mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

सोलापूर जिल्ह्यातील राजकीय पडझड रोखण्यासाठी समाधान अवताडे यांना संधी देत पालकमंत्री बनविण्याच्या हालचाली सुरू?

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
November 29, 2024
in मंगळवेढा, राजकारण, राज्य
सोलापूर जिल्ह्यातील राजकीय पडझड रोखण्यासाठी समाधान अवताडे यांना संधी देत पालकमंत्री बनविण्याच्या हालचाली सुरू?

मंगळवेढा टाईम्स न्यूज नेटवर्क ।

राज्यात भाजप आणि महायुतीची सुनामी आलेली असताना सोलापूर जिल्ह्याने मात्र महाविकास आघाडीला 11 पैकी सहा जागा देत आपण शरद पवार यांच्या मागे असल्याचे दाखवून दिले होते.

सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात भाजप आणि महायुतीला बसलेला फटका दुरुस्त करण्यासाठी आता पंढरपूर मंगळवेढ्याचे आमदार समाधान आवताडे यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ घालून पॅचअप करायच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

समाधान अवताडे यांना संधी देत पालकमंत्री बनविण्याच्या हालचाली सुरू

समाधान आवताडे हे मराठा समाजातील तरुण आणि संघटन कौशल्य असलेले आमदार असल्याने माढा, करमाळा, सांगोला, माळशिरस आणि बार्शी या ठिकाणी ते पुन्हा एकदा पक्षाला नवसंजीवनी मिळवून देतील, असा भाजपचा विश्वास आहे. समाधान आवताडे यांचा दांडगा जनसंपर्क आणि सर्वांशी मिळून मिसळून वागण्याची त्यांची पद्धत यामुळे पुन्हा एकदा या सहा मतदारसंघात पक्षाची बांधणी मजबूत होऊ शकणार आहे.

अवताडे यांच्यासमोर मोहिते पाटील यांचे मोठे आव्हान असले तरी त्याला तोंड देण्याची ताकद त्यांच्यात असल्याने ते भाजपासाठी कोणालाही भिडू शकतात, याचा विश्वास पक्षाला आहे. त्यामुळेच आता होणाऱ्या मंत्रिमंडळ रचनेत सोलापूर जिल्ह्यातून समाधान अवताडे यांना संधी देत पालकमंत्री बनविण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

समाधान आवताडे हे 2021 साली पहिल्यांदा पंढरपूर मंगळवेढा विधानसभेच्या पोटनिवडणुकीत भगीरथ भालके यांचा पराभव करून निवडून आले होते. कालच्या निकालातही त्यांनी पुन्हा एकदा भगीरथ भालके यांना आसमान दाखवत दुसऱ्यांदा विजय मिळवला आहे.

समाधान अवताडेंचे संघटन कौशल्य जिल्ह्यातील राजकीय पडझड

सोलापूर जिल्ह्यातून मंत्रीपदासाठी भाजप जिल्हाध्यक्ष सचिन कल्याण शेट्टी यांच्याही नावाची चर्चा असली तरी ग्रामीण भागात अवताडे जास्त परिणामकारक ठरू शकतील असे भाजप निरीक्षकांचे मत आहे. यावेळी 11 पैकी सहा जागा महाविकास आघाडीने घेत भाजपाला आणि महायुतीला दे धक्का केला असून यात महायुतीला साथ देणारे सर्व सहा विद्यमान आमदारांना पराभवाची धूळ चाखावी लागली होती .

आता येऊ घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका आणि महापालिक या निवडणुक डोळ्यासमोर ठेवून भाजप पावले टाकू लागली असून पक्षाचे लक्ष 2019 ला गमावलेल्या दोन्ही लोकसभेच्या जागा पुन्हा मिळवण्याचे मुख्य लक्ष आहे.

अशावेळी बहुजन चेहरा देताना सर्वांना सोबत घेऊन जाईल अशा व्यक्तीचा विचार पक्ष करीत आहे. पुढील दोन ते तीन दिवसात राज्यात नवीन सरकार येणे अपेक्षित असून यामध्ये सोलापूर जिल्ह्याला मंत्रिपदाची संधी देताना अवताडे यांच्या नावाचा विचार होईल असे सूत्रांचे सांगणे आहे.

अक्कलकोट पासून सोलापूरपर्यंत भाजपने क्लीन स्वीप घेत काँग्रेसचा सुपडा साफ केला. मात्र ग्रामीण भागात मोहोळपासून सांगोल्यापर्यंत शरद पवार गटाने महायुतीला आसमान दाखवल्याचे चित्र आहे. यात मोहोळ, माढा, करमाळा, माळशिरस ह्या चार मतदारसंघात शरद पवार गटाने दणदणीत विजय मिळविला

तर बार्शीमध्ये ठाकरे गटाचे दिलीप सोपल आणि सांगोल्यात शेतकरी कामगार पक्षाचे डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी विजय मिळवत महायुतीला दे धक्का दिला.

सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात महायुतीचा झालेला सफाया भाजपासाठी चिंतेचा विषय बनला असून पुन्हा एकदा या सहा मतदारसंघात नव्याने बांधणे करण्यासाठी पंढरपूर मंगळवेढ्याचे आमदार आणि देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू समाधान आवताडे यांच्यावर ही जबाबदारी देण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: पालकमंत्री समाधान आवताडे

संबंधित बातम्या

वीरश्री महिला पतसंस्थेचा उद्या मंगळवेढ्यात लोकपर्ण सोहळा; सर्व बँकिंग सुविधा आता एकाच छताखाली

महिला सक्षमीकरणासाठी ‘वीरश्री’ पतसंस्थेचे मोठे पाऊल; महिला उद्योजकांना केवळ ‘इतके’ टक्के व्याजदराने कर्ज, विविध ठेव योजनांचाही शुभारंभ

June 30, 2026
मंगळवेढ्यातील सर्वात बेस्ट लोकेशन! नर्मदा पार्क मधील फक्त 13 N/A प्लॉट शिल्लक; बस स्टँड, पासून फक्त 2 मिनिट अंतरावर; त्वरा करा ही संधी पून्हा नाही; संपर्क अमर डेवलपर्स 9132105105/9823533526

मोठी संधी! मंगळवेढ्यात मध्य भागी असलेले मंगळवेढा- पंढरपूर बायपास रोड टच रहिवाशी क्षेत्र मधील ओपन प्लॉट्सचा सर्वसुविधांसह सुविधा-समृद्ध प्रकल्प; अमर डेवलोपर्स: 9132105105 वर कॉल करून आजच भेट द्या

June 30, 2026
Transfer! मंगळवेढा पोलिस ठाण्याकडील ‘या’ पोलिस कर्मचार्‍यांच्या अन्यत्र बदल्या; नवीन ‘हे’ आले

महिलांनो दागिने सांभाळा! वटपौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर मंगळवेढा पोलीस हायअलर्टवर; संशयास्पद व्यक्ती दिसल्यास थेट ‘या’ नंबरवर कॉल करा

June 29, 2026
मंगळवेढ्यातील श्री सायकल कंपनीमध्ये बॅटरी ऑपरेटर कार वरती 20 टक्के पर्यंत डिस्काउंट; नागरिकांना कार खरेदीसाठी मोठी संधी

मंगळवेढेकरांसाठी खुशखबर! ‘श्री सायकल कंपनी’मध्ये लहान मुलांच्या बॅटरी कार आणि जीपवर धमाकेदार ऑफर; सोबतीला नोकरीची सुवर्णसंधी

June 29, 2026
सोलापूर ब्रेकिंग! ‘या’ तालुक्यातील ग्रामपंचायती बिनविरोध झाल्यास अख्ख्या गावाला मोफत रक्तपुरवठा

हे यमराजा, उद्या आमच्या बायका येतील पण…;  वटपौर्णिमेच्या पूर्वसंध्येला नक्की काय घडलं? पुरुषांनी फोडला हंबरडा; ज्याची चर्चा आता संपूर्ण राज्यात आहे?

June 29, 2026
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

खळबळजनक! ​फक्त एक प्रश्न अन्‌ रक्ताचा सडा…, मेव्हण्याने भाऊजीवर केला प्राणघातक हल्ला; मंगळवेढ्यामध्ये नेमकं काय घडलं?

June 29, 2026
सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

तिकडे NEET चा बाजार, इकडे TET चा तमाशा; गरिबांच्या पोरांनी फक्त फी भरायची का? प्रहारच्या राकेश पाटीलांचा संतप्त सवाल; टीईटी’ परीक्षा कायमस्वरूपी रद्द करण्याची मागणी

June 28, 2026

कर्जमाफीचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात कधी येणार? राज्य सरकारची मोठी घोषणा; थेट तारीख सांगितली

June 30, 2026
राजकीय घडामोड! मंगळवेढा नगरपालिका नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून ‘या’ नावाची चर्चा; राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

मोठी बातमी! आरोग्य विभागाच्या खोल्या थेट ‘सील’, मोठ्या घोटाळ्याचा आरोप; नगरसेवकांच्या तक्रारीनंतर मंगळवेढ्यात खळबळ; ‘दूध का दूध, पाणी का पाणी’ होणार?

June 28, 2026
Next Post
आमदार व्हायचंय? भरा अर्ज, आजपासून प्रक्रिया, विधानसभेसाठी १० हजार रुपये डिपॉझिट; उमेदवारी अर्ज दाखल करताना ‘या’ गोष्टींवर बंदी

निवडणुकीत चौथ्यांदा पराभव, 'या' नेत्याची राजकारणातून निवृत्तीची घोषणा; निवडणुकांमध्ये पक्षाचा कार्यकर्ता म्हणून यापुढे सहभागी असणार

ताज्या बातम्या

वीरश्री महिला पतसंस्थेचा उद्या मंगळवेढ्यात लोकपर्ण सोहळा; सर्व बँकिंग सुविधा आता एकाच छताखाली

महिला सक्षमीकरणासाठी ‘वीरश्री’ पतसंस्थेचे मोठे पाऊल; महिला उद्योजकांना केवळ ‘इतके’ टक्के व्याजदराने कर्ज, विविध ठेव योजनांचाही शुभारंभ

June 30, 2026
मंगळवेढ्यातील सर्वात बेस्ट लोकेशन! नर्मदा पार्क मधील फक्त 13 N/A प्लॉट शिल्लक; बस स्टँड, पासून फक्त 2 मिनिट अंतरावर; त्वरा करा ही संधी पून्हा नाही; संपर्क अमर डेवलपर्स 9132105105/9823533526

मोठी संधी! मंगळवेढ्यात मध्य भागी असलेले मंगळवेढा- पंढरपूर बायपास रोड टच रहिवाशी क्षेत्र मधील ओपन प्लॉट्सचा सर्वसुविधांसह सुविधा-समृद्ध प्रकल्प; अमर डेवलोपर्स: 9132105105 वर कॉल करून आजच भेट द्या

June 30, 2026
तगडा बंदोबस्त! सोलापूर व माढा लोकसभेसाठी आजपासून अर्ज दाखल होणार, अनामत रक्कम रोखच भरावी लागणार; उमेदवाराबरोबर ‘एवढ्या’ लोकांनाच प्रवेश

सोलापूर जिल्ह्याबाबत सरकारचा मोठा निर्णय; ‘या’ ७ तालुक्यांचे भाग्य बदलणार?

June 30, 2026
Transfer! मंगळवेढा पोलिस ठाण्याकडील ‘या’ पोलिस कर्मचार्‍यांच्या अन्यत्र बदल्या; नवीन ‘हे’ आले

महिलांनो दागिने सांभाळा! वटपौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर मंगळवेढा पोलीस हायअलर्टवर; संशयास्पद व्यक्ती दिसल्यास थेट ‘या’ नंबरवर कॉल करा

June 29, 2026
मंगळवेढ्यातील श्री सायकल कंपनीमध्ये बॅटरी ऑपरेटर कार वरती 20 टक्के पर्यंत डिस्काउंट; नागरिकांना कार खरेदीसाठी मोठी संधी

मंगळवेढेकरांसाठी खुशखबर! ‘श्री सायकल कंपनी’मध्ये लहान मुलांच्या बॅटरी कार आणि जीपवर धमाकेदार ऑफर; सोबतीला नोकरीची सुवर्णसंधी

June 29, 2026
मंगळवेढा ब्रेकिंग! पोलीस पाटलाचा अपघाती मृत्यू

हृदयद्रावक! सात महिन्यांचं बाळ पोटातच गेलं, पती-पत्नीचाही जागीच अंत; एकाच चितेवर पेटली नवदांपत्याची चिता; सांगोल्यातील ‘त्या’ अपघाताने डोळ्यात येईल पाणी…

June 29, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा