mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

दानशूर भक्त! मंगळवेढ्यातील श्री.संत दामाजी मंदिर बांधकामाला ‘या’ भाविकांकडून लाखांची देणगी; मंदिराच्या जिर्णोदराचे काम आधुनिक पद्धतीने सुरू

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
May 9, 2025
in मंगळवेढा
दानशूर भक्त! मंगळवेढ्यातील श्री.संत दामाजी मंदिर बांधकामाला ‘या’ भाविकांकडून लाखांची देणगी; मंदिराच्या जिर्णोदराचे काम आधुनिक पद्धतीने सुरू

टीम मंगळवेढा टाईम्स ।

दुष्काळात ज्वारीचे कोठार खुले करणाऱ्या संत दामाजीपंतांच्या मंदिर बांधकामाचे काम सुरू आहे, मंदिराचे बांधकाम जवळपास पूर्णत्वाकडे जात असताना मंगळवेढ्यातील दानशूर भाविक

मधुकर भीमराव उन्हाळे व त्यांच्या पत्नी सौ सखुबाई मधुकर उन्हाळे या दांपत्याने संत दामाजीपंत मंदिर समितीचे आवताडे अध्यक्ष विष्णुपंत यांच्याकडे बांधकामासाठी म्हणून एक लाख रुपयांची रोख रकमेची देणगी दिली आहे.

देणगी स्वीकारताना मंदिर समितीचे सचिव सतीश पाटील, धनाजी देवकर, रामभाऊ मळगे, श्रीकांत भेंकी, नारायण सावंजी उपस्थित होते.

संत दामाजीपंतांच्या मंदिराच्या जिर्णोदराचे काम आधुनिक पद्धतीने सुरू असून पूर्वीच्या सभा मंडपाची उंची ६ फुटाणे वाढवली आहे,

गाभाऱ्याची रुंदी १० फूट होती ती १२ फूट करण्यात आली आहे, सभा मंडपातील खांब पूर्वी १४ होते. आता २० करण्यात आले आहेत,

मंदिराच्या शिखराची उंची ३५ फुटापर्यंत वाढवण्यात आली असुन गाभाऱ्यासाठी वापरण्यात येणारा दगड नांदेड इथून मागवण्यात आला आहे, याचे कारण म्हणजे येथील दगडात पोकळी कमी असून तो मजबूत व टिकाऊ आहे.

संत दामाजी पुण्यतिथीनिमित्त उद्यापासून विविध कार्यक्रम

श्री संत दामाजीपंत पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त १० ते १३ मे दरम्यान मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती संत दामाजी संस्थेचे अध्यक्ष विष्णुपंतबापू आवताडे यांनी दिली.

१० मे रोजी सकाळी ‘वीणापूजन दामाजी मंदिर समितीचे अध्यक्ष विष्णुपंत आवताडे व विश्वस्त प्रभाकर घुले यांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर श्री स्वामी समर्थ भजनी मंडळ व कान्होपात्रा भजनी मंडळ यांचा ‘संगीत भजन.

दुपारी १२ ते ४ या वेळेत भारुड, सायंकाळी ४ ते ५ या वेळेत केराप्पा लेंडवे, रा. लेंडवे चिंचाळे यांचे प्रवचन. सायंकाळी ७ते रात्री ९ ज्ञानेश्वर जाधव यांचे कीर्तन , रात्री ९ ते ११ हरिजागर होणार आहे.

११ मे रोजी भजन सम्राट मस्तान मुल्ला माचनूर व महादेव यादव मारापुर यांचे संगीत भजनाचा कार्यक्रम, दुपारी १२ ते ४ या वेळेत भारुड, सायंकाळी ४ ते ५ या वेळेत अशोक मोरे महाराज ब्रह्मपुरी यांचे प्रवचन,

संध्याकाळी ७ ते ९ या वेळेत दीनानाथ जाधव नांद्रेकर यांचा नरसिंह जयंती कीर्तन होणार असून रात्री ९ ते ११’ हरिजागर’ होणार आहे,

सोमवार दि.१२ मे रोजी सकाळी ७वाजता ‘संगीत भजन’, दुपारी १२ ते ४ या वेळेत भारुड, सायंकाळी ४ ते ५ या वेळेत विठ्ठल पाटील घरनिकी यांचे प्रवचन,

पुण्यतिथी पुष्पवृष्टी झाल्यानंतर सायंकाळी ७ ते ९ वासकर फड प्रमुख ह.भ.प विठ्ठलदादा वासकर महाराज आणि ह.भ.प. गोपाळ आण्णा बासकर महाराज यांचे कीर्तन होणार आहे, रात्री ९ ते ११ ‘हरिजागर होणार आहे.

मंगळवारी काल्याचे कीर्तनाने सांगता

मंगळवार दि.१३ मे रोजी सकाळी १० ते१२ या वेळेत ‘काल्याचे कीर्तन’ ह.भ.प. सुधाकर इंगळे महाराज, सोलापूर यांचे होईल ह.भ.प. नामदेव आबा दिडीवाले पंढरपूर यांचा’ दहीहंडी ‘सोहळा होणार आहे,

त्यानंतर दामाजी हमाल सोसायटी यांचेतर्फे’ महाप्रसादाचे वाटप करण्यात येईल. सोहळ्यासाठी सतीश पाटील, धनाजी देवकर, सिद्धेश्वर पट्टणशेट्टी, श्रीकांत भेंकी आदी परिश्रम घेत आहेत.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: श्री संत दामाजीपंत

संबंधित बातम्या

जनता संभ्रमात! भगीरथ भालकेंचे नेमकं चाललंय तरी काय, दोन दिवसात दोन वेगवेगळ्या पक्षाकडून भरले अर्ज; पंढरपूर-मंगळवेढ्याच्या जागेबाबत सस्पेन्स आणखी वाढला?

‘मायबाप जनता’ की सत्तेचा सुगंध? भगीरथ भालकेंच्या ‘पक्षांतराची’ मंगळवेढा-पंढरपुरात मोठी चर्चा

April 5, 2026
राजकीय घडामोड! मंगळवेढा नगरपालिका नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून ‘या’ नावाची चर्चा; राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

नो पेमेंट-नो सर्व्हिस’! मंगळवेढा पालिकेचा थकबाकीदारांना दणका; अवघ्या ३ दिवसांत ‘इतक्या’ लाखांची वसुली; नळतोडणीसह धडक कारवाई

April 5, 2026
धक्कादायक! सोलापुरात गेल्या २४ तासांत खुनाच्या तीन घटना; १६ महिन्यांच्या मुलाचा आईकडून खून

सावधान! मंगळवेढ्यात तोतया पोलिसांचा सुळसुळाट; व्यापाऱ्याला लुटले, १.४५ लाखांची रोकड लंपास; ​अशी केली फसवणूक

April 5, 2026
ॲक्शन मोड! आमदार समाधान आवताडे यांची ‘या’ हॉस्पिटलला ‘सरप्राईज व्हिजिट’; रुग्णालयातील सुविधांची केली थेट तपासणी

ॲक्शन मोड! आमदार समाधान आवताडे यांची ‘या’ हॉस्पिटलला ‘सरप्राईज व्हिजिट’; रुग्णालयातील सुविधांची केली थेट तपासणी

April 4, 2026
सोलापूर जिल्ह्यात यांनाही असणार हेल्मेट बंधनकारक; दोन आठवडे प्रबोधन त्यानंतर दंडात्मक कारवाई

वाहन चालकांनो सावधान! मंगळवेढ्यात पोलिसांची धडक कारवाई; तब्बल २१ जणांवर गुन्हे दाखल; नेमके काय आहे प्रकरण?

April 3, 2026
मंगळवेढ्यातील महिलांच्या हाताला मिळणार हक्काचे काम; ‘सांची ब्युटी पार्लर’चा अल्प दरात व्यावसायिक प्रोफेशनल कोर्सेससाठी प्रवेश सुरू; काय आहे खास? जाणून घ्या…

मंगळवेढ्यातील महिलांच्या हाताला मिळणार हक्काचे काम; ‘सांची ब्युटी पार्लर’चा अल्प दरात व्यावसायिक प्रोफेशनल कोर्सेससाठी प्रवेश सुरू; काय आहे खास? जाणून घ्या…

April 3, 2026
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनो धीर धरा! सरकार तुमच्या पाठीशी; आ.समाधान आवताडेंकडून बांधावर जाऊन पाहणी; प्रशासनाला तातडीने दिले पंचनाम्याचे आदेश

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनो धीर धरा! सरकार तुमच्या पाठीशी; आ.समाधान आवताडेंकडून बांधावर जाऊन पाहणी; प्रशासनाला तातडीने दिले पंचनाम्याचे आदेश

April 3, 2026
महाराष्ट्रातील ‘या’ भागात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासनाला सतर्क राहण्याचं आवाहन

मंगळवेढ्यात निसर्गाचे ‘रुद्ररूप’; ४० अंशांच्या तडाख्यानंतर रात्री विजांच्या कडकडाटासह वरुणराजाची तुफानी बॅटिंग; बळीराजाच्या नजरा आकाशाकडे; आज हवामान खात्याचा अंदाज?

April 2, 2026
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

खळबळ! मंगळवेढ्यात पोलीस पाटलावर जीवघेणा हल्ला; काठ्यांनी बेदम चोपले, सोन्याची साखळी लुटली अन् भरचौकात केली जातीवाचक शिवीगाळ

April 2, 2026
Next Post
तगडा उमेदवार! पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघावर शिंदे गटाचा दावा; भैरवनाथ शुगरचे व्हा.चेअरमन अनिल सावंत निवडणूक लढवणार?

मतदारसंघातील प्रश्न सुटले नाहीत तर आंदोलन उभे करणार; शेतकरी, घरगुती ग्राहक, औद्योगिक धंद्याला बसला मोठा फटका; अनिल सावंत यांच्या नेतृत्वाखाली प्रशासनाला दिले निवेदन; 'या' आहेत प्रमुख मागण्या

ताज्या बातम्या

जनता संभ्रमात! भगीरथ भालकेंचे नेमकं चाललंय तरी काय, दोन दिवसात दोन वेगवेगळ्या पक्षाकडून भरले अर्ज; पंढरपूर-मंगळवेढ्याच्या जागेबाबत सस्पेन्स आणखी वाढला?

‘मायबाप जनता’ की सत्तेचा सुगंध? भगीरथ भालकेंच्या ‘पक्षांतराची’ मंगळवेढा-पंढरपुरात मोठी चर्चा

April 5, 2026
पंतप्रधान मोदींचा पुणे दौरा रद्द झाल्यानं सोलापूर विमानतळाचे उद्घाटन लांबले; मुख्यमंत्र्यांचा दौरा सहाव्यांदा पुढे ढकलला, आता ‘या’ तारखेला नियोजन

सोलापूरकरांची प्रतीक्षा संपली! आता हैदराबादसाठीही उड्डाण; बुकिंगला सुरुवात, ‘या’ तारखेला होणार पहिले उड्डाण

April 5, 2026
राजकीय घडामोड! मंगळवेढा नगरपालिका नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून ‘या’ नावाची चर्चा; राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

नो पेमेंट-नो सर्व्हिस’! मंगळवेढा पालिकेचा थकबाकीदारांना दणका; अवघ्या ३ दिवसांत ‘इतक्या’ लाखांची वसुली; नळतोडणीसह धडक कारवाई

April 5, 2026
धक्कादायक! सोलापुरात गेल्या २४ तासांत खुनाच्या तीन घटना; १६ महिन्यांच्या मुलाचा आईकडून खून

सावधान! मंगळवेढ्यात तोतया पोलिसांचा सुळसुळाट; व्यापाऱ्याला लुटले, १.४५ लाखांची रोकड लंपास; ​अशी केली फसवणूक

April 5, 2026
ॲक्शन मोड! आमदार समाधान आवताडे यांची ‘या’ हॉस्पिटलला ‘सरप्राईज व्हिजिट’; रुग्णालयातील सुविधांची केली थेट तपासणी

ॲक्शन मोड! आमदार समाधान आवताडे यांची ‘या’ हॉस्पिटलला ‘सरप्राईज व्हिजिट’; रुग्णालयातील सुविधांची केली थेट तपासणी

April 4, 2026

खाजगी सावकारकीचा कहर! सहा वर्षांत १० हजारांचे झाले सात लाख; राहते घर नावावर करूनही मुद्दल व व्याजासाठी दमदाटी व शिवीगाळ

April 3, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..