टीम मंगळवेढा टाईम्स ।
राज्यभरातील दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. दूध उत्पादक शेतकऱ्यांच पाच रुपय थकीत दूध अनुदान सोमवारपासून शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार असल्याची माहिती पुढे आली आहे.
सप्टेंबरपर्यंतच 153 कोटींचं थकीत दूध अनुदान शेतकऱ्यांना मिळणार असल्याचे ही सांगितलं जातंय. राज्य सरकारकडून 339 कोटी दुग्धविकास विभागाकडे हस्तांतरित करण्यात आले आहे. तर अनुदानासाठी 759 कोटी रुपयांना ही मंजुरी देण्यात आली आहे.
यापूर्वीच पाच रुपये अनुदान योजनेचे 538 कोटींचं अनुदान वाटप झाले असून राज्यभरातील 11 लाख 906 शेतकरी यामधून लाभार्थी ठरले आहे. तर सात रुपये दूध अनुदान योजनेच्या 623 कोटींच्या फाइल्सची तपासणी सुरू असल्याची माहिती आहे.
पुढे आलेल्या माहितीनुसार, गाईच्या दुधाचे बाजार भाव ढासळल्याने सरकारने ही अनुदान योजना सुरू केली होती. या योजनेअंतर्गत थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होतात.
दरम्यान, दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या थकीत अनुदानासाठी 759 कोटी रुपयांना मंजुरी दिल्याने
दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी ठरली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नवी दिल्ली येथे भेट घेत, त्यांच्याशी विविध विषयांवर चर्चा केली. राज्य सरकारने गडचिरोलीत पोलाद क्षेत्रात मोठा पुढाकार घेतला असून, गडचिरोली आता देशाची स्टीलसिटी म्हणून विकसित होत आहे.
यादृष्टीने गडचिरोलीला माईनिंग हब म्हणून विकसित करण्यासाठी केंद्राने सहकार्य करावे, असे देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले. नागपूर विमानतळाच्या कामाला सुद्धा गती देण्यात आली असून, त्यात केंद्र सरकारसंदर्भातील काही विषयांबाबत सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी चर्चा केली.
यामुळे विमानतळ कामातील अडसर आता लवकरच दूर होतील. स्थानिक स्वराज्य संस्थांना 15 व्या वित्त आयोगाचा निधी लवकरात लवकर मिळावा, असाही एक विषय या चर्चेत होता. या सर्व बाबतीत सकारात्मक प्रतिसाद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला.
वर्ल्ड ऑडिओ, व्हीज्युअल अँड एन्टरटेंटमेंट समिट आयोजित करण्याची संधी महाराष्ट्राला दिल्याबद्दल या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले. 1 ते 4 मे या कालावधीत मुंबईत ही समिट होणार आहे.
याचनिमित्ताने मुंबईत आयआयटीच्या धर्तीवर आयआयसीटी (इंडियन इन्स्टिट्युट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी) सुद्धा स्थापन करण्यात येणार असून, त्यासाठी सुद्धा केंद्र सरकार निधी देणार आहे, त्याबद्दलही मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज