mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय! आता ‘तारीख पे तारीख’ नाही; कोर्टाच्या तारखांनी हैराण झाला असाल तर ही बातमी वाचाच

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
March 30, 2026
in राष्ट्रीय
खुनीहल्ल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील आरोपीविरुद्ध २१ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा

मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।

‘शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये’, असे म्हणतात. याचे कारण म्हणजे वर्षानुवर्षे चालणारे खटले, त्यासाठी सतत घालावे लागणारे खेटे आणि आर्थिक नुकसान.

कोर्टाच्या तारखांमुळे लोक हैराण होतात. पण यापुढे हे चित्र बदलणार आहे. सुप्रीम कोर्टाने ‘तारीख पे तारीख’ला आळा घालण्यासाठी ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. त्यामुळे एका प्रकरणासाठी सातत्याने कोर्टाची पायरी चढावी लागणार नाही.

सुप्रीम कोर्टाने बुधवारी याबाबतचे एक परिपत्रक जाहीर केले असून एखाद्या प्रकरणाची सुनावणी टाळण्यासाठी किंवा पुढे ढकलण्याबाबतच्या नियमांमध्ये मोठे बदल केले आहेत.

नव्या किंवा नियमित प्रकरणांमध्ये सातत्याने तारखा घेण्याला आळा बसणार आहे. केवळ अपरिहार्य परिस्थितीतच सुनावणी टाळली जाऊ शकते, असे कडक नियम तयार करण्यात आले आहेत.

सुप्रीम कोर्टाच्या परिपत्रकात म्हटले आहे की, २९ नोव्हेंबर २०२५ आणि २ डिसेंबर २०२५ रोजी जारी करण्यात आलेल्या नियमांऐवजी आता नवे नियम लागू होतील. त्यानुसार वेगवेगळ्या प्रकरणांसाठी वेगळे नियम निश्चित करण्यात आले आहेत.

प्रामुख्याने नियमित प्रकरणांमध्ये नियम कडक करण्यात आले आहेत. कोर्टासमोर सुनावणीसाठी एखादे प्रकरण लिस्टेड असेल तर कोणत्याही अपरिहार्य कारणाशिवाय त्याची सुनावणी टाळता येणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

नव्या किंवा ‘आफ्टर नोटीस’ प्रकरणांमधील सूटही कमी करण्यात आली आहे. एखाद्या पक्षकाराला सुनावणी पुढे ढकलायची असल्यास त्यासाठी दुसऱ्या पक्षाला त्याची आधीच माहिती द्यावी लागेल.

त्याचा पुरावाही द्यावा लागणार आहे. ही संपूर्ण प्रकरणी सुनावणीच्या एक दिवस आधी सकाळी ११ वाजण्यापूर्वी पूर्ण करावी लागेल, असे कोर्टाने स्पष्ट केले आहे.

दुसऱ्या पक्षाला सुनावणी पुढे ढकलण्याच्या नोटिशीवर आक्षेप घेण्याची संधी मिळणार आहे. दुपारी १२ वाजेपर्यंत ईमेलद्वारे आक्षेप घेता येऊ शकतो. हा आक्षेप कोर्टासमोर मांडला जाईल. पुढची तारीख मागणाऱ्या पक्षकाराला त्याबाबचे ठोस कारण सांगावे लागणार आहे.

यापूर्वी कितीवेळा पुढची तारीख घेण्यात आली, हेही सांगावे लागेल. त्यामुळे सुनावणी पुढे ढकलणे आता आता सहजासहजी शक्य होणार नाही.

केवळ अपरिहार्य कारणास्तव पुढची तारीख मिळू शकते किंवा सुनावणी पुढे ढकलली जाऊ शकते. कुटुंबामध्ये एखाद्या व्यक्तीचा मृत्यू, गंभीर आजार किंवा इतर ठोस कारणे, जे कोर्टासमोर टिकू शकेल, अशा परिस्थितीच पुढची तारीख दिली जाईल.

नव्या प्रकरणांमध्ये सुरूवातीला केवळ एकदाच पुढच्या तारखेसाठी अर्ज देता येईल. सलग दोनदा सुनावणी पुढे ढकलता येणार नाही. या अर्जाचा नमूनाही तयार करण्यात आला असून हा अर्ज भरून ईमेलवर पाठवावा लागेल.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: सुप्रीम कोर्ट

संबंधित बातम्या

दारुडा भाऊसाहेब! गटविकास अधिकारी कार्यालयामध्ये ग्रामसेवकाचा दारू पिऊन धिंगाणा; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

मद्यप्रेमींसाठी मोठी बातमी! ओल्ड मॉन्क, आरसीसह ‘या’ दारू ब्रँड्सच्या विक्रीवर बंदी; FSSAI ने का उचललं हे पाऊल?

August 4, 2026
नागरिकांनो! धैर्यशील मोहिते पाटलांना विजयी करा, माढा, सोलापूर जिल्हा चमकेल; शरद पवारांनी पंढरपुरातील सभा गाजवली

आधी जंतरमंतरवर विद्यार्थ्यांशी संवाद, नंतर पंतप्रधानांची भेट; शरद पवारांच्या दुहेरी चालीने विरोधकही धास्तावले? दिल्लीच्या राजकारणात शरद पवारांची मोठी खेळी

July 23, 2026
सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

विद्यार्थ्यांसाठी केंद्र सरकारचा सर्वात मोठा निर्णय; ‘या’ एका कागदपत्राची सक्ती कायमची रद्द; लाखो विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी

June 27, 2026
मंगळवेढा तालुक्यात एकाच दिवशी कोरोनाने घेतला दोघांचा बळी; आज 10 जणांना लागण

भयंकर निष्काळजीपणा! डॉक्टरांच्या अनुपस्थितीत नर्सने केली प्रसूती; निष्पाप माता-बाळाचा बळी, चितेच्या राखेत पुरावा

June 22, 2026
Gas booking Number : आता गॅस बुकिंगसाठी संपूर्ण देशात एकच नंबर; जूना नंबर करा डिलिट

मोठी बातमी! घरगुती गॅस सिलेंडर आणखी महाग होणार; केंद्र सरकारनं सांगितलं त्यामागचं मोठं कारण..

June 9, 2026
मोठी बातमी! केंद्र सरकारचा ऊस उप्तादक शेतकऱ्यांना दिलासा, महिला सुरक्षेवर भर, मोदी कॅबिनेटमधील पाच मोठे निर्णय

मोदीजी! सामान्यांनी जगायचं कसं? ​‘अच्छे दिन’ कुठे गेले? महागाईने गाठला उच्चांक; काँग्रेसची महागाई हटवण्यासाठी भाजपला आणले, पण आता जनतेवरच ‘महागाईचा सर्जिकल स्ट्राईक’

June 8, 2026
खुनीहल्ल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील आरोपीविरुद्ध २१ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा

तरुणपणी गोळी झाडली, म्हातारपणी शिक्षा झाली, 85 वर्षीय वृद्धाला 34 वर्षांनी कारावासाची शिक्षा; नेमकं प्रकरण काय?

June 5, 2026
प्रियकराच्या सांगण्यावरूनच जन्मदात्या आईने 9 महिन्याच्या बाळाचा गळा घोटला

धडाधड गोळीबार, सहा जणांचा मर्डर! मंगळवेढा तालुक्याच्या शेजारील राज्यात साऊथ सिनेमाला लाजवेल असं मन विचलित करणारं हत्याकांड; रस्ता रक्ताने माखला, हत्येचं कारण समोर

May 30, 2026
धक्कादायक! सोलापुरात गेल्या २४ तासांत खुनाच्या तीन घटना; १६ महिन्यांच्या मुलाचा आईकडून खून

स्कॉर्पिओमध्ये माजी सरपंच, झेडपी सदस्य पत्नी, आई आणि भाचीसह चार जणांना जिवंत जाळलं; पहिल्यांदा अपघाताचा बनाव, पण.. थरकाप उडवणारी घटना समोर

May 29, 2026
Next Post
मोठी बातमी! मंगळवेढ्यात नगरसेवक पदासाठी आज भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्षाकडून अर्ज दाखल; नगराध्यक्षपदासाठी ‘इतके’ अर्ज; मतदारांमध्ये उत्सुकता वाढली

मोठा निर्णय! जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्ये स्वीकृत सदस्यांच्या प्रवेशाला मंजुरी; सदस्यसंख्या वाढणार, पण किती?

ताज्या बातम्या

महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

शेतकऱ्याने पूर्ण कर्ज फेडले, तरीही बँकेने जमीन परस्पर विकली; पोलिसांनीही माणुसकी सोडली, जबरदस्तीने जमिनीचा ताबा

August 4, 2026
दारुडा भाऊसाहेब! गटविकास अधिकारी कार्यालयामध्ये ग्रामसेवकाचा दारू पिऊन धिंगाणा; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

मद्यप्रेमींसाठी मोठी बातमी! ओल्ड मॉन्क, आरसीसह ‘या’ दारू ब्रँड्सच्या विक्रीवर बंदी; FSSAI ने का उचललं हे पाऊल?

August 4, 2026
मंगळवेढा तालुक्यात एकाच दिवशी कोरोनाने घेतला दोघांचा बळी; आज 10 जणांना लागण

मुलीचा संसार वाचवण्यासाठी सासू सरसावली; जावयाला किडनी दान करून दिले नवजीवन

August 4, 2026

कुत्रा पाळताय? मग खबरदार! श्वानाने बालिकेला चावल्यानंतर सोलापुरात मालकावर गुन्हा; ६ महिन्यांच्या तुरुंगवासाची शक्यता

August 4, 2026

महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा! जबरदस्तीने धर्मांतरासाठी आता सात वर्षे कारावास; धर्मांतरविरोधी कायदा राज्यात लागू

August 4, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

संतापजनक! उपचाराच्या अन् प्रलोभनांच्या बहाण्याने अल्पवयीन मुलांना जाळ्यात ओढणारा डॉक्टर गजाआड

August 2, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा