mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

यंदा प्रथमच! दहावी-बारावीच्या परीक्षेत पर्यवेक्षकांच्या मोबाईलचेही सुरु राहणार कॅमेरे; आता प्रत्येक वर्गात असणार…

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
December 22, 2025
in राज्य, शैक्षणिक
सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

मंगळवेढा टाईम्स न्युज ।

इयत्ता दहावी- बारावीच्या परीक्षा पूर्णत: कॉपीमुक्त होण्यासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने ठोस नियोजन केले आहे. सर्व केंद्रांना वॉल कंपाऊंड असणार आहे.

परीक्षा केंद्रावरील प्रत्येक वर्गात सीसीटीव्ही कॅमेरे असतील. याशिवाय केंद्रावरील प्रत्येक पर्यवेक्षकाचा मोबाईल झूम ॲपच्या माध्यमातून जिल्ह्याच्या नियंत्रण कक्षाला जोडण्यात येणार आहे.

यंदाच्या बोर्डाच्या परीक्षेसाठी सोलापूर जिल्ह्यात १८४ केंद्रे असणार आहेत. दुसरीकडे इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांची १२१ परीक्षा केंद्रे आहेत. बारावीच्या विद्यार्थ्यांचे प्रात्यक्षिक २३ जानेवारीपासून सुरु होईल.

तत्पूर्वी, प्रत्येक परीक्षा केंद्राची गट शिक्षणाधिकाऱ्यांकडून पडताळणी करण्यात आली आहे. ज्या केंद्रांवर किंवा वर्गांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे नव्हते, त्याठिकाणी बसविण्याचे आदेश देण्यात आले. वॉल कंपाऊंड तुटलेले होते, त्याठिकाणी तारेचे कपांऊंड मारण्यात आले आहे.

विद्यार्थ्यांच्या सरमिसळप्रमाणेच या वर्षीपासून पर्यवेक्षकांचीही सरमिसळ केली जाणार आहे. शहरातील पर्यवेक्षक दुसऱ्या शाळांमध्ये तर ग्रामीणमधील पर्यवेक्षक तालुक्यातील दुसऱ्या केंद्रांवर नेमले जाणार आहेत.

ओळखीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेत सैल सोडण्याचे प्रकार होऊन नयेत म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. प्रत्येक परीक्षा केंद्रांवरील पर्यवेक्षकांच्या मोबाईलचे कॅमेरे सुरु ठेवून तेथील हालचालींवर जिल्हाधिकारी, शिक्षणाधिकारी लक्ष ठेवणार आहेत.

इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांची बोर्डाची परीक्षा कॉपीमुक्त होईल. त्यासाठी प्रत्येक परीक्षा केंद्रावरील प्रत्येक वर्गात सीसीटीव्ही कॅमेरे असतील. वॉल कंपाऊंड असलेल्याच केंद्रांना मान्यता दिली आहे.

परीक्षा केंद्रांवरील पर्यवेक्षकांना पेपर संपेपर्यंत झूम ॲपच्या माध्यमातून त्यांच्या मोबाईलचे कॅमेरे सुरु ठेवावे लागतील. जिल्ह्याच्या ठिकाणी असलेल्या नियंत्रण कक्षातून जिल्हाधिकारी परीक्षेवर लक्ष ठेवतील. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांनी सांगितले आहे.

बारावीची प्रात्यक्षिक २३ जानेवारीपासून

इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा १० फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे. या विद्यार्थ्यांचे प्रात्यक्षिक तथा तोंडी चाचणी २३ जानेवारीपासून सुरु होईल. तर दहावीच्या विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा २० फेब्रुवारीपासून सुरु होईल. त्यांचे प्रात्यक्षिक २ फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे. या पार्श्वभूमीवर शिक्षक राहिलेला अभ्यासक्रम पूर्ण करण्यात व्यस्त आहेत.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: दहावी बारावी परीक्षा वेळापत्रक

संबंधित बातम्या

धडपड गावासाठी! सामाजिक कार्यकर्ते नागराज व्हनवटे यांच्याकडून जयंतीनिमित्त गावाला ‘बाकडे’ भेट; पुणे येथे कार्यरत असूनही जपली गावाची नाळ

धडपड गावासाठी! सामाजिक कार्यकर्ते नागराज व्हनवटे यांच्याकडून जयंतीनिमित्त गावाला ‘बाकडे’ भेट; पुणे येथे कार्यरत असूनही जपली गावाची नाळ

April 15, 2026
न्यूरोसर्जन डॉ.शिरीष वळसंगकर प्रकरणाला वेगळं वळण; आरोपी महिलेच्या वकिलाचा मोठा खुलासा

बापरे..! सोलापुरातील वकिलास जीएसटीची १२१ कोटी दंडाची नोटीस; काय आहे नेमके प्रकरण?

April 12, 2026
एकाच छताखाली २५ स्टॉल्स, सेवांचा पाऊस; एकाच दिवशी तब्बल ‘इतके’ हजार लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य उमटले; पाटकळ महसूल विभागात विक्रमी कामकाज

एकाच छताखाली २५ स्टॉल्स, सेवांचा पाऊस; एकाच दिवशी तब्बल ‘इतके’ हजार लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य उमटले; पाटकळ महसूल विभागात विक्रमी कामकाज

April 11, 2026
शेतरस्ते बंद करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा; पोलीस संरक्षणासह ‘ही’ फी बंद करणार; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश

कामाची बातमी! ‘या’ परवानग्यांचे अधिकार आता थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा मोठा निर्णय

April 9, 2026
बाबो..! अशोक खरातच्या मोबाइलमधील डेटा पाहून पोलीसही चक्रावले, धक्कादायक माहिती समोर; पुन्हा गूढ वाढले

मोठी बातमी! भोंदूबाबाचा पाय आणखी खोलात; अशोक खरात विरोधात ‘हा’ गुन्हा दाखल

April 6, 2026
जनता संभ्रमात! भगीरथ भालकेंचे नेमकं चाललंय तरी काय, दोन दिवसात दोन वेगवेगळ्या पक्षाकडून भरले अर्ज; पंढरपूर-मंगळवेढ्याच्या जागेबाबत सस्पेन्स आणखी वाढला?

जनता संभ्रमात! भगीरथदादा, तुमची निष्ठा नेमकी कुणाकडे? ​बीआरएस, काँग्रेस, राष्ट्रवादी अन् आता शिवसेना; भालकेंच्या वारंवार बदलणाऱ्या भूमिकांमुळे कार्यकर्त्यांमध्ये संताप

April 6, 2026
मंगळवेढ्यातील महिलांच्या हाताला मिळणार हक्काचे काम; ‘सांची ब्युटी पार्लर’चा अल्प दरात व्यावसायिक प्रोफेशनल कोर्सेससाठी प्रवेश सुरू; काय आहे खास? जाणून घ्या…

मंगळवेढ्यातील महिलांच्या हाताला मिळणार हक्काचे काम; ‘सांची ब्युटी पार्लर’चा अल्प दरात व्यावसायिक प्रोफेशनल कोर्सेससाठी प्रवेश सुरू; काय आहे खास? जाणून घ्या…

April 3, 2026
मंगळवेढ्यात विद्यार्थ्यांसाठी ‘सुवर्णसंधी’! एका कोर्सच्या फीमध्ये दुसरा कोर्स मोफत; ACTI कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटची ऑफर; महिला दिनानिमित्त मुलींना विशेष सवलत

बांधकाम कामगारच्या मुलांना कॉप्युटर कोर्स नंतर मिळणार, ‘एवढे’ रुपये; आम्ही फक्त AI वापरण्यापुरते शिकवत नाही; AI तयार करायला शिकवतो; आता मंगळवेढा व नंदेश्वर मध्ये ACTI

April 1, 2026
मास्क वापरा अन्यथा भरा ‘एवढा’ दंड! सोलापूर जिल्हा प्रशासनानं जारी केला नवा आदेश

कामाची बातमी! SIR म्हणजे काय? SIR यादीत नाव आहे की नाही? कसं चेक करायचं?

April 1, 2026
Next Post
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

ऎतिहासिक निर्णय! तीन अपत्यानंतरही सरपंचपद वैध; उच्च न्यायालयाचा निकालाने सोलापूर जिल्ह्यात जल्लोष

ताज्या बातम्या

मंगळवेढा तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी पोलिस भरतीसाठी मोफत ऑनलाईन टेस्ट सिरीजचे आयोजन

टवाळखोरांनो सावधान! मंगळवेढ्यात ‘निर्भया पथक’ फिरतेय; शाळा आणि बाजारपेठेत कडक गस्त

April 15, 2026
पालकमंत्रिपदी नियुक्त झाल्यानंतर पहिल्यांदाच जयकुमार गोरे आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

​भगीरथ, मला बोलायला लावू नका; तुम्ही मला का भेटला होता, ते जाहीर करू का?– पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खळबळजनक इशारा

April 15, 2026
धडपड गावासाठी! सामाजिक कार्यकर्ते नागराज व्हनवटे यांच्याकडून जयंतीनिमित्त गावाला ‘बाकडे’ भेट; पुणे येथे कार्यरत असूनही जपली गावाची नाळ

धडपड गावासाठी! सामाजिक कार्यकर्ते नागराज व्हनवटे यांच्याकडून जयंतीनिमित्त गावाला ‘बाकडे’ भेट; पुणे येथे कार्यरत असूनही जपली गावाची नाळ

April 15, 2026
धक्कादायक! मंगळवेढा तालुक्यात एकाच दिवशी कोरोनाने घेतला दोघांचा बळी; आज 20 जण कोरोनामुक्त

खळबळजनक! पंढरपुरातील ॲसिड हल्ला प्रकरणाला नवं वळण; तरुणीचा धक्कादायक खुलासा

April 15, 2026
मोठी बातमी! मंगळवेढ्यात हुंड्यासाठी सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या; पती, सासू, दीर, सासर्‍यांविरोधात गुन्हा दाखल

आम्हाला मुलगाच हवा होता! पोटच्या लेकीला आणि सुनेस ठरवले ‘पांढऱ्या पायाची’; उपाशी ठेवून काढले घराबाहेर; मंगळवेढ्यात सासरच्यांचा अमानुष छळ; पतीसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

April 15, 2026
जनता संभ्रमात! भगीरथ भालकेंचे नेमकं चाललंय तरी काय, दोन दिवसात दोन वेगवेगळ्या पक्षाकडून भरले अर्ज; पंढरपूर-मंगळवेढ्याच्या जागेबाबत सस्पेन्स आणखी वाढला?

भगीरथदादा आता प्रवास पुरे! ‘पक्षांतराचा प्रवास आता थांबवा’; सिद्धाराम म्हेत्रेंचा भगीरथ भालकेंना रोखठोक सल्ला

April 13, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा