टीम मंगळवेढा टाईम्स।
मंगळवेढा येथील विराज कन्स्ट्रक्शनचे संचालक उमेश मासाळ यांना गोव्यात दामाजी एक्सप्रेसचा राष्ट्रीय पातळीवर वास्तुरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
प्रसिद्ध अभिनेत्री वर्षा उसगावकर व जेष्ठ अभिनेते अर्जुन फिरोज खान यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.
याप्रसंगी माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते लातीब तांबोळी, भाजप जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण, प्रसिध्द कवी अरुण म्हात्रे, उद्योजक तनावीर इनामदार, रहाटेवाडीचे बागायतदार रवी पवार,
मुख्याध्यापक अजित शिंदे सर, सेवानिवृत्त शिक्षक बबन ढावरे, मुन्नाराज भेंकी, उद्योजक नामदेव पवार, नॅशनल फॅब्रिकेशन बिलाल काझी, बबलू मसुरे, नमू पवार आदीजन उपस्थित होते.
विराज कॅट्रक्शनच्या माध्यमातून उमेश मासाळ यांनी नागरिकांच्या मनातील व स्वप्नातील घर कमीत कमी कालावधीत बांधून स्वप्न साकार करत आहेत.
आत्तापर्यंत त्यांनी 50 हुन अधिक घरे बांधून दिले असून तेपण अत्यंत गुणवत्तापूर्ण दर्जेदार बांधकाम करून कमी वेळेत सर्वसामान्य नागरिकांच्या मनात घर केले आहे.
उमेश मासाळ यांनी अतिशय खडतर प्रवास करत हॉटेल कामगार, भाजी विक्रेते ते एक यशस्वी ठेकेदार इथपर्यंत मोठी मजल मारली आहे. राष्ट्रीय पातळीवर पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे संपूर्ण मंगळवेढा तालुक्यात कौतुक केले जात आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज