मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क।
पतीच्या निधनानंतर मुलीच्या लग्नासाठी सोने खरेदीसाठी सोलापूर जिल्ह्यातील बार्शीच्या एका सराफी दुकानी काम करणाऱ्या कामगारास रोख ४० हजार रुपये देऊन ६ तोळे सोने बुकिंग केले.

वरचेवर त्याच्या खात्यात ३ लाख ९५ हजार देऊनही सोने न दिल्याने बार्शी शहर पोलिसात कामगाराच्या विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंदला आहे.

याबाबत नीता अतुल दळवी (वय ४१, रा. सुभाषनगर, बार्शी) यांनी फिर्याद दिली आहे. कामगार युवराज भालचंद्र जंगम (रा. शिंदे गल्ली, कुरुंदवाड कोल्हापूर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

फिर्यादीनुसार सदर महिला येथे नर्स म्हणून काम करताना पतीचे २०१५ मध्ये निधन झाले.

माहेरी राहून मुलीच्या लग्नास सोने खरेदीसाठी एका ओळखीच्या सराफी दुकानी

१० फेब्रुवारी २५ रोजी जाऊन दुकानातील कामगार युवराज जंगम यास रोख ४० हजार देऊन ६ तोळे सोने बुकिंग करून मालकास सांग, असे सांगितले होते.


त्यानंतर फिर्यादीने तिच्या बँक खात्यातून फोन पे व गुगल पे वरून वेळोवेळी ३ लाख ९५ हजार रुपये पाठविले होते. ती रक्कम जमा होताच तिने दुकानी जाऊन सोन्याची मागणी करताच तो देतो, असे म्हणाला होता.

मालकास विचारणा केली असता तो सध्या कामावर नाही. आई आजारी असल्याने गावी गेल्याचे सांगितले. याप्रकरणी पुढील तपास पोलिस हवालदार पांडुरंग मुंढे करीत आहेत.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज














