mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

दिलीप धोत्रे यांना विजयी करा या मतदारसंघात एकही तरुण बेरोजगार राहणार नाही, शेतकरी व महिलांसाठी मोठा प्रकल्प उभारू; राज ठाकरे यांचे जनतेला आश्वासन

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
November 6, 2024
in मंगळवेढा, राजकारण, राज्य
दिलीप धोत्रे यांना विजयी करा या मतदारसंघात एकही तरुण बेरोजगार राहणार नाही, शेतकरी व महिलांसाठी मोठा प्रकल्प उभारू; राज ठाकरे यांचे जनतेला आश्वासन

टीम मंगळवेढा टाईम्स ।

गेली साठ वर्ष त्याच त्या प्रश्नावर निवडणूक लढवली जात आहे. काहीही प्रश्नांची सोडवणूक का झाली नाही? असा प्रश्न उपस्थित करत राज्यात चार पक्ष आलटून पालटून सत्तेवर येतात परंतु कोणतीही प्रश्न सुटले नाहीत. या पंचवार्षिक निवडणुकीत मनसेला संधी द्या राज्यातील बहुतांश प्रश्न सोडवले जातील.

येत्या पाच वर्षात आम्ही सोडवलेले प्रश्न पाहून आपण भविष्यात नेहमीच मनसेलाच असा विश्वास आम्हाला वाटतो असे प्रतिपादन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले.

ते मंगळवेढा येथे पंढरपूर विधानसभा मतदारसंघाचे मनसेचे उमेदवार दिलीप धोत्रे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत बोलत होते.

राज ठाकरे पुढे म्हणाले, मी आपल्यासमोर दोन गोष्टीसाठी आलोय. एक तुमचे दर्शन घेण्यासाठी तर दुसरी गोष्ट म्हणजे उमेदवारांसाठी आशीर्वाद मागण्यासाठी आलो आहे.मंगळवेढा तालुक्याची ओळख दुष्काळग्रस्त म्हणून आहे ही लाजिरवाणी गोष्ट आहे. आजपर्यंत सत्तेवर आलेल्या लोकांनी काय कामच केले नाही.

आजपर्यंत आपण ज्यांना निवडून दिले त्यांना आपली ओळख अशी कशी म्हणून प्रश्न विचारावा. आपण राजकारण्यांना प्रश्न विचारले नाही म्हणून ही आपली ही हालत झाली आहे.

आपले तरुण तरुणी पुणे , मुंबई येथे नोकरीसाठी जातात परंतु आपण जिकडे असेल तेथे तिकडे रोजगार आणून देईन. कुणालाही नोकरीसाठी घरदार सोडण्याची गरज नाही हे काम मनसे करेल आणि हे सहज शक्य आहे.

महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्या करण्याचे प्रमाण वाढले आले, महिला व तरुणी पळविल्या जात आहेत, बलात्कार होत आहेत आणि सर्वजण निवडणुकीत गुंतले आहे. या साऱ्या लाजिरवाण्या बाबींना लगाम घालण्याची इच्छाशक्ती सत्तेवरील राजकारण्याकडे नाही.

आज पर्यंत भूलथापा मारल्या त्यांनाच आपण मतदान केले आता एक वेगळा पर्याय निवडा. आपल्या कोणत्याही प्रश्नाची सोडवणूक न करणाऱ्या चार पक्षांना आज पावतो आपण निवडून दिले, आता आमचा पाचवा पक्ष एक औषध म्हणून वेगळा पर्याय निवडत प्रयोग करा मग पहा आजार नीट होतोय की नाही.

राज्यात लाडकी बहिण योजना देत असताना महागाई वाढली आहे. फक्त लाडकी बहीणच दिसते लाडके भाऊ काय मेले की काय असा असा प्रतीप्रश्नही त्यांनी यावेळी केला. राज्यात सत्तेत नसताना लोकांना नोकरी देण्याची काम केले.

सत्ता नसताना नोकरी देतो व मग सत्ता आल्यावर काय करेन हे ध्यानी घ्या. हे महाराष्ट्र राज्य मोठे आहेच परंतु याहून अधिक महान बनवण्याची जबाबदारी माझी राहील. येत्या वीस तारखेला गुलाम म्हणून न राहता स्वतः मालक होण्यासाठी तुमच्यासमोर सक्षम पर्याय असलेल्या मनसेला संधी द्या असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे उमदेवार दिलीप धोत्रे यांनी यावेळी सांगितले की, पंढरपूर मतदारसंघातील विद्यमान आमदारांना प्रत्येक मतदाराने हे विचारणे गरजेचे की गावांसाठी, शेतकरी, महिला, युवकवर्ग, युवा उद्योजक यांच्यासाठी काम काम केले हे विचारावे. मतदारसंघात ४२०० कोटी निधी आला आहे असे ते सांगतात.

या विकासनिधीच्या हिशोबाने प्रत्येक गावासाठी ४० कोटी निधी आला असता तर ही गावे सोन्याची झाली असती. आपली गावे सोन्याची झाली आहेत का हे पहा म्हणजे खोटे विकासाचे राजकारण करत आपणास फसविले आहे.

खोटे बोलून निवडून यायचे व जनतेला विसरून जायचे हा यांचा नेहमीचा फंडा आहे. पंढरपूर विधानसभा मतदारसंघात उभे राहिलेल्या सर्व उमेदवारामध्ये सर्वात जास्त शिक्षण माझे झाले असल्याने मी आपणास अधिक समजून घेऊ शकतो. शेतमजुराचा मुलगा, गरीब घराचा मुलगा, दगडफोड्याचा मुलगा ही ओळख असतानाही अडीअडचणीत असलेल्या सर्वांना मदतीचा हात दिला आहे. कोरोनो काळात सर्वोपरी मदत करण्याचे काम केले आहे.

धोत्रे पुढे म्हणाले, बहुजनांच्या अस्तित्वाची ही लढाई आहे हे प्रत्येकाने लक्षात घ्यावे. जातीवाद प्रचंड प्रमाणात वाढलेला असून जातीधर्माच्या नावावर स्वतःची पोळी भाजून घेण्याचे काम सुरू आहे. लोकांना विकासाच्या नावाखाली फसविले जात आहे. मी काम करणारा माणूस आहे त्यामुळे माझे काम पाहून मला विजयी करा.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: दिलीप धोत्रेराज ठाकरे

संबंधित बातम्या

खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

लग्नाच्या चारच महिन्यात सुखी संसाराला दृष्ट लागली! मंगळवेढ्यात विवाहितेच्या आत्महत्येने खळबळ; पती गजाआड, सासू-सासरे फरार

March 11, 2026

धक्कादायक! 50 लाखांच्या विम्यासाठी अपघाती मृत्यूचा बनाव, पोलीस अन् डॉक्टरही मॅनेज; अखेर पर्दाफाश, 9 जणांना अटक

March 10, 2026
खळबळ! मंगळवेढा तालुक्यात पंतप्रधान किसान सन्मान योजनेत तब्बल २ हजार ६०० बोगस लाभार्थी

मोठी बातमी! मंगळवेढ्यात तब्बल ८ कोटींचा ‘शेअर’ बाजार! ‘बाळू’ने शेकडो जणांना घातली टोपी; शिक्षक अन् व्यावसायिकांचे कष्टाचे पैसे पाण्यात?”तक्रार अर्ज दाखल, तालुक्यात एकच खळबळ

March 10, 2026
मंगळवेढा तालुका सहाय्यक कृषी अधिकारी संघटनेच्या अध्यक्षपदी औदुंबर देवकते, तर कार्याध्यक्षपदी पांडुरंग चौधरी यांची निवड

मंगळवेढा तालुका सहाय्यक कृषी अधिकारी संघटनेच्या अध्यक्षपदी औदुंबर देवकते, तर कार्याध्यक्षपदी पांडुरंग चौधरी यांची निवड

March 10, 2026
पोलिसांनी रोखला अल्पवयीन नवरदेवाचा विवाह; सोलापूर जिल्ह्यातील खळबळजनक घटना

आगळ्यावेगळ्या विवाहाची चर्चा! नवविवाहित जोडप्याकडून लग्नाच्या आहेरात मिळालेले 2 लाख सामाजिक संस्थांना दान

March 11, 2026
Gas booking Number : आता गॅस बुकिंगसाठी संपूर्ण देशात एकच नंबर; जूना नंबर करा डिलिट

सर्वसामान्यांची चिंता वाढवणारी बातमी! घरगुती गॅस सिलिंडर बुकिंगबाबत सरकारचा मोठा निर्णय; पुन्हा नियम बदलले

March 11, 2026
मोरे फार्महाऊसवर पक्षांचा किलबिलाट घुमणार; जागतिक महिला दिनी पाणपोईचा शुभारंभ; वारी परिवाराचा शंभर किलोमीटरचा सायकल प्रवास आणि पक्षांसाठी दाणा-पाणी

मोरे फार्महाऊसवर पक्षांचा किलबिलाट घुमणार; जागतिक महिला दिनी पाणपोईचा शुभारंभ; वारी परिवाराचा शंभर किलोमीटरचा सायकल प्रवास आणि पक्षांसाठी दाणा-पाणी

March 9, 2026
मोठी बातमी! मंगळवेढ्यात नगरसेवक पदासाठी आज भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्षाकडून अर्ज दाखल; नगराध्यक्षपदासाठी ‘इतके’ अर्ज; मतदारांमध्ये उत्सुकता वाढली

मुख्यमंत्र्यांच्या मुलाची राजकारणात एन्ट्री; आता थेट उपमुख्यमंत्री होणार, राजकीय चर्चांना उधाण

March 9, 2026
घरबसल्या रेशन कार्डमध्ये मोबाईल नंबर आणि पत्ता अशाप्रकारे करा अपडेट

नागरिकांनो! राज्यातील लाखो रेशन कार्ड्स होणार बंद; सरकारकडून 5 मोठे बदल, जाणून घ्या नवे नियम काय?

March 11, 2026
Next Post
अनिल सावंत यांच्या प्रचाराचा नारळ आज माचनूर येथे फुटणार, विजयाचं रणशिंग फुंकलं जाणार; खा.धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या हस्ते होणार शुभारंभ

अनिल सावंत यांच्या प्रचार्थ खा.धैर्यशील मोहिते पाटील यांचा आज गावभेट दौरा; मंगळवेढ्यातील ग्रामीण भागात घुमणार तुतारीचा आवाज

ताज्या बातम्या

खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

लग्नाच्या चारच महिन्यात सुखी संसाराला दृष्ट लागली! मंगळवेढ्यात विवाहितेच्या आत्महत्येने खळबळ; पती गजाआड, सासू-सासरे फरार

March 11, 2026
कुटुंबातील सदस्यांना कोरोनाची बाधा, विवाहितेने घेतला गळफास; सोलापुरातील धक्कादायक घटना

सुनेच्या जाचाला कंटाळून सासऱ्याचं टोकाचं पाऊल; सोलापूर जिल्ह्यातील खळबळजनक घटना

March 11, 2026

धक्कादायक! 50 लाखांच्या विम्यासाठी अपघाती मृत्यूचा बनाव, पोलीस अन् डॉक्टरही मॅनेज; अखेर पर्दाफाश, 9 जणांना अटक

March 10, 2026
खळबळ! मंगळवेढा तालुक्यात पंतप्रधान किसान सन्मान योजनेत तब्बल २ हजार ६०० बोगस लाभार्थी

मोठी बातमी! मंगळवेढ्यात तब्बल ८ कोटींचा ‘शेअर’ बाजार! ‘बाळू’ने शेकडो जणांना घातली टोपी; शिक्षक अन् व्यावसायिकांचे कष्टाचे पैसे पाण्यात?”तक्रार अर्ज दाखल, तालुक्यात एकच खळबळ

March 10, 2026
मंगळवेढा तालुका सहाय्यक कृषी अधिकारी संघटनेच्या अध्यक्षपदी औदुंबर देवकते, तर कार्याध्यक्षपदी पांडुरंग चौधरी यांची निवड

मंगळवेढा तालुका सहाय्यक कृषी अधिकारी संघटनेच्या अध्यक्षपदी औदुंबर देवकते, तर कार्याध्यक्षपदी पांडुरंग चौधरी यांची निवड

March 10, 2026
सोलापूर जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाचे आदर्श पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका पुरस्कार जाहीर; संपूर्ण नावाची यादी बघा…

​मिनी मंत्रालयातील भाजपचा सेनापती ठरणार, गटनेतेपदाच्या नावावर आज शिक्कामोर्तब; सोलापूरच्या राजकारणात भाजपचा मोठा गेमप्लॅन

March 10, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा