टीम मंगळवेढा टाईम्स।
मंगळवेढा तालुक्यातील कात्राळ गावचे सुपुत्र बाबासाहेब अंकुश पांढरे हे डेहराडून येथे कर्तव्य बजावत असताना शहिद झाले आहेत.

बाबासाहेब अंकुश पांढरे हे गेल्या ८ वर्षापूर्वी सैन्यात भरती झाले होते. मिसामारी आसाम येथे ६७१ इ एम इ बटालियन मध्ये नर्सिंग असिस्टंट म्हणून ते कार्यरत होते.


मंगळवार दिनांक १८ नोव्हेंबर रोजी सकाळी दहा वाजता भारतीय सैन्यदलाच्या दुचाकीवरती आपले कर्तव्य बजावत अचानक २७१ साठा बॅटरीच्या वाहनाने पाठीमागून जोरात धडक दिल्याने ते जागीच शहीद झाले.


दोनच वर्षापूर्वी त्यांचा विवाह झाला होता. त्यांचे पश्च्यात आई-वडील, पत्नी, भाऊ असा परिवार आहे.


दरम्यान, जवान बाबासाहेब अंकुश पांढरे यांचे पार्थिव उद्या डेहराडूनहुन पुणे येथे आणले जाणार असून तेथून मुळगावी कात्राळ येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज













