mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

वेषांतर करून कृषिमंत्री दादा भुसे यांनी खत विक्रेत्यावर छापा

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2020
in Uncategorized
वेषांतर करून कृषिमंत्री दादा भुसे यांनी खत विक्रेत्यावर छापा

मंगळवेढा टाईम्स ऑनलाइन । खतविक्रेत्यांकडून शेतकऱ्यांची होणारी अडवणूक राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे Agriculture Minister Dada Bhuse यांनी वेषांतर करून रविवारी (२१ जून) उघडकीस आणली. विक्रेत्याने खत देण्यास टाळाटाळ केल्यानंतर शेतकऱ्याच्या वेषात गेलेले भुसे यांनी स्वत:ची ओळख सांगून अधिकाऱ्यांना दुकान तपासणीचे आदेश दिले. दुकानात मोठ्या प्रमाणात युरियाचा साठा आढळल्यानंतर विक्रेत्याविरुद्ध कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली. त्याचबरोबर गुणवत्ता नियंत्रण निरीक्षकासा सक्तीच्या रजेवर पाठविण्याचे आदेश दिल्याची माहिती कृषिमंत्री भुसे यांनी  दिली. Disguise of Agriculture Minister and print on fertilizer seller

खत खरेदी करताना शेतकऱ्यांची अडवणूक केली जाते. Farmers are barred from buying fertilizer एका खतावर दुसरे खत किंवा बियाणे घेण्याची सक्ती करण्यात येते. युरियाची जादा दराने विक्री करण्यात येत आहे, अशा तक्रारी कृषिमंत्री दादा भुसे यांच्याकडे करण्यात आल्या होत्या. त्यांची सत्यता पडताळणीसाठी कृषिमंत्री मालेगाव येथून आज दुपारी दीडच्या सुमारास थेट औरंगाबादमध्ये आहे. आपल्याला कोणी ओळखू नये म्हणून त्यांनी चेहऱ्यावर मोठा बागायतदार रुमाल बांधला.

एका कार्यकर्त्याच्या दुचाकीवरून ते दुपारी दोनच्या सुमारास जाधववाडी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती आवारातील नवभारत फर्टिलायझर्स या दुकानात पोचले. सर्वसामान्य शेतकऱ्यांप्रमाणे त्यांनी दुकानदाराकडे युरिया खताची मागणी केली, परंतु खत उपलब्ध नसल्याचे उत्तर विक्रेत्याने दिले. ‘दहा नसतील तर, किमान पाच बॅग तरी युरिया द्या,’ अशी विनंती त्यांनी केली.

तब्बल अर्धा तास ते विक्रेत्याची खतासाठी विनवणी करीत होते, परंतु विक्रेत्यांकडून, ‘खत उपलब्ध नाही,’ हेच उत्तर येत होते. त्यावेळी भुसे यांनी,’फलकावर खताचा साठा असल्याचे का लिहिलेले आहे, साठा रजिस्ट्रर कुठे आहे,’ अशी विचारणा केली. त्यावर विक्रेत्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. दुकानात अनागोंदी आहे, हे लक्षात आल्यावर कृषिमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना घटनास्थळी बोलवून घेतले.

अन् विक्रेता झाला हैराण

सर्वसामान्य शेतकरी म्हणून युरिया खरेदीसाठी आलेल्या भुसे यांनी कृषी अधिकारी दाखल होताच आपले खरे रूप उघड केले. त्यामुळे संबंधित दुकानदार, तेथील कर्मचाऱ्याला आणि कृषी अधिकाऱ्यांनाही घाम फुटला.

युरियाचा मोठा साठा आढळला

कृषी अधिकारी दाखल होताच कृषिमंत्र्यांनी त्यांना फैलावर घेत दुकान आणि विक्रेत्याच्या सात गोदामांची तपासणी करण्याचे निर्देश दिले. दुकानाचा आणि गोदामाचा पंचनामा केल्यानंतर दुकानात युरियाची १ हजार ३८६ पोती शिल्लक असल्याचे आढळून आले. या दुकानदारावर कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. त्याचबरोबर औरंगाबाद येथील गुणवत्ता नियंत्रण अधिकाऱ्यालाही सक्तीच्या रजेवर पाठविण्याच्या सूचना दिल्या. दुकानातूनच कृषी विभागाच्या सचिवांना दूरध्वनीकरून यंत्रणांनी अधिक प्रभावी कारवाई करण्याची गरज असल्याच्या सूचनाही दिल्या.

राज्यभरातील कृषी विक्रेत्यांनी शेतकऱ्यांना विशिष्ट कंपनीचीच खते, बियाणे घेण्याची सक्ती करू नये. शिल्लक असतानाही युरिया शेतकऱ्यांना न देणे याबाबी खपवून घेतले जाणार नाही, अशा इशाराही कृषिमंत्र्यांनी दिला.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: Maharashtra MazaRecent News

संबंधित बातम्या

सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

खळबळ! मुलीच्या लग्नासाठी बुक केलेले सोन्याचे दागिने न देता चार लाखांची फसवणूक; विधवा महिलेची पोलीस ठाण्यात धाव; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

January 1, 2026

1 april to 9 april birthday

March 31, 2023

आठ मार्च वाढदिवस

March 8, 2023

प्रा.शिवाजीराव काळुंगे सर वाढदिवस

March 6, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

पालकांनो! दहावी निकालाच्या तारखेची अद्याप घोषणा नाही; विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला

June 15, 2022
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

July 21, 2021
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही! खत विकेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू; शेतकरी संघटना गप्प का?

July 12, 2021
रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे : मुजम्मील काझी

केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढ न थांबवलेस राष्ट्रवादी पद्धतीत अंदोलन करू; मुजम्मील काझी यांचा इशारा

May 17, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

मंगळवेढेकरांनो नीट समजून घ्या! शहरात दुकानासाठी पुर्वीचेच नियम लागू असतील; विनाकारण बाहेर पडाल तर…

May 17, 2021
Next Post
SSC व HSC चा निकाल आणखी लांबणार? ‘या’ तारखांना लागण्याची शक्यता

SSC व HSC चा निकाल आणखी लांबणार? 'या' तारखांना लागण्याची शक्यता

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मोठी बातमी! वर्षाला ‘इतके’ गॅस सिलिंडर मोफत देणार; युती सरकार आणा, पुढील 5 वर्षे वीज मोफत.; भरसभेत अजित पवारांची मोठी घोषणा

विमान कोसळताना पहिल्यांदा झाडावर धडकलं नंतर खाली पडलं, अजित पवारांच्या अपघातातचा पहिला अहवाल समोर; वाचा A to Z रिपोर्ट…

February 28, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

धक्कादायक! आई-वडील झोपेतून उठले नाही म्हणून जाऊन पाहिलं; तोंडातून फेस आलेला अन्…, सोलापुरात राहत्या घरात आढळला पती-पत्नीचा मृतदेह

February 28, 2026
जिल्हाधिकाऱ्यांच्या कामाला राष्ट्रीय पुरस्कार, राष्ट्रपतींच्या हस्ते आज दिल्लीत सन्मान; सोलापुर जिल्ह्यात लवकरच गडचिरोलीचा ‘आशीर्वाद’ पॅटर्न

सोलापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा: जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी जबाबदारी

February 28, 2026
सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

सुतार इंटरनॅशनल स्कूलवर कारवाईची भीती कुणाला? पोलिसांच्या संशयास्पद भूमिकेने पालक संतप्त; २० विद्यार्थ्यांचे करिअर राख रांगोळी करणाऱ्या सुतार स्कूलवर पोलीस मेहेरबान का?

February 28, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

मोठी बातमी! सरपंचांच्या प्रशासकपदाला ब्रेक; उच्च न्यायालयाचे ‘या’ जिल्ह्यांसाठी अंतरिम आदेश

February 28, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

बापरे..! दहा हजारांचे झाले दोन लाख, तरीही सावकाराचा तगादा; मजुरी करणाऱ्या तरुणानं चिठ्ठी लिहून जीवन संपवलं

February 27, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा