mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच; लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
January 20, 2025
in क्राईम, सोलापूर
एक लाख रुपयांची लाच स्वीकारताना मंगळवेढ्यातील तत्कालीन मंडळअधिकारी रंगेहाथ सापडला

मंगळवेढा टाइम्स न्युज नेटवर्क ।

शेत जमिनीचा प्रलंबित निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयांची लाचघेतल्याचा प्रकार पंढरपूर उपजिल्हाधीकारी कार्यालयात घडला आहे. प्रांताधिकारी कार्यालयातील लिपिक व शिपाई हे दोघेही जाळ्यात सापडले आहेत. लाच लुचपत विभागानं या दोघांनाही रंगेहात लाच घेतना पकडलं आहे.

प्रलंबित असलेल्या शेत जमिनीचा निकाल देण्यासाठी 60 हजार रुपयाची लाच मागितली होती. आज या प्रकरणी 55 हजार रुपयांची लाच स्वीकारताना पंढरपूर उपविभागीय कार्यालयातील महसूल सहाय्यक किशोर मोहिते व शिपाई नितीन शिवाजी मेटकरी या दोघांना लाच लुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडले आहे.

ही कारवाई आज दुपारी उपविभागीय कार्यालयाच्या आवारात करण्यात आली आहे. या याप्रकरणी महसूल सहाय्यक किशोर भगवान मोहिते आणि शिपाई नितिन शिवाजी मेटकरी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारदाराच्या बाजूने निकाल देण्यासाठी मागितली होती लाच

यातील तक्रारीच्या शेत जमिनी संदर्भात येथील उपविभागीय अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल होती. यावर तक्रारदाराच्या बाजूने निकाल देण्यासाठी किशोर मोहिते यांनी 60 हजार रुपयांची मागणी केली होती. तडजोडी अंती 55 हजार स्वीकारण्याचे मान्य केले होते. त्यानुसार आज संध्याकाळी प्रांताधिकारी कार्यालयामध्ये रोख 55 हजार रुपये स्विकारताना नितीन शिवाजी मेटकरी याला रंगेहात पकडण्यात आले आहे.

आठ दिवसांपासून लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी रचला होता सापळा

आठ दिवसांपासून लाचलुचपत विभागाचे अधिकाऱ्यांनी सापळा रचला होता. 13 ते 17 जानेवारी दरम्यान आरोपी लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांना गुंगारा देत होते. आज अखेर सायंकाळी सहा वाजण्याच्या दरम्यान स्वतः च्या कार्यालयात लाच स्विकारताना सापडले.

या प्रकरणी पंढरपूर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना अटक करण्यात आली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस निरीक्षक गणेश पिंगुवाले यांच्या पथकाने ही कारवाई केली.

या याप्रकरणी महसूल सहाय्यक किशोर भगवान मोहिते आणि शिपाई नितिन शिवाजी मेटकरी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेतजमिनीसंदर्भात उपविभागीय अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल करण्यात आली होती.

दरम्यान, ज्याने उपविभागीय अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली होती, त्याच्या बाजूने निकाल देण्यासाठी महसूल सहाय्यक किशोर भगवान मोहिते आणि शिपाई नितिन शिवाजी मेटकरी यांनी 60 हजार रुपयांची लाट मागितली होती. मात्र, याप्रकरणी त्यांना रंगेहात पडकण्यात आलं आहे.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: लाच घेताना अटक

संबंधित बातम्या

विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन परीक्षांसाठी वीजपुरवठा सुरळीत ठेवा

कर्नाटकात ८ तास, महाराष्ट्रात फक्त २ तास वीज? भीमा नदीकाठच्या शेतकऱ्यांचा आक्रोश; शेती धोक्यात; आम्हाला कर्नाटकात जाऊ द्या; शेतकऱ्यांचा सरकारला थेट इशारा

July 12, 2026
जिल्हा दूध संघ अध्यक्ष निवडीची बैठक ‘या’ महिन्यात; आज सर्वच संचालक गैरहजर

तुकाराम मुंडे पॅटर्नचा सांगोल्यात थरकाप! ग्राहकांच्या जिवाशी खेळणारे रॅकेट रडारवर; १५ लाखांचे ३७ हजार लिटर भेसळयुक्त दूध ओतले गटारात

July 12, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

कागदपत्रे बनावट, विद्यार्थीही खोटे! सोलापुरात केंद्र सरकारच्या योजनेत मोठा गैरव्यवहार; बनावट विद्यार्थी दाखवून केंद्राची शिष्यवृत्ती लाटली

July 11, 2026
खुनीहल्ल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील आरोपीविरुद्ध २१ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा

बँकेचे पैसे बुडवणे भोवले! धनश्री मल्टीस्टेटची आक्रमक वसुली; कारखान्याच्या माजी संचालकाची थेट तुरुंगात रवानगी; न्यायालयाचा मोठा दणका

July 10, 2026
Transfer! मंगळवेढा पोलिस ठाण्याकडील ‘या’ पोलिस कर्मचार्‍यांच्या अन्यत्र बदल्या; नवीन ‘हे’ आले

मंगळवेढ्यात बुलेट राजांना दणका! पोलिसांची धडक कारवाई; मॉडिफाईड सायलेन्सर अन् विना नंबर प्लेटच्या ‘या’ वाहनांवर ‘ॲक्शन’

July 10, 2026
खळबळ! मंगळवेढा तालुक्यात पंतप्रधान किसान सन्मान योजनेत तब्बल २ हजार ६०० बोगस लाभार्थी

पुनर्वसनाच्या जमिनीवर डोळा! जमीन तुमची, आधार कार्ड खोटे अन् अंगठा दुसऱ्याचाच; मंगळवेढ्यात उजनी जमीन घोटाळ्याचा थरार, वाचून थक्क व्हाल; एजंट मालामाल

July 10, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

आ.समाधान आवताडेंचा धडाका! मंगळवेढ्याला म्हैसाळचे, तर पंढरपूरला कॅनॉलद्वारे मिळणार पाणी; वीज पुरवठाही ८ तास होणार

July 10, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

हट्टापायी पोटचा मुलगा गेला…; सांगोल्यातील ‘या’ घटनेने पालकांचे डोळे उघडले, नक्की वाचा काय घडलं?

July 8, 2026
शेतकऱ्यांना पीक कर्ज नाकारणाऱ्या बँकांची आता गय नाही; जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन स्वतः करणार अर्जांची तपासणी; ‘या’ ४ बँकांना नोटिसा

मंगळवेढ्यातील १ लाख ९९ हजार मतदारांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी! २००२ च्या यादीत नाव नसेल तर ‘या’ कागदपत्रांशिवाय पर्याय नाही

July 7, 2026
Next Post
‘मी देवेंद्र फडणवीस शपथ घेतो की.’, महाराष्ट्रात ‘देवेंद्र’ पर्वाला सुरुवात; आजपासूनच फडणवीस यांच्यापुढे असतील ‘हे’ 5 आव्हान

मोठी बातमी! राज्यातील सर्वच गड किल्ल्यांवरील अतिक्रमण हटवणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली डेडलाईन

ताज्या बातम्या

विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन परीक्षांसाठी वीजपुरवठा सुरळीत ठेवा

कर्नाटकात ८ तास, महाराष्ट्रात फक्त २ तास वीज? भीमा नदीकाठच्या शेतकऱ्यांचा आक्रोश; शेती धोक्यात; आम्हाला कर्नाटकात जाऊ द्या; शेतकऱ्यांचा सरकारला थेट इशारा

July 12, 2026
जिल्हा दूध संघ अध्यक्ष निवडीची बैठक ‘या’ महिन्यात; आज सर्वच संचालक गैरहजर

तुकाराम मुंडे पॅटर्नचा सांगोल्यात थरकाप! ग्राहकांच्या जिवाशी खेळणारे रॅकेट रडारवर; १५ लाखांचे ३७ हजार लिटर भेसळयुक्त दूध ओतले गटारात

July 12, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

कागदपत्रे बनावट, विद्यार्थीही खोटे! सोलापुरात केंद्र सरकारच्या योजनेत मोठा गैरव्यवहार; बनावट विद्यार्थी दाखवून केंद्राची शिष्यवृत्ती लाटली

July 11, 2026
महाराष्ट्रात मध्यावधी निवडणुका होण्याची परिस्थिती,भाजपच्या ‘या’ बड्या नेत्याचा दावा

उजनी पुनर्वसन जमीन घोटाळा! डमी खरेदीचे मोठे रॅकेट; एजंट झाले ‘मालामाल’, संपूर्ण रॅकेटची उच्चस्तरीय सखोल चौकशीची जनतेतून तीव्र मागणी

July 11, 2026
खुनीहल्ल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील आरोपीविरुद्ध २१ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा

बँकेचे पैसे बुडवणे भोवले! धनश्री मल्टीस्टेटची आक्रमक वसुली; कारखान्याच्या माजी संचालकाची थेट तुरुंगात रवानगी; न्यायालयाचा मोठा दणका

July 10, 2026
Transfer! मंगळवेढा पोलिस ठाण्याकडील ‘या’ पोलिस कर्मचार्‍यांच्या अन्यत्र बदल्या; नवीन ‘हे’ आले

मंगळवेढ्यात बुलेट राजांना दणका! पोलिसांची धडक कारवाई; मॉडिफाईड सायलेन्सर अन् विना नंबर प्लेटच्या ‘या’ वाहनांवर ‘ॲक्शन’

July 10, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा