टीम मंगळवेढा टाईम्स।
राजकारणा पलीकडे जाऊन सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवून त्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी अहोरात्र तत्पर असलेले व्यक्तिमत्व अशी ओळख निर्माण केलेले भैरवनाथ शुगरचे व्हा. चेअरमन अनिल सावंत यांनी
आगामी विधानसभा निवडणुकीत पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातून निवडणूक लढवावी अशी मागणी सध्या मतदार संघातील सर्वच स्तरातून होत असल्याने
त्यांनी निवडणूक लढवावी असे मत सर्व सामान्य जनता बोलत आहे तर काही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी देखील मागणी केली आहे.
यावेळी बोलताना प्रदीप पवार म्हणाले की, अनिल सावंत हे सध्या शिवसेनेत कार्यरत असले तरी त्यांनी त्यांच्या पद्धतीने जेवढे शक्य आहे तेवढी मदत करताना मात्र पक्षाच्या चौकटीत न राहता त्यांच्याजवळ जो माणूस पोहोचला त्या माणसाला मनापासून मदत केली आहे.
याचा अनुभव माझ्यासह मंगळवेढा तालुक्यातील व संपूर्ण मतदारसंघातील अनेकांना आला आहे. कोणतेही पद नसताना त्यांनी मंगळवेढा तालुक्यासाठी जे योगदान दिले आहे ते अगदी वाखाणण्याजोगे आहे.
असा हा माणूस जर आपल्या मतदार संघाचा लोकप्रतिनिधी झाला तर आपल्या मतदारसंघाचा विकास महाराष्ट्रात मॉडेल ठरेल. आम्ही अनिल सावंत यांना लवकरच भेटून आगामी विधानसभा निवडणूक महाविकास आघाडी कडून व आमच्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करून लढविण्यासंदर्भात सांगणार आहोत.
आणि याबरोबरच आमच्या वरिष्ठ पातळीवरील नेत्यांना सुद्धा या संदर्भात साकडे घालणार आहोत. एकुणात अनिल सावंत यांनी पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाची निवडणूक महाविकास आघाडी कडून व राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करून लढवावी असेही यावेळी बोलताना प्रदीप पवार म्हणाले.
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे युवक तालुका उपाध्यक्ष आणि पाटकळ गावचे ग्रामपंचायत सदस्य प्रदीप पवार यांनी व्यक्त केले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज