mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

लंडनमधली मुलाची भेट अधुरी राहिली, अहमदाबादमध्येच घात झाला; सांगोलच्या ‘या’ वृद्ध दाम्पत्याचा करुण शेवट

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
June 13, 2025
in राष्ट्रीय, सोलापूर
मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातात सर्वच्या सर्व 242 जणांचा मृत्यू;AP वृत्तसंस्थेचं हादरवणारं वृत्त

मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क। 

अहमदाबादमध्ये झालेल्या विमान अपघातामध्ये सांगोला तालुक्यातील वृद्ध दाम्पत्यालाही त्यांचा जीव गमवावा लागला आहे. महादेव तुकाराम पवार (वय 67) आणि त्यांच्या पत्नी आशा महादेव पवार (वय 55) यांचा या अपघातात मृत्यू झाला आहे.

महादेव पवार आणि आशा पवार हे लंडनमध्ये त्यांच्या मुलाला भेटायला निघाले होते. पवार दाम्पत्य हे सांगोला तालुक्यातील हातीदचे रहिवासी होते. पवार दाम्पत्याचा एक मुलगा अहमदाबादमध्ये तर दुसरा मुलगा लंडनमध्ये राहतो.

पवार दाम्पत्य सांगोल्याहून अहमदाबादला मुलाकडे गेलं होतं, तिथून ते लंडनच्या मुलाकडे निघाले होते. पवार दाम्पत्याचा लंडनमधील मुलगा बेकरीचा व्यवसाय करतो, त्याला भेटण्यासाठी महादेव पवार आणि आशा पवार लंडनला निघाले होते.

अहमदाबादहून लंडनला निघालेल्या या विमानात एकूण 230 प्रवासी आणि 12 क्रू मेंबर्स असे एकूण 242 प्रवासी होते, यातला एक प्रवासी वगळता उरलेल्या 241 प्रवाशांचा मृत्यू झाल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.

तर विमान ज्या ठिकाणी कोसळलं तिथेही काही जणांना जीव गमवावा लागल्याची माहितीही समोर आली आहे. या अपघातात मृत्यू झालेल्यांची संख्या 290 पर्यंत असण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

महाराष्ट्रातल्या 10 जणांनी गमावला जीव
अहमदाबादमधल्या या विमान अपघातामध्ये महाराष्ट्राच्या 10 जणांनी जीव गमावला आहे, यामध्ये 4 जण हे केबिन क्रूचे सदस्य आणि 6 जण प्रवासी होते. मुंबईच्या बदलापूरजवळ राहणारे दीपक पाठक हे सुद्धा या विमानामध्ये क्रू मेंबर म्हणून होते.

दीपक पाठक हे मागच्या 11 वर्षांपासून एअर इंडियामध्ये काम करत होते. तसंच मुंबईच्या रहिवासी असलेल्या एअर इंडियाच्या कर्मचारी अपर्णा महाडिक यांचंही या अपघातात निधन झालं आहे. क्रू मेंबर असलेल्या अपर्णा महाडिक या सकाळीच लंडनला जाण्यासाठी मुंबईहून अहमदाबादला गेल्या होत्या.

अपर्णा महाडिक या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनिल तटकरे यांच्या नातेवाईक आहेत. अपर्णा महाडिक या सुनिल तटकरे यांच्या सख्ख्या भाच्याच्या पत्नी आहेत. अपर्णा यांचे पतीही एअर इंडियामध्ये असल्याची माहिती समोर आली आहे. याशिवाय मैथिली पाटील, रोशनी सोनघरे या दोन क्रू मेंबर्सनाही जीव गमवावा लागला आहे.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: अहमदाबाद विमान अपघात

संबंधित बातम्या

मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

आत्याच्या मुलाशी लग्न, पदरात 2 मुली, सुखाचा संसार सुरू असतानाच महिलेनं मुलीसह संपवलं जीवन, सोलापूर जिल्ह्यात हळहळ

July 27, 2026
पावसाचा कहर! उजनीतून दीड लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग, भीमाकाठी सावधानतेचा इशारा 

सोलापूरकरांसाठी सर्वात मोठी खूशखबर! उजनी ७५ टक्के भरले; दोन-तीन दिवसांत धरण ‘इतक्या’ टक्क्यांचा टप्पा पार करणार; शेतकऱ्यांची वर्षभराची चिंता मिटणार

July 26, 2026
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

जमीन खरेदीचा व्यवहार पडला महागात! कमिशन बुडाल्याच्या रागातून तरुणावर कोयत्याने प्राणघातक हल्ला; दोघांवर गुन्हा दाखल

July 26, 2026
‘मी देवेंद्र फडणवीस शपथ घेतो की.’, महाराष्ट्रात ‘देवेंद्र’ पर्वाला सुरुवात; आजपासूनच फडणवीस यांच्यापुढे असतील ‘हे’ 5 आव्हान

शेतकरी कर्जमुक्ती योजनेत शेतकऱ्यांच्या खात्यात ‘या’ तारखेपर्यंत पैसे जमा होणार, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; योजनेतील प्रमाणपत्रप्राप्त शेतकरी

July 25, 2026
मंगळवेढ्यातील सर्वात बेस्ट लोकेशन! नर्मदा पार्क मधील फक्त 13 N/A प्लॉट शिल्लक; बस स्टँड, पासून फक्त 2 मिनिट अंतरावर; त्वरा करा ही संधी पून्हा नाही; संपर्क अमर डेवलपर्स 9132105105/9823533526

बंपर ऑफर! थेट खरेदी खतासोबत हक्काचा प्लॉट; मंगळवेढ्यात ‘दामाजी सिटी’चा धमाकेदार शुभारंभ; कमी बजेट, उत्तम लोकेशन

July 27, 2026
विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन परीक्षांसाठी वीजपुरवठा सुरळीत ठेवा

​शेतकऱ्यांना दिवसा वीज द्या आणि स्मार्ट मीटरची सक्ती थांबवा; बोंबाबोंब आंदोलन शिवसेना आक्रमक; मंगळवेढा महावितरणला ८ दिवसांची मुदत; नेमकी अडचण आणि नागरिकांचा विरोध का?

July 24, 2026
नागरिकांनो! धैर्यशील मोहिते पाटलांना विजयी करा, माढा, सोलापूर जिल्हा चमकेल; शरद पवारांनी पंढरपुरातील सभा गाजवली

आधी जंतरमंतरवर विद्यार्थ्यांशी संवाद, नंतर पंतप्रधानांची भेट; शरद पवारांच्या दुहेरी चालीने विरोधकही धास्तावले? दिल्लीच्या राजकारणात शरद पवारांची मोठी खेळी

July 23, 2026
शेतकऱ्यांना पीक कर्ज नाकारणाऱ्या बँकांची आता गय नाही; जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन स्वतः करणार अर्जांची तपासणी; ‘या’ ४ बँकांना नोटिसा

सातबारा, दाखले अन् मोजणी अर्ज आता थेट हातात; सोलापूर जिल्ह्यातील ११ मतदारसंघांत भव्य शिबिर; तुमच्या मतदारसंघात शिबिर कधी आणि कुठे?

July 25, 2026
महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

बळीराजाला मोठा दिलासा! सोलापूर जिल्ह्यातील ‘या’ चार गावांतील शेतकऱ्यांना पांडुरंग पावला; कर्जमाफीच्या पहिल्या यादीमध्ये २१ शेतकऱ्यांचा समावेश

July 23, 2026
Next Post
महाराष्ट्रातील ‘या’ भागात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासनाला सतर्क राहण्याचं आवाहन

वारं फिरलं! पुढचे 48 तास 'या' 3 जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट; महाराष्ट्रावर मोठं संकट

ताज्या बातम्या

मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

आत्याच्या मुलाशी लग्न, पदरात 2 मुली, सुखाचा संसार सुरू असतानाच महिलेनं मुलीसह संपवलं जीवन, सोलापूर जिल्ह्यात हळहळ

July 27, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

मोठी बातमी! ग्रामपंचायतींच्या निवडणुका लांबणार; ‘या’ तारखेची मतदार यादी स्थगित? पाहा नवीन वेळापत्रक

July 27, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

पाणी वाहून जातंय अन् पिके करपताहेत! भीमा काठच्या शेतकऱ्यांसाठी ८ तास विजेची आमदार समाधान आवताडे यांची मुख्यमंत्र्यांकडे आग्रही मागणी

July 27, 2026
पावसाचा कहर! उजनीतून दीड लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग, भीमाकाठी सावधानतेचा इशारा 

सोलापूरकरांसाठी सर्वात मोठी खूशखबर! उजनी ७५ टक्के भरले; दोन-तीन दिवसांत धरण ‘इतक्या’ टक्क्यांचा टप्पा पार करणार; शेतकऱ्यांची वर्षभराची चिंता मिटणार

July 26, 2026
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

जमीन खरेदीचा व्यवहार पडला महागात! कमिशन बुडाल्याच्या रागातून तरुणावर कोयत्याने प्राणघातक हल्ला; दोघांवर गुन्हा दाखल

July 26, 2026
मंगळवेढ्यात रंगणार साहित्यरत्न डॉ. अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव; विविध सामाजिक उपक्रम आणि शैक्षणिक साहित्य वाटप, भव्य मिरवणुकीचे आयोजन

मंगळवेढ्यात रंगणार साहित्यरत्न डॉ. अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव; विविध सामाजिक उपक्रम आणि शैक्षणिक साहित्य वाटप, भव्य मिरवणुकीचे आयोजन

July 26, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा