टीम मंगळवेढा टाईम्स । बॉलिवूड शहेनशहा अमिताभ बच्चन यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर आता अभिषेक बच्चनलासुद्धा कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती समोर आली आहे. अभिषेक बच्चनने ट्विटरवरून याची माहिती दिली आहे. अभिषेकने ट्विटरवर म्हटलं की, वडिलांसह माझीही टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. दोघांमध्येही कोरोनाची सौम्य लक्षणे असून रुग्णालयात दाखल झालो आहेत. आम्ही आवश्यक त्या सर्वांना याची माहिती दिली असून कुटुंबिय आणि कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी केली आहे. कोणीही अस्वस्थ होऊ नका आणि शांत रहा असं आवाहन अभिषेकने केलं आहे. Amitabh Bachchan and Abhishek Bachchan corona test positive!
बच्चन यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली असून त्यांना रुग्णालयात हलवलं आहे. कुटुंबीयासह इतरांची कोरोना टेस्ट करण्यात आली असून त्यांचे रिपोर्ट यायचे आहेत.अमिताभ बच्चन यांच्या ट्विटरवरून ही माहिती देण्यात आली आहे.
#Corona अमिताभ बच्चन यांच्यानंतर अभिषेक बच्चन याचीही कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह अमिताभ,
अभिषेक यांच्या व्यतिरिक्त बच्चन कुटुंबातील सदस्यांचे कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह #AmitabhBachchan#AbhishekBachchan @SamadhanFugare @rajeshtope11 pic.twitter.com/YpHrEmzVO6
— Mangalwedha Times (@SamadhanFugare) July 12, 2020
तसंच गेल्या दहा दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्यांनी कोरोनाची टेस्ट करावी असंही त्यांनी सांगितलं आहे. जया बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन यांचीही कोरोना टेस्ट कऱण्यात आली होती. त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या आम्ही संपर्कात असून त्यांना सहकार्य करत आहे असंही अभिषेक बच्चनने म्हटलं आहे. अमिताभ बच्चन यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अमिताभ बच्चन यांनी स्वत: ट्विटवरून याची माहिती दिली होती.
दरम्यान, बॉलिवूड अभिनेत्री रेखा यांचेही घर सील करण्यात आले होते. त्यांच्या बंगल्याचा सुरक्षा रक्षक कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर परिसर सील केला होता. त्यांच्या बांद्रा इथल्या घरावर बीएमसीने कंटेनमेंट झोन अशी नोटीसही लावली आहे.
बिग बी कौन बनेगा करोडपतीच्या 12 व्या सिझनमध्येही पुन्हा परतणार आहेत. या शोसाठी मे महिन्यात ऑडिशन घेण्यात आल्या आहेत. त्यांचे चेहरे, ब्रह्मास्त्र आणि झुंड हे चित्रपटही लवकरच येणार आहेत.
—————————
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज