टीम मंगळवेढा टाईम्स। 7588214814
(बातमीचे प्रायोजक श्री विठ्ठल मल्टिस्टेट)
सांगोला येथील श्री विठ्ठल मल्टीस्टेटचे चेअरमन दीपक बंदरे यांना महाराष्ट्र बिझनेस अवॉर्ड सिने अभिनेत्री प्राजक्ता माळी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
याप्रसंगी श्री.महालक्ष्मी पतसंस्थेचे चेअरमन हरिश्चंद्र तटाळे, विठ्ठल मल्टिस्टेटचे सीईओ महेश दिघे, विठ्ठल मल्टिस्टेटचे मॅनेजर तुषार तपेले, महादेव म्हमाणे, रोहन पाटणे, अमीर बागवान, आनंद मार्डे, आकाश उबाळे, सचिन तटाळे, प्रवीण भगत, महेश घोंगडे, उत्तम दिघे, श्रीकृष्ण माने, वैभव बंदरे, राज सरवडे, हरी मोहिते, प्रमोद पाटील, नितीन दिघे आदीजन उपस्थित होते.
आपल्या स्वकर्तृत्वावर बँकिग क्षेत्रात यशस्वीतेकडे वाटचाल झालेली श्री विठ्ठल मल्टीस्टेट या संस्थेने चेअरमन दिपक बंदरे यांच्या मार्गदर्शनाखाली आर्थिक क्षेत्रात एक चांगली घडी बसवली आहे.
एकूण २५ शाखेद्वारे महाराष्ट्र व कर्नाटक या राज्यात उत्कृष्ट आर्थिक सेवा बजावत आहे. या सेवेचा गौरव म्हणून नाशिक येथे रिसेल इन यांचे सौजन्याने हा पुरस्कार दिला गेला आहे.
या पुरस्कार सोहळ्यासाठी अभिनेत्री प्राजक्ता माळी, डेप्युटी कमिशनर जी.एस.टी. समाधान महाजन, सकाळ मीडिया ग्रुप नाशिकचे विक्रांत मते, हेमंत राठी चेअरमन राम बंधू मसाले हे उपस्थित होते.
श्री विठ्ठल मल्टीस्टेट ही फायनानशिअल क्षेत्रात व विश्वासच्या जोरावर अतिशय चांगली सेवा पुरवत आहे. सोनेतारण कर्ज, महिला बचत गट कर्ज, मॉर्गेज लोन तसेच सरकारी नोकरदार कर्ज योजना चालू आहे.
१२% वार्षिक व्याज दराने ठेवीवर आकर्षक व्याज देते तसेच १०० दिवसासाठी १०% योजना व इच्छापूर्ती ठेव योजना, मासिक ठेव योजना रिक्रिंग साठी विविध आकर्षक योजना यासाठी नावलौकिक आहे.
तसेच एनईएफटी, आरटीजीएस, आय एम पी एस, मोबाईल बँकिंग देणारी व प्रत्यक्षपणे सुरळीत सेवा देणारी जिल्ह्यातील एकमेव संस्था आहे. सभासदांमध्ये आपल्या व्यवहारातून विश्वास निर्माण करण्यात यशस्वी झालेली आहे.
प्रशिक्षित कर्मचारी वर्ग, तत्पर सेवा याबाबतीत श्री विठ्ठल मल्टीस्टेट नावलौकिकास पात्र झाली आहे. एकूणच संस्थापक चेअरमन दीपक बंदरे यांनी केलेल्या अलौकिक कार्याचा गौरव म्हणून हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज