मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
सोलापूर जिल्ह्यातील जवळपास ११ नगरपरिषदा आणि १ नगरपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक जाहीर झालेली आहे. त्यासाठी येत्या १० नोव्हेंबर पासून नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
त्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी त्या त्या नगरपरिषदांच्या निवडणूक प्रक्रियेसाठी निवडणूक निर्णय अधिकारी, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी आणि अतिरिक्त निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या नेमणूकीचे आदेश दिले आहेत.

यामध्ये मंगळवेढा तहसीलदार मदन जाधव, सोलापूर महापालिकेचे सहाय्यक आयुक्त गिरीश पंडीत, नायब तहसीलदार शिल कन्हेरे,

बार्शी नगरपरिषदेसाठी उपजिल्हाधिकारी अमोलसिंह भोसले हे निवडणूक निर्णय अधिकारी असणार आहेत तर त्यांना सहाय्यक म्हणून मुख्याधिकारी तैमुर मुलाणी आणि तहसीलदार एफ. आर. शेख असणार आहेत.

पंढरपूरसाठी प्रांताधिकारी सचिन इथापे, मुख्याधिकारी महेश रोकडे, तहसीलदार सचिन लुंगटे, अक्कलकोटसाठी उपजिल्हाधिकारी सुमित शिंदे, मुख्याधिकारी रमाकांत डाके, तहसीलदार विनायक मगर,

मैंदर्गीसाठी करमणूक कर अधिकारी शिल्पा ओसवाल, मुख्याधिकारी अर्जुन सुरवसे, नायब तहसीलार डी.एफ. गायकवाड, दुधनीसाठी तहसीलदार किरण गायकवाड, मुख्याधिकारी लक्ष्मीकांत कहर, नायब तहसीलदार संजय भंडारे,

करमाळा नगरपरिषदेसाठी तहसीलदार शिल्पा ठोकडे, सचिन तपासे, नायब तहसीलदार विजयकुमार जाधव, कुडुवाडीसाठी तहसीलदार सुजित नरहरे, मुख्याधिकारी विद्या पाटील, नायब तहसीलदार अनिल ठोंबरे,

सांगोला नगरपरिषद तहसीलदार संतोष कणसे, मुख्याधिकारी सुधीर गवळी, नायब तहसीलदार एस.एस. साळुंखे, अकलूज उपविभागीय अधिकारी विजया पांगारकर, मुख्याधिकारी सचिन पाटील, तहसीलदार सुरेश शेजूळ,
मोहोळ नगरपरिषदेसाठी तहसीलदार निलेश पाटील, सोलापूर महापालिकेचे सहाय्य आयुक्त शशिकांत भोसले, नायब तहसीलदार सुधाकर धाईंजे,

अनगरसाठी तहसीलदार सचिन मुळीक, मुख्याधिकारी सुरेश भदर, नायब तहसीलदार संदेश भोसले हे निवडणूक निर्णय अधिकारी, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी आणि अतिरिक्त निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कामकाज पाहणार आहेत.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज










