टीम मंगळवेढा टाईम्स ।
रक्षाबंधन सणाचा मुहूर्त काही तासांवर येऊन ठेपला असून बहीण भावाच्या नात्याचा सण साजरा करण्यासाठी सर्वत्र लगबग सुरू आहे. लाडक्या बहिणी गावाकडे जाऊन भावाच्या हातावर राखी बांधणार आहेत, तर भाऊ देखील आपल्या बहिणींकडे राखी बांधायला जात आहेत.
बहीण-भावाच्या या प्रेमळ नात्यानं सोशल मीडियाही गजबजलेला पाहायला मिळत आहे. मात्र, अशातच सोलापूर जिल्ह्यातून अत्यंत दु:खद बातमी समोर आली आहे.
ज्यामध्ये, रक्षाबंधन सणासाठी गावाकडे घेऊन येणाऱ्या कारचा अपघात झाल्याने बहीण-भावाचा मृत्यू झाल्याची ह्रदयद्रावक घटना घडली आहे.
रक्षाबंधन सणासाठी आलेल्या बहिणीला कारमधून गावाकडे घेऊन जात असताना झालेल्या भीषण अपघातात दोन्ही बहीण-भावाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
पंढरपूर-मंगळवेढा मार्गावर गोपाळपूर हद्दीत स्विफ्ट कार आणि आयशर टेम्पो यांच्यात झालेल्या भीषण अपघातात बहीण भावाच जागीच मृत्यू झाला. आज रविवारी सायंकाळी साडे चार वाजता ही दुर्दैवी घटना घडली.
या अपघातानंतर स्थानिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली होती. मात्र, जागेवरच कारमधील बहीण-भावाचा मृत्यू झाल्याने उपस्थितांनाही गहिवरुन आले.
पंढरपूरहून-मंगळवेढाकडे निघालेली स्विफ्ट कार क्रमांक एम एच 13 बी एन 6649 ची पंढरपूरकडे येत असलेला आयशर टेम्पो आर.जे.36 जी.ए 7971 ला समोरासमोर जोरदार धडक बसली. त्यामध्ये स्विफ्टचा चक्काचूर झाला असून स्विफ्ट कारमधील बहीण भाऊ जागीच ठार झाले आहेत.
मंगळवेढा येथील रोहित तात्यासो जाधव (वय 25 वर्षे), ऋतुजा तात्यासो जाधव (वय 19 वर्षे) अशी मयत बहीण भावाची नावे आहेत. दोन्ही मृतांचे मतदेह पंढरपूर उपजिल्हा रुग्णालय येथे शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत.
मात्र, रक्षाबंधन सणाच्या पूर्वसंध्येलाचा काळाने घाला घातल्याची घटना घडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.(स्रोत: ABP माझा)
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज