mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

महापुराचा धोका टाळण्यासाठी ‘या’ ठिकाणी पाणी सोडावे लागणार; उजनीतून पाणी सोडल्यास पूरस्थितीची भीती

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
June 20, 2025
in सोलापूर
पावसाचा कहर! उजनीतून दीड लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग, भीमाकाठी सावधानतेचा इशारा 

मंगळवेढा टाइम्स न्युज नेटवर्क ।

उजनी धरणाच्या इतिहासात पहिल्यांदाच धरण जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्चात ६० टक्क्यांपेक्षा जास्त भरले आहे. धरणात ९५ पीएमसी पाणीसाठा आहे. त्यामुळे जुलै महिन्यामध्ये भीमा नदीला महापुराची भीती व्यक्त होत आहे.

तसेच आषाढी यात्रेवरदेखील महापुराचे सावट आहे. महापूर आल्यास शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे. त्यामुळे आता कॅनॉलद्वारे उजनी धरणातून पाणी सोडण्याची मागणी होत आहे.

यंदा मे महिन्यातच मान्सूनपूर्व पावसाने सोलापूर जिल्ह्याला झोडपून काढले. उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातदेखील मुसळधार पाऊस झाल्याने जून महिन्याच्या पंधरा तारखेलाच उजनी धरण ५० टक्के भरले होते.

आता पुणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे. धरणामध्ये १८ हजार क्यूसेक वेगाने पाणी येत आहे, तर नीरा नदीमधून देखील मोठ्याप्रमाणात पाणी भीमा नदीत येत आहे. त्यामुळे जुलै महिन्यात भीमा नदीला महापूर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

भीमा नदीला महापूर आल्यास नदीकाठच्या शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. तसेच नदीकाठच्या गावांना आणि शहरांना महापुराचा मोठा फटका बसतो. महापुराचा संभाव्य धोका टाळण्यासाठी त्यामुळे उजनी धरणाच्या उजव्या आणि डाव्या कालव्यातून तसेच भीमा नदीद्वारे पाणी सोडण्याची मागणी आता शेतकऱ्यांमधून होत आहे.

उपाय शोधणे गरजेचे

उजनी धरणातून पाणी सोडण्याची शेतकरी आणि नदीकाठच्या गार्यातून मागणी होत आहे. सध्या धरण ६० टक्के भरले आहे. ते ७४ टक्के भरल्याशिवाय पाणी सोडण्याचा निर्णय घेता येत नाही.

उजनी धरणाच्या व्यवस्थापन समितीची चर्चा करून संभाव्य महापूर कसा रोखता येईल, याबाबत उपाययोजना करणे गरजेचे आहे. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दोन दिवसांपूर्वी प्रशासनाची बैठक घेऊन पूरस्थितीवर नियंत्रण ठेवण्याच्या सूचना दिल्या होत्या.

पाणीपुरवठा करणारे सर्व बंधारे भरून घेण्यात यावे

उजनी धरणाच्या पाण्याचे नियोजन कागदावर वेगळे आणि प्रत्यक्षात वेगळे असाच अनुभव सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आहे. यंदा आषाढी यात्रेकडे मुख्यमंत्र्यांपासून सर्वांचे लक्ष आहे. यात्रेत महापुराचा धोका टाळण्यासाठी उजनीतून ताबडतोब पाण्याचा विसर्ग सोडण्यात यावा. सोलापूर पाणीपुरवठा करणारे सर्व बंधारे भरून घेण्यात यावे. जेणेकरून अतिरिक्त पाऊस झाल्यास धरण भरण्यास मदत होईल व अन् वारीला पाणी सोडल्याने पूरस्थिती निर्माण होणार नाही. – राजू खरे, आमदार

आषाढी यात्रेच्या काळात महापूर आल्यास याचा फटका

भीमा नदीला पूर आल्यानंतर फक्त शेतीचेच नुकसान होत नाही; तर पंढरपूर शहराच्या सखल भागामध्ये पाणी घुसल्याने पंढरपूरच्या नागरिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होते. अशामध्येच आषाढी यात्रेच्या काळात महापूर आल्यास याचा फटका वारकऱ्यांबरोबर स्थानिक रहिवासी आणि व्यापाऱ्यांनाही होतो. त्यामुळे आता उजनी धरणातील पाण्याचे योग्य नियोजन करून पाणी सोडण्याची मागणी पंढरपुरातील नागरिकही करत आहेत. सचिन पाटील, शेतकरी

योग्य निर्णय घेण्याची गरज

पंढरपूरला महापुराचा धोका फक्त उजनी धरणातून येणाऱ्या पाण्यापासूनच नाही; तर नीरा नदीचे पाणी थेट भीमा नदीत येते. त्यामुळे दोन्ही बाजूंनी धोका असल्याने पाणी सोडण्याबाबत तत्काळ आणि योग्य निर्णय घेण्याची गरज आहे. त्याचप्रमाणे उजनी धरणातून पाणी न सोडल्यास महापुराचा धोका होऊ शकतो, याची भीतीही त्यांनी व्यक्त केली आहे.  शाम गोगाव, अभ्यासू नागरिक, पंढरपूर

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: उजनी धरण

संबंधित बातम्या

विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन परीक्षांसाठी वीजपुरवठा सुरळीत ठेवा

दुहेरी संकट! दुष्काळात ‘करंट’चा झटका; अंगाची लाही अन् विजेचा खोडसाळपणा; भीषण दुष्काळात सोलापूर जिल्ह्यात भारनियमनाचा घाव

October 11, 2026
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिलासा: पंचनामे पूर्ण; केंद्रीय पथक पाहणीसाठी दाखल; आज मंगळवेढ्यात; मदत कधी आणि किती मिळणार?

October 10, 2026
सोन्याच्या पावलांनी गौराई आली…; गौरी पूजनासाठी लागणारे साहित्य कोणते? ‘अशी’ करा पूजेची मांडणी

नवरात्र नऊ नाही, यंदा तब्बल १० दिवसांचे! सप्तमी तिथी वाढली; असा आहे घटस्थापनेचा मुहूर्त

October 10, 2026
पालकमंत्रिपदी नियुक्त झाल्यानंतर पहिल्यांदाच जयकुमार गोरे आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

मागणी करा, चारा डेपो लगेच सुरू होणार; सोलापूरच्या शेतकऱ्यांना पालकमंत्र्यांचा मोठा दिलासा; रब्बी पेरणीपूर्वी ‘हे’ तपासण्याचे आवाहन

October 8, 2026
दिपावलीचा दुसरा हप्ता कारखान्यांनी देऊन शेतकऱ्यांची दिवाळी गोड करावी; ऊस उत्पादक शेतकरी बालाजी गरड यांचे भावनिक आवाहन

मंगळवेढा तालुक्यातील शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी उपसरपंच बालाजी गरड यांची आक्रमक भूमिका; सर्व शेतकऱ्यांना विनाविलंब आर्थिक मदत व दुष्काळ निधी देण्याची मागणी

October 6, 2026
मोठी बातमी! सिद्धेश्वर रणे यांच्याकडे मंगळवेढा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाची धुरा; खा.धैर्यशील मोहिते पाटील यांनी सोपवली जबाबदारी

मोठी बातमी! सिद्धेश्वर रणे यांच्याकडे मंगळवेढा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाची धुरा; खा.धैर्यशील मोहिते पाटील यांनी सोपवली जबाबदारी

October 5, 2026
सबजेल हाऊसफुल्ल पंढरपूरचे कैदी मंगळवेढ्यात वर्ग; कोरोना संसर्गाची कैद्यांना भीती

मोठी बातमी! ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळीला अटक; एक वर्षासाठी येरवडा कारागृहात स्थानबद्ध, नेमकं कारण काय?

October 5, 2026

ई-पीक पाहणीसाठी शेतकऱ्याकडे ५०० रुपयांची खंडणी; साहाय्यकाची हकालपट्टी करत पोलिसांत गुन्हा दाखल; ​दुष्काळी अनुदानाची भीती दाखवून पैशांची मागणी

October 4, 2026
वाळू माफियांची मुजोरी तहसिलदारांच्या अंगावर गाडी घालून जीवे मारण्याचा प्रयत्न

मंगळवेढ्यात संतापाची लाट! आजपासून तालुका बेमुदत बंद; खोटे ॲट्रॉसिटी गुन्हे मागे घेण्यासह १२ आरोपींच्या तात्काळ अटकेची जोरदार मागणी; संपूर्ण जिल्ह्याचे लागले लक्ष

October 3, 2026
Next Post
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

एकाच खोलीत एकाच ओढणीने तरुण-तरुणीने संपवलं जीवन, चिठ्ठीत लिहिलं अस काही सगळेच झाले शॉक; सोलापूर जिल्ह्यातील घटनेने खळबळ

ताज्या बातम्या

नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत द्या! आमदार समाधान आवताडेंचे केंद्रीय पथकाला १७ कलमी मागण्यांची सनद; कर्जमाफी, चारा छावण्या अन् मोफत पाणी

October 11, 2026
विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन परीक्षांसाठी वीजपुरवठा सुरळीत ठेवा

दुहेरी संकट! दुष्काळात ‘करंट’चा झटका; अंगाची लाही अन् विजेचा खोडसाळपणा; भीषण दुष्काळात सोलापूर जिल्ह्यात भारनियमनाचा घाव

October 11, 2026
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिलासा: पंचनामे पूर्ण; केंद्रीय पथक पाहणीसाठी दाखल; आज मंगळवेढ्यात; मदत कधी आणि किती मिळणार?

October 10, 2026
मंगळवेढा तालुक्यात एकाच दिवशी कोरोनाने घेतला दोघांचा बळी; आज 10 जणांना लागण

मृतांच्या टाळूवरचं लोणी! कोरोनातील २२ मृतांवर कागदोपत्री ‘उपचार’ दाखवून लाटले २ कोटी; मृत्यूनंतर ६ वर्षांनी ‘उपचार’?

October 11, 2026
सोन्याच्या पावलांनी गौराई आली…; गौरी पूजनासाठी लागणारे साहित्य कोणते? ‘अशी’ करा पूजेची मांडणी

नवरात्र नऊ नाही, यंदा तब्बल १० दिवसांचे! सप्तमी तिथी वाढली; असा आहे घटस्थापनेचा मुहूर्त

October 10, 2026
पालकमंत्रिपदी नियुक्त झाल्यानंतर पहिल्यांदाच जयकुमार गोरे आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

मागणी करा, चारा डेपो लगेच सुरू होणार; सोलापूरच्या शेतकऱ्यांना पालकमंत्र्यांचा मोठा दिलासा; रब्बी पेरणीपूर्वी ‘हे’ तपासण्याचे आवाहन

October 8, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा