mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

मोठी बातमी! गृहमंत्रालयाने आधारकार्डबाबत घेतला मोठा निर्णय, या मतदारांची आता खैर नाही; पाहा काय निर्णय झाला

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
March 19, 2025
in राष्ट्रीय
सर्वात मोठी बातमी! लोकसभा निवडणुकीच्या तारखा ‘या’ दिवशी जाहीर होणार?; निवडणूक आयोगाच्या हालचाली सुरु

मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।

पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंकिंगनंतर आता निवडणूक आयोगाने मोठा निर्णय घेतला आहे. आता मतदानकार्ड हे आधार कार्डसोबत लिंक करण्यात येणार आहे.

सर्वोच्च न्यायालयाचे निकाल आणि घटनेतील तरतुदीनुसार निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला आहे. आज दिल्लीत झालेल्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला असून लवकरच यासंदर्भात तज्ज्ञांसोबत सल्लामसलत सुरू होणार आहे.

मतदार नोंदणी क्रमांकसोबत आधार क्रमांक लिंक करण्यात येणार आहे. याबाबत लवकरच तज्ज्ञांसोबत सल्लामसलत होईल. सर्वोच्च न्यायालयाचे निकाल आणि घटनेतील तरतुदीनुसार निर्णय घेतल्याची माहिती आयोगाने दिली आहे. आधार कार्ड फक्त ओळख प्रस्थापित करणारी व्यवस्था आहे, त्याचा संबंध नागरिकत्वाशी नाही.

मतदानाचा अधिकार फक्त नागरिकांनाच आहे. EPIC ला आधारशी जोडण्यासाठी निवडणूक आयोगाकडून कलम 326, आरपी कायदा, 1950 आणि संबंधित सर्वोच्च न्यायालयाच्या निकालांचा आधार घेऊन कारवाई करण्यात येणार आहे. दरम्यान, याबाबत युआयडीएआय आणि निवडणूक आयोगाच्या तज्ञांमध्ये तांत्रिक सल्लामसलत लवकरच सुरू होणार आहे.

निवडणूक आयोगाने नेमकं काय म्हटलं आहे?

भारतीय संविधानातील अनुच्छेद 326 नुसार मतदानाचा अधिकार फक्त भारतीय नागरिकांनाच दिला जाऊ शकतो. आधार कार्डच्या मदतीने एखाद्या व्यक्तीची ओळख समजू शकते. त्यामुळेच मतदान कार्ड आणि आधार क्रमांक लिंक केले जाणार आहेत.

ही सर्व प्रक्रिया संविधानातील अनुच्छेद 326 नुसार तसेच लोकप्रतिनिधी कायदा 1950 च्या कलम 23(4), 23(5) व 23(6) आणि सर्वोच्च न्यायालायाने दिलेल्या निर्णयाच्या अधीन राहूनच केली जाईल. लवकरच UIDAI आणि भारतीय निवडणूक आयोगाच्या तांत्रिक तज्ज्ञांसोबत याबाबत सल्लामसलत केली जाईल.

का घेतला हा निर्णय?

सध्या अनेक ठिकाणी एकाच मतदाराची नावे वेगवेगळ्या ठिकाणी नोंद होण्याचे प्रकार समोर आले आहेत. तसेच, बोगस मतदार ओळखणे आणि बनावट मतदान रोखण्यासाठी सरकार आणि निवडणूक आयोगाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. आधार कार्ड लिंकिंगमुळे प्रत्येक मतदाराची ओळख निश्चित करता येईल आणि निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता आणता येईल.

अंमलबजावणी कधी आणि कशी?

या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी निवडणूक आयोग लवकरच तज्ज्ञ आणि कायदेतज्ज्ञांसोबत चर्चा करणार आहे. केंद्र सरकारकडून यासाठी आवश्यक तांत्रिक सुधारणा करण्यात येतील. याबाबत लवकरच मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली जातील. मतदारांना त्यांचे आधार कार्ड लिंक करण्यासाठी एक निश्चित कालावधी दिला जाईल, तसेच, ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने ही प्रक्रिया पार पडणार आहे.

नागरिकत्व आणि गोपनीयतेबाबत आयोगाचे स्पष्टीकरण

निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे की, आधार कार्ड हे केवळ ओळख प्रस्थापित करणारे साधन आहे आणि त्याचा भारतीय नागरिकत्वाशी कोणताही संबंध नाही. त्यामुळे केवळ भारतीय नागरिकांनाच मतदानाचा अधिकार असेल. यासोबतच, नागरिकांची गोपनीयता आणि वैयक्तिक माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घेतली जाईल.

मतदान प्रक्रियेत काय बदल होणार?

बोगस मतदानाला आळा – आधार लिंकिंगमुळे नकली मतदार ओळखणे सोपे होईल.

एकाच मतदाराची अनेक ठिकाणी नोंद टाळली जाईल – मतदार यादी अधिक स्वच्छ आणि विश्वासार्ह होईल.

मतदान प्रक्रियेत पारदर्शकता वाढण्यास मदत – निवडणुका अधिक विश्वासार्ह आणि योग्य पद्धतीने पार पडतील.

आधार लिंकिंगच्या या निर्णयामुळे निवडणुकीची प्रक्रिया अधिक पारदर्शक होईल. बोगस मतदान रोखण्यास मदत होईल आणि प्रत्येक मतदाराची ओळख निश्चित करता येईल. मात्र, या प्रक्रियेत कोणत्याही मतदाराला अडचण येणार नाही, याची दक्षता घेणे आवश्यक आहे. आता नागरिक आणि राजकीय पक्ष या निर्णयावर कसा प्रतिसाद देतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: आधार कार्डमतदान कार्ड

संबंधित बातम्या

Gas booking Number : आता गॅस बुकिंगसाठी संपूर्ण देशात एकच नंबर; जूना नंबर करा डिलिट

मोठी बातमी! घरगुती गॅस सिलेंडर आणखी महाग होणार; केंद्र सरकारनं सांगितलं त्यामागचं मोठं कारण..

June 9, 2026
मोठी बातमी! केंद्र सरकारचा ऊस उप्तादक शेतकऱ्यांना दिलासा, महिला सुरक्षेवर भर, मोदी कॅबिनेटमधील पाच मोठे निर्णय

मोदीजी! सामान्यांनी जगायचं कसं? ​‘अच्छे दिन’ कुठे गेले? महागाईने गाठला उच्चांक; काँग्रेसची महागाई हटवण्यासाठी भाजपला आणले, पण आता जनतेवरच ‘महागाईचा सर्जिकल स्ट्राईक’

June 8, 2026
खुनीहल्ल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील आरोपीविरुद्ध २१ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा

तरुणपणी गोळी झाडली, म्हातारपणी शिक्षा झाली, 85 वर्षीय वृद्धाला 34 वर्षांनी कारावासाची शिक्षा; नेमकं प्रकरण काय?

June 5, 2026
प्रियकराच्या सांगण्यावरूनच जन्मदात्या आईने 9 महिन्याच्या बाळाचा गळा घोटला

धडाधड गोळीबार, सहा जणांचा मर्डर! मंगळवेढा तालुक्याच्या शेजारील राज्यात साऊथ सिनेमाला लाजवेल असं मन विचलित करणारं हत्याकांड; रस्ता रक्ताने माखला, हत्येचं कारण समोर

May 30, 2026
धक्कादायक! सोलापुरात गेल्या २४ तासांत खुनाच्या तीन घटना; १६ महिन्यांच्या मुलाचा आईकडून खून

स्कॉर्पिओमध्ये माजी सरपंच, झेडपी सदस्य पत्नी, आई आणि भाचीसह चार जणांना जिवंत जाळलं; पहिल्यांदा अपघाताचा बनाव, पण.. थरकाप उडवणारी घटना समोर

May 29, 2026
मोठी बातमी! केंद्र सरकारचा ऊस उप्तादक शेतकऱ्यांना दिलासा, महिला सुरक्षेवर भर, मोदी कॅबिनेटमधील पाच मोठे निर्णय

नागरिकांनो! पुढील वर्षभर सोनं खरेदी करू नका, पेट्रोल डिझेल जपून वापरा, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले जनतेला आवाहनं, कारण काय?

May 11, 2026
मोठी बातमी! केंद्र सरकारचा ऊस उप्तादक शेतकऱ्यांना दिलासा, महिला सुरक्षेवर भर, मोदी कॅबिनेटमधील पाच मोठे निर्णय

पश्चिम बंगालमध्ये सत्ता येताच पीएम मोदींचा मास्टर स्ट्रोक; ‘या’, योजनेला दिली मंजूरी, नागरिकांना होणार मोठा फायदा

May 5, 2026
नागरिकांनो! उद्यापासून देशभरात पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार; मोदी सरकारची मोठी घोषणा

बजेट कोलमडणार! पेट्रोल-डिझेलसह गॅस सिलेंडरच्या दरात मोठी वाढ करण्याचे संकेत; नव्या दरांची ‘इतक्या’ दिवसांत होणार घोषणा

May 3, 2026
मोठी बातमी! केंद्र सरकारचा ऊस उप्तादक शेतकऱ्यांना दिलासा, महिला सुरक्षेवर भर, मोदी कॅबिनेटमधील पाच मोठे निर्णय

कामाची बातमी! मोदी सरकारचा 10 हजार रुपये पेन्शन देण्याचा विचार; ‘या’ लोकांना होणार मोठा फायदा

April 24, 2026
Next Post
तगडा बंदोबस्त! सोलापूर व माढा लोकसभेसाठी आजपासून अर्ज दाखल होणार, अनामत रक्कम रोखच भरावी लागणार; उमेदवाराबरोबर ‘एवढ्या’ लोकांनाच प्रवेश

संतापजनक! मुलाकडून पोटगी मिळत नाही; वडिलांचा आत्महत्येचा प्रयत्न; सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात घेतले विष; प्रकृती...

ताज्या बातम्या

मोठी बातमी! धैर्यशील मोहिते पाटलांनी दिला भाजपा पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा; भाजपाची मोठी डोकेदुखी वाढणार

अदृश्य शक्तीनं आम्हाला साथ दिली, दुष्काळात ‘वसंत’ बहरेल; धैर्यशील मोहिते पाटलांनी व्यक्त केला विजयाचा विश्वास

June 19, 2026
‘चांगले दिवस येणार होते, पण तू सोडून गेलीस…’ रीलस्टार रोहिणी पारध्ये आत्महत्येप्रकरण; पतीची पहिली पोस्ट चर्चेत, नेमके कारण काय?

स्क्रीनवर लाखो फॉलोअर्स, पण खऱ्या आयुष्यात नरकयातना! रिल स्टार रोहिणी पाराध्येच्या मृत्यूचा खरा विलन अखेर समोर; मंगळवेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

June 19, 2026
मंगळवेढा ब्रेकिंग! पोलीस पाटलाचा अपघाती मृत्यू

ब्रेकिंग! सुसाट कंटेनरने दुचाकी उडवली मंगळवेवेढ्यातील शिवसेनेचा आक्रमक आणि निष्ठावंत चेहरा काळाच्या पडद्याआड

June 18, 2026
भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

सोलापुरात ‘सिंघम’ इफेक्ट! आता जनतेचाच थेट वॉच; दररोज येताहेत भेसळीच्या ढीगभर तक्रारी; सोलापूर FDA कडून दंडात्मक कारवाईचा बडगा सुरू

June 18, 2026
रक्ताच्या नात्याप्रमाणे सूर्योदय परिवार सदैव तुमच्या पाठीशी उभा राहील; अनिलभाऊंची भावनिक साद; सेवानिवृत्त व पदोन्नत कर्मचाऱ्यांचा ‘शाही सन्मान’

रक्ताच्या नात्याप्रमाणे सूर्योदय परिवार सदैव तुमच्या पाठीशी उभा राहील; अनिलभाऊंची भावनिक साद; सेवानिवृत्त व पदोन्नत कर्मचाऱ्यांचा ‘शाही सन्मान’

June 17, 2026
मोठी बातमी! ‘त्या ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा, कारवाई सुरू; ‘या’ जिल्ह्यात जे झालं…

राज्य सरकारची मोठी घोषणा! महिला बचत गटांना मिळणार अडीच एकर जमीन आणि 1 लाखांचं अनुदान; काय आहे योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये?

June 18, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा