mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

अजितदादा माफ करा, पदरात घ्या! लेकाने बोट दाखवून चॅलेंज दिल्यानंतर सोलापूर जिल्ह्यातील ‘या’ बड्या नेत्यानी उपमुख्यमंत्र्यांकडे मागीतली माफी

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
November 20, 2025
in मंगळवेढा
मोठी बातमी! वर्षाला ‘इतके’ गॅस सिलिंडर मोफत देणार; युती सरकार आणा, पुढील 5 वर्षे वीज मोफत.; भरसभेत अजित पवारांची मोठी घोषणा

मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।

अनगर नगरपंचायतीत माजी आमदार राजन पाटील यांची सून प्राजक्ता पाटील या बिनविरोध नगराध्यक्षपदी निवडून आल्या आहेत. त्यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या उज्वला थिटे यांनी अर्ज दाखल केला होता.

पण अपक्ष उमेदवार सरस्वती शिंदे यांनी थिटे यांच्या अर्जावर आक्षेप घेतल्यानं तो अर्ज बाद झाला. यानंतर राजन पाटील यांच्यासह समर्थकांनी मोठा जल्लोष केला.

या जल्लोषावेळी राजन पाटील यांचे सुपुत्र बाळराजे पाटील यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा एकेरी उल्लेख करत अजित पवार, नाद करायचा पण अनगरकरांचा नाही असं चॅलेंज दिलं होतं. या विधानावरून आता बाळराजे पाटलांचे वडील राजन पाटील यांनी माफी मागितलीय.

बाळराजेंच्या विधानानंतर सत्तेची मस्ती चढल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्यांनी केला होता. प्रवक्ते सूरज चव्हाण यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहित म्हटलं होतं की,

गल्लीच्या राजकारणात रडीचा डाव खेळून जिंकलो जिंकलो असा माज करणाऱ्या लिंबूटिंबू बाळानं अजितदादांवर बरळणं म्हणजे इतभर लाकूड आणि हातभर ढलपी असं आहे. विजयाचा उन्माद करताना अनगरच्या बाळानं उडता तीर अंगावर घेतलाय. गर्विष्ठ माना झुकतील.

विरोधकांनी टीकेची झोड उठवल्यानंतर अखेर राजन पाटील यांनी लेकानं दिलेल्या आव्हानावर प्रतिक्रिया दिली. त्यांनी पवार कुटुंबियांची माफीही मागितलीय. राजन पाटील म्हणाले की, आमच्या गावात कधीच निवडणूक झाली नाही.

तरुण मुलं उत्साहात असतात आणि यावेळी निवडणूक झाली. बिनविरोध होताच तरुणांनी उत्साह साजरा करण्याचा प्रयत्न केला. आमच्या मुलानं तिथं जे काही वक्तव्य केलं मी त्याचं समर्थन करणार नाही. राजकारणाच्या दृष्टीने तो लहान आहे. त्यामुळे त्यांच्या तोंडून नकळत अशा प्रकारचं वक्तव्य गेलं असल्याने त्याचा वडील म्हणून पाटील परिवाराच्या वतीने मी दिलगिरी व्यक्त करतो, क्षमा मागतो.

राजन पाटील यांनी म्हटलं की, मी आज जरी मोठ्या पवार साहेबांपासून, अजितदादांपासून दूर गेलो असलो तरी त्यासाठी अजितदादा करणीभूत आहेत, असं मी समजणार नाही. त्यामागे अनेक कारणं आहेत. तरीही मी त्यांचं नेतृत्व मान्य केलं होतं. आतापर्यंत जे वैभव उभा केलंय त्यात मोठ्या साहेबांचा, अजित दादांचा सिंहाचा वाटा आहे.

आमच्या मुलाच्या तोंडून नकळत, उत्साहात, भावनेत जे अपशब्द आले ते यत्किंचितही व्हायला नको होते. त्याबद्दल मी अजितदादांचं व्यक्तीशः आणि पवार परिवाराची मी अंत:करणपूर्वक दिलगिरी व्यक्त करतो, मोठ्या साहेबांच्या चरणी नतमस्तक होतो.

राष्ट्रवादीचे नेत्यांना राग येणे स्वाभाविक आहे, पण मी त्यांनाही विनंती करतो की, आपलाही एखादा मुलागा असेल आणि तो चुकला तर त्याला आपण पदरात घ्यायचं असतं. अजितदादांनीही पार्थ प्रमाणेच त्याला समजावं आणि त्याला पदरात घ्यावं असं मी विनंती करतो.

लहान मुलाने जर मांडीवर घाण केली तर आई मांडी कापत नसते. त्याप्रमाणे हा विषयही मोठ्या मनाने संपवून टाकावा, अशी विनंती राजन पाटील यांनी केली.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस मंगळवेढा

संबंधित बातम्या

कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

जुन्या वादातून तुफान हाणामारी; दोन्ही गटांचे एकमेकांवर गंभीर आरोप, मंगळवेढा पोलीस ठाण्यात १६ जणांवर गुन्हे दाखल

August 13, 2026
शेतकऱ्यांनो! आता यापुढे दुष्काळाच्या झळा बसणार नाहीत; तामदर्डीत बंधाऱ्याच्या कामाला आजपासून प्रत्यक्षात सुरवात; माचणूरात आज आ.आवताडे यांचा नागरी सत्कार व शेतकरी मेळाव्याचे आयोजन

मंगळवेढ्याचा पाणीप्रश्न सुटणार! ५ टीएमसी पाण्यासाठी सर्व्हेचे आदेश; आमदार समाधान आवताडेंच्या पाठपुराव्याला यश

August 12, 2026
धक्कादायक! सोलापुरात गेल्या २४ तासांत खुनाच्या तीन घटना; १६ महिन्यांच्या मुलाचा आईकडून खून

मंगळवेढ्यात थरार! काळ्या स्कॉर्पिओतून आले अन् चाकू-रॉडने हल्ला केला; कार बंद पडल्याचा फायदा घेत कुटुंबाला धाक दाखवून १ लाख ४ हजारांचा मुद्देमाल लांबवला

August 12, 2026
सामाजिक भान! सिद्धनाथ सलगर यांच्या वाढदिवसानिमित्त चिमुकल्यांना खाऊ वाटप; आज विविध शाळांमध्ये उपक्रमाचे आयोजन

सामाजिक भान! सिद्धनाथ सलगर यांच्या वाढदिवसानिमित्त चिमुकल्यांना खाऊ वाटप; आज विविध शाळांमध्ये उपक्रमाचे आयोजन

August 12, 2026
मुस्लिम जमियत मंगळवेढयाच्या ‘चेज रिपोर्ट’ प्रस्तावाला वक्फ मंडळाची मंजुरी; नवनिर्वाचित कार्यकारिणी जाहीर; इम्रान काझी उपाध्यक्ष

मुस्लिम जमियत मंगळवेढयाच्या ‘चेज रिपोर्ट’ प्रस्तावाला वक्फ मंडळाची मंजुरी; नवनिर्वाचित कार्यकारिणी जाहीर; इम्रान काझी उपाध्यक्ष

August 11, 2026
​मंगळवेढेकरांचा अभूतपूर्व प्रतिसाद! ‘दामाजी सिटी’मध्ये अवघे मोजकेच प्लॉट्स शिल्लक; खरेदीसाठी ‘दामाजी सिटी’ ठरतेय नागरिकांची पहिली पसंती

​मंगळवेढेकरांचा अभूतपूर्व प्रतिसाद! ‘दामाजी सिटी’मध्ये अवघे मोजकेच प्लॉट्स शिल्लक; खरेदीसाठी ‘दामाजी सिटी’ ठरतेय नागरिकांची पहिली पसंती

August 11, 2026
मंगळवेढ्यात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा, दहा जणांविरूध्द गुन्हे दाखल; तालुक्यात ‘या’ ठिकाणी जुगार अड्डे त्यांच्यावर कारवाई करण्याची महिला वर्गाची मागणी

मंगळवेढा पोलिसांना संभाजी ब्रिगेडचे थेट आव्हान; अवैध धंदे रोखा, नाहीतर १५ ऑगस्टला आमरण उपोषण

August 11, 2026
मंगळवेढ्यातील सर्वात बेस्ट लोकेशन! नर्मदा पार्क मधील फक्त 13 N/A प्लॉट शिल्लक; बस स्टँड, पासून फक्त 2 मिनिट अंतरावर; त्वरा करा ही संधी पून्हा नाही; संपर्क अमर डेवलपर्स 9132105105/9823533526

मंगळवेढ्यात तुमची जमीन, प्लॉट किंवा घर विकायचंय? मिळवा सर्वोत्तम किंमत आणि १००% सुरक्षित व्यवहार; पारदर्शकता आणि विश्वासाचे एकमेव नाव ७/१२ डेव्हलपर्स; 9970766262 व 9890605962 आजच संपर्क साधा

August 9, 2026
वाहतूक पोलिसाच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून देण्याचा प्रयत्न; सोलापूर जिल्ह्यातील धक्कादायक घटना

चालू हॉटेल मागून येऊन पेटवले, एक लाखाचे नुकसान; अज्ञात विकृतावर मंगळवेढ्यात गुन्हा दाखल; मंगळवेढ्यात नेमकं काय घडलं

August 8, 2026
Next Post
जबरदस्त ऑफर! मंगळवेढा शहरात इंटरनेट ब्रॉडबँड बरोबर सर्व HD टीव्ही चॅनल अगदी मोफत; ग्लोबल वाय-फाय सर्व्हिसेसची नागरिकांसाठी घोषणा

काय सांगताय..! अनलिमिटेड इंटरनेटसोबत Youtube premium व 18+ पेक्षा जास्त OTT आणि 450+ पेक्षा जास्त लाइव टीवी चैनल्स; मंगळवेढ्यातील 'ग्लोबल वाय-फाय'ची पैसा वसूल ऑफर; 9766485679 या नंबरवर संपर्क साधा

ताज्या बातम्या

कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

जुन्या वादातून तुफान हाणामारी; दोन्ही गटांचे एकमेकांवर गंभीर आरोप, मंगळवेढा पोलीस ठाण्यात १६ जणांवर गुन्हे दाखल

August 13, 2026
शेतकऱ्यांनो! आता यापुढे दुष्काळाच्या झळा बसणार नाहीत; तामदर्डीत बंधाऱ्याच्या कामाला आजपासून प्रत्यक्षात सुरवात; माचणूरात आज आ.आवताडे यांचा नागरी सत्कार व शेतकरी मेळाव्याचे आयोजन

मंगळवेढ्याचा पाणीप्रश्न सुटणार! ५ टीएमसी पाण्यासाठी सर्व्हेचे आदेश; आमदार समाधान आवताडेंच्या पाठपुराव्याला यश

August 12, 2026
धक्कादायक! सोलापुरात गेल्या २४ तासांत खुनाच्या तीन घटना; १६ महिन्यांच्या मुलाचा आईकडून खून

मंगळवेढ्यात थरार! काळ्या स्कॉर्पिओतून आले अन् चाकू-रॉडने हल्ला केला; कार बंद पडल्याचा फायदा घेत कुटुंबाला धाक दाखवून १ लाख ४ हजारांचा मुद्देमाल लांबवला

August 12, 2026
लाडकी बहीणनंतर लाडक्या भावांसाठीही योजना, दरमहा खात्यात येणार ‘इतकी’ रक्कम; पंढरपूरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा

भेसळखोरांचे धाबे दणाणले! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे रोखठोक आदेश, ‘हयगय करू नका, थेट मकोका लावा’

August 13, 2026
सामाजिक भान! सिद्धनाथ सलगर यांच्या वाढदिवसानिमित्त चिमुकल्यांना खाऊ वाटप; आज विविध शाळांमध्ये उपक्रमाचे आयोजन

सामाजिक भान! सिद्धनाथ सलगर यांच्या वाढदिवसानिमित्त चिमुकल्यांना खाऊ वाटप; आज विविध शाळांमध्ये उपक्रमाचे आयोजन

August 12, 2026
मुस्लिम जमियत मंगळवेढयाच्या ‘चेज रिपोर्ट’ प्रस्तावाला वक्फ मंडळाची मंजुरी; नवनिर्वाचित कार्यकारिणी जाहीर; इम्रान काझी उपाध्यक्ष

मुस्लिम जमियत मंगळवेढयाच्या ‘चेज रिपोर्ट’ प्रस्तावाला वक्फ मंडळाची मंजुरी; नवनिर्वाचित कार्यकारिणी जाहीर; इम्रान काझी उपाध्यक्ष

August 11, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..