mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

अ‍ॅक्शन प्लॅन तयार करूनच लॉकडाऊन जाहीर करणार : पालकमंत्री दत्तात्रय भरणे

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2020
in Uncategorized
अ‍ॅक्शन प्लॅन तयार करूनच लॉकडाऊन जाहीर करणार : पालकमंत्री दत्तात्रय भरणे

मंगळवेढा टाईम्स ऑनलाईन । सोलापुरातील कोरोना रुग्ण व मृत्यू संख्या वाढतेय; पण नागरिकांनी घाबरू नये. सर्वांना विश्वासात घेऊन पाच दिवस अगोदर सूचित करूनच लॉकडाऊन जाहीर करू. तत्पूर्वी, कोरोना रुग्ण व मृत्यू संख्या रोखण्यासाठीचा अ‍ॅक्शन प्लॅन तयार करूनच लॉकडाऊन जाहीर करू, असे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले. In Solapur city, we will announce the lockdown five days in advance ,  Guardian Minister Dattatraya bharane

शनिवारी सोलापूर दौर्‍यावर आलेले पालकमंत्री भरणे यांनी हत्तुरे वस्तीसह शहरातील काही कंटेन्मेंट झोनमध्ये पाहणी केली आणि तेथील नागरिकांशी लॉकडाऊन पुन्हा करण्याबाबत मते जाणून घेतली. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली. या बैठकीविषयी माहिती देताना पालकमंत्री भरणे म्हणाले, कोरोना रुग्ण संख्या आणि वाढता मृत्यूदर याबाबत प्रामुख्याने चर्चा झाली.

मृत्यूदर कमी करण्यासाठी पुण्यातील बी. जे. महाविद्यालयाच्या डॉक्टरांचे पथक सोलापुरात आले आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी नागरिकांचे सहकार्य आवश्यक आहे.

सोलाापूर शहरात मृत्यू वाढत आहेत. कारण येथे विडी कामगार, यंत्रमाग कामगार मोठ्या संख्येने आहेत. या कामगारांमध्ये प्रतिकारशक्ती कमी असते. अशा कामगारांमध्ये काही आजारी असतील तर त्यांना तातडीने दवाखान्यात उपचारासाठी दाखल करणे गरजेचे आहे. कंटेन्मेंट झोनमधील लोकांनी कडक लॉकडाऊन लागू करण्याची मागणी करताना सांगितले की मीठ, भाकरी खाऊन घरी राहू; पण लॉकडाऊन कराच आणि साखळी तोडा. काहीजणांनी लॉकडाऊनमुळे रोजीरोटीचा प्रश्न निर्माण होत असल्याचे सांगितले. अशी दोन मते आहेत. तरीदेखील लॉकडाऊनबाबत येत्या दोन दिवसांत सर्वांशी चर्चा करून पुढील आठवड्यात निर्णय घेऊ. लॉकडाऊनचा निर्णय अद्याप झालेला नाही; पण करायचाच झाला तर संपूर्ण शहरात करायचा की काही भागांत लॉकडाऊन करायचा याबाबत सर्वांना विश्वासात घेऊन निर्णय घेऊ. जनतेला सांगून किमान पाच दिवस अगोदर सूचना देऊनच लॉकडाऊनचा निर्णय घेतला जाईल,

अचानक लॉकडाऊन जाहीर केला जाणार नाही, योग्य तो निर्णय लवकरच घेऊ.

जिल्हाधिकारी व पोलिस आयुक्त दोघांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असून ते सध्या होम क्वारंटाईन असल्याने घरूनच काम करत आहेत. दोघेही सोमवारी कामावर रूजू होत आहेत. महापालिका आयुक्त बुधवारपर्यंत कामावर हजर होतील. मोठे अधिकारी कामावर नसले तरी घरून त्यांचे सर्व शहरावर लक्ष आहे. दुसरी टीम मेहनत घेत आहे. अधिकारी नाहीत म्हणून नागरिकांनी घाबरू नये, असे आवाहन करतो. पॉझिटिव्ह रुग्ण आणि मृत्यू संख्या वाढली म्हणून नागरिकांनी घाबरू नये.

एक लाख रॅपिड टेस्टसाठीचे किट येत्या तीन दिवसांत मिळतील. लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर टेस्ट झाल्या पाहिजेत. पॉझिटिव्ह आल्यानंतर कोणीही लॉकडाऊनमध्ये बाहेर पडले नाही पाहिजे. रुग्ण आढळल्यास त्यांना हॉस्पिटलची उपलब्धतता, क्वारंटाईनची सोय आदींची तयारी करूनच लॉकडाऊन होईल. पुण्याप्रमाणे टेस्टसाठी स्वतंत्र अधिकारी नियुक्त करण्यात येईल.

पुण्यातील तीन डॉक्टरांची टीम सोलापुरात आली आहे. या टीमकडून रुग्ण व मृत्यूच्या वाढत्या संख्येवर नियंत्रणासाठी काम होणार असून पुढील 15 दिवस टीम राहणार आहे. ‘महात्मा फुले आरोग्य’ योजनेचे राज्याचे प्रमुख डॉ. शिंदे आले आहेत.

शहरात अनलॉक केला; पण नियम पाळले जात नसून त्यावर कोणाचेही नियंत्रण नसल्याबाबत ते म्हणाले, पोलिस बंदोबस्त असणार असून आपण होमगार्ड यांनाही मुदतवाढ घेतली आहे. आपल्या मागणीमुळे सर्व राज्यांतील होमगार्डना मुदतवाढ मिळाली आहे.

शहर व जिल्ह्यात कोरोना रुग्ण व मृत्यू संख्या वाढत असतानाही जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, पोलिस आयुक्त क्वारंटाईनमध्ये घरातूनच चांगले काम करीत असल्याचे सांगत पालकमंत्र्यांनी सर्व अधिकार्‍यांना क्लिनचीट दिल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. प्रशासकीय अधिकारी जर चांगले काम करत असतील तर रुग्ण आणि मृत्यू संख्या वाढतेय आणि कोरोनाची साखळी तुटत नसल्याची उत्तरे अनुत्तरितच राहिली आहेत.

‘डीपीसी’तून महापालिकेला 3 कोटी दिले

3 कोटी 2 लाख रुपये महापालिकेला ‘डीपीसी’मधून दिले आहेत. निधीची कोणतीही काळजी करू नये. महापालिकेला लागेल तेवढा निधी दिला जाईल, काळजी करू नये, असेही पालकमंत्री भरणे यांनी सांगितले. महापालिका आयुक्त कोरोनामुक्त होऊन बुधवार, गुुरुवारपर्यंत कामावर हजर राहतील. लॉकडाऊनमध्ये एक लाख रॅपिड टेस्ट केल्यानंतर आढळणार्‍या रुग्णांच्या अनुषंगाने सर्व सुविधा उपलब्ध करण्यात येतील. लॉकडाऊनबाबत लोकांच्या भावना लक्षात घेऊन आणि सर्वांना विश्वासात घेऊनच पुढील आठवड्यात कडक लॉकडाऊनचा निर्णय घेऊ, असे ना.भरणे म्हणाले.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: Latest NewsSolapur

संबंधित बातम्या

सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

खळबळ! मुलीच्या लग्नासाठी बुक केलेले सोन्याचे दागिने न देता चार लाखांची फसवणूक; विधवा महिलेची पोलीस ठाण्यात धाव; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

January 1, 2026

1 april to 9 april birthday

March 31, 2023

आठ मार्च वाढदिवस

March 8, 2023

प्रा.शिवाजीराव काळुंगे सर वाढदिवस

March 6, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

पालकांनो! दहावी निकालाच्या तारखेची अद्याप घोषणा नाही; विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला

June 15, 2022
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

July 21, 2021
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही! खत विकेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू; शेतकरी संघटना गप्प का?

July 12, 2021
रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे : मुजम्मील काझी

केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढ न थांबवलेस राष्ट्रवादी पद्धतीत अंदोलन करू; मुजम्मील काझी यांचा इशारा

May 17, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

मंगळवेढेकरांनो नीट समजून घ्या! शहरात दुकानासाठी पुर्वीचेच नियम लागू असतील; विनाकारण बाहेर पडाल तर…

May 17, 2021
Next Post
करमाळ्यातील जिंतीत केशकर्तनालय दुकानदारास कोरोना

करमाळ्यातील जिंतीत केशकर्तनालय दुकानदारास कोरोना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

उन्हाचा कडाका वाढला, शाळेची वेळ बदलली; जिल्हा परिषद सीईओंनी काढला आदेश; ‘या’ सत्रात वाजणार घंटा

March 12, 2026
दादांचा वादा! मंगळवेढा पंचायत समितीच्या सभापतीपदी दीपाली ताड यांची वर्णी लागणार? महिला दिनी समर्थकांकडून सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव

मंगळवेढा पंचायत समितीवर आमदार समाधान आवताडे यांचेच वर्चस्व; सभापतीपदी दीपाली ताड, तर उपसभापतीपदी अर्जुन मल्लाळे

March 12, 2026
सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील एका गावाची निवड, १० लाख रुपयांचे बक्षीस; मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ ग्रामपंचायतीचा होणार सन्मान

पंचायत समिती सभापतीपदी ताड यांची वर्णी लागण्याची शक्यता; आरक्षण सर्वसाधारण महिलेसाठी; उपसभापती कोण होणार? याकडे लक्ष; दुपारपर्यंत निवड होणार

March 12, 2026
चविष्ट फालुद्याचा आनंद आता मंगळवेढ्यात! सोलापूरचे सुप्रसिद्ध ‘हरे कृष्णा आईसक्रीम पार्लर’ आजपासून तुमच्या भेटीला

चविष्ट फालुद्याचा आनंद आता मंगळवेढ्यात! सोलापूरचे सुप्रसिद्ध ‘हरे कृष्णा आईसक्रीम पार्लर’ आजपासून तुमच्या भेटीला

March 12, 2026
महाराष्ट्रातील ‘या’ भागात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासनाला सतर्क राहण्याचं आवाहन

शेतकऱ्यांनो! पाऊस पुन्हा कोसळणार; ‘या’ जिल्ह्यांवर संकट; थेट विजांच्या कडकडाटासह

March 11, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

लग्नाच्या चारच महिन्यात सुखी संसाराला दृष्ट लागली! मंगळवेढ्यात विवाहितेच्या आत्महत्येने खळबळ; पती गजाआड, सासू-सासरे फरार

March 11, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा