मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
मिळकत तारण ठेवून कर्ज घेतल्यानंतर त्याची परतफेड न करता ८६ लाख १९ हजार ९५९ इतकी थकबाकी ठेवली. शिवाय बँकेची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी
दोन कर्जदार, दोन जामिनदारांसह आठ जणांवर सदर बझार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. हा प्रकार जानेवारी २०१९ ते जून २०२३ दरम्यान घडला.
अरुणा दत्तात्रय इटाई, मनोज संजीव शेरला, ननोजकुमार लल्लनप्रसाद शर्मा, मंगला इटाई, अशोक गायकवाड, श्यामला महादेव ताकपिरे, जितेंद्र इटाई, जिलानी शेख (सर्व रा. सोलापूर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
दत्तात्रय वसंत चटके (वय ५३, रा. लकी चौक, सोलापूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून, अरुणा इटाई व मनोज शेरला या दोघांनी शरद नागरी सहकारी बैंक शाखा सोलापूर यांच्याकडे तारण मिळकत गहाण ठेवून ४० लाख रूपयाचे कर्ज घेतले.
मात्र, कर्जाची फरतफेड न केल्याने बँकेची ८६ लाख १९ हजार ९५९ इतकी थकबाकी झाली. असे असताना रजिस्टर गहाणखत क्र.५८७३/५/३८ सन २०१८ नुसार सब रजिस्टर कार्यालय, उत्तर सोलापूर-३ येथे तारण म्हणून लिहून दिलेली,
महापालिकेच्या हद्दीतील कसबे सोलापूर येथील सिटी सर्व्हे नं. ११३/३ पैकी क्षेत्र १ हेक्टर ० आर ही मिळकत कर्जदार व जामीनदारांनी संगनमताने जून २०२३ पर्यंत बँकेची आर्थिक फसवणूक केली. असे फिर्यादीमध्ये नमूद केले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज