादा) सावंत फाउंडेशनकडून ३ हजार लिटर दुधाचे मोफत वाटप; मंगळवेढ्यात सामाजिक सलोख्याची नवी मिसाल; उपक्रमाचे सर्वत्र कौतुक

ताज्या बातम्या

शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

गुरांना चारा नाही पाणी नाही, हाताला काम नाही, सांगा आम्ही जगावं की मरावं? कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची शेतकऱ्यांची मागणी

September 12, 2026
तगडा उमेदवार! पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघावर शिंदे गटाचा दावा; भैरवनाथ शुगरचे व्हा.चेअरमन अनिल सावंत निवडणूक लढवणार?

साखरेच्या गोडव्यानंतर आता दुग्धक्रांती! ‘भैरवनाथ समूहा’ची दुग्ध व्यवसायात भव्य एन्ट्री; ​अनिल सावंत यांच्या नेतृत्वात उद्योगविस्ताराची नवी झेप; ‘भैरवनाथ डेअरी फार्म व चिलिंग सेंटर’चे आज लोकार्पण

September 12, 2026
शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत! मंगळवेढा भूमी अभिलेख कार्यालयासमोर ‘या’ तारखेला भव्य ठिय्या; एकजुटीने उपस्थित राहण्याचे आवाहन

शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत! मंगळवेढा भूमी अभिलेख कार्यालयासमोर ‘या’ तारखेला भव्य ठिय्या; एकजुटीने उपस्थित राहण्याचे आवाहन

September 12, 2026
न्यूरोसर्जन डॉ.शिरीष वळसंगकर प्रकरणाला वेगळं वळण; आरोपी महिलेच्या वकिलाचा मोठा खुलासा

आंदोलक बांधवांच्या पाठीशी मंगळवेढ्याचे वकील खंबीर; कोणतीही कायदेशीर कारवाई झाल्यास लढणार विनामूल्य लढा; मोफत कायदेशीर मदतीची घोषणा

September 12, 2026
महाराष्ट्रातील ‘या’ भागात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासनाला सतर्क राहण्याचं आवाहन

दुष्काळाची चिंता मिटली! ‘या’ तारखे दरम्यान धो-धो पावसाची शक्यता; हवामान अभ्यासकांचा ‘हा’ अंदाज उडवेल झोप

September 12, 2026
मोठी बातमी! राज्यातील प्राथमिक शाळांच्या वेळेत होणार बदल, आता ‘या’ वेळेत भरणार चौथीपर्यंतचे वर्ग; सर्व शाळांना नियम लागू

धक्कादायक! निंबोणीतील ‘सहारा बाल आश्रमा’चा बोगस कारभार; जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल; तक्रारदाराचे गंभीर आरोप

September 11, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..